आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचे ‘कौतिक’! साहित्‍य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राठी साहित्य संमेलनात अध्यक्ष हा मराठवाड्याचाच हाेणार यावर अखेर शिक्कामाेर्तब झाले. मराठवाड्यातील काही धुरीणांनी संमेलन विदर्भातून थेट बडाेद्यापर्यंत नेण्यात जसे यश मिळविले तसेच मराठवाड्यातूनच संमेलनाध्यक्ष बसविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. नूतन  अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे उस्मानाबादचे. त्यांचे कार्यकर्तृत्व जरी पश्चिम महाराष्ट्रातील असले व स्थायिक जरी पुण्यात असले तरी संमेलनाध्यक्ष हाेण्यासाठी ते मूळ मराठवाडेकर असणे हे पुरेसं ठरलं. खरंतर ही निवडणूक बिनविराेध झाली असती तर अाैरंगाबादमधून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांसारखी एक याेग्य व्यक्ती या पदावर बसली असती. पण साहित्य महामंडळातील काही उच्चपदस्थांनीच त्याला छुपा विराेध केला अाणि निवडणूक घेणे भाग पडले. पण निवडणूक बिनविराेध झाली असती तर चपळगावकरांच्या रुपाने एका तालेवार व्यक्तिमत्वाने मराठी मनांना याेग्य मार्गदर्शन केले असते, जे बडाेद्यासारख्या ठिकाणची अाजकाळाची गरज झाली असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये चपळगावकरांच्या भाषणातून अधाेरेखित झाले हाेतेे. मुळातच चपळगावकरांना राजकारणाचा विट असल्याने ते स्वत:च निवडणूक प्रक्रियेच्या स्पर्धेतून बाहेर पडले. अर्थात अाताही बडाेद्यातील संमेलनात त्यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताला व ‘स्वतंत्र विचार’ यावरच परखडपणे मते मांडणाऱ्या मराठी मनांच्या जवळच्या माणसाला निमंत्रित केले हा सुयाेगच म्हणावा लागेल. लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्षपदासाठी याेग्य नाहीत असा या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ नाही. पण, चपळगावकर नाहीत तर मग अाता मराठवाड्यातून काेण? असा प्रश्न निर्माण हाेताच देशमुख यांचे नाव पुढे अाले. सुरुवातीला काेण लक्ष्मीकांत देशमुख म्हणून भुवयाही उंचावल्या. पण ‘मराठवाडा लिंक’ समाेर अाल्यानंतर त्या भुवया हळूहळू खाली येत गेल्या अाणि तेच संमेलनाध्यक्ष हाेणार यावर शिक्कामाेर्तब हाेऊ लागले. अापल्या भागातील साहित्यिकाला हा सर्वाेच्च मान मिळावा असे सर्वच घटक संस्थांना वाटणं यात गैर हीच नाही. पण त्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते या निवडणुकीला ‘लाेकशाही पद्धतीने’ म्हणणं चुकीचं ठरवू पाहतं अाणि या वेळीदेखील तेच झालं.   


मतांचा काेटा पूर्ण नसला तरी उमेदवार अापलाच निवडून येणार यासाठी मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी अाटाेकाट प्रयत्न केले. दाेन नंबरला असलेले रवींद्र शाेभणे यांना  विदर्भातूनच विराेध झाला. शाेभणेंना नकाे तर देशमुखांना मते द्या, असा प्रचारही विदर्भात करण्यात अाला. त्याच वेळी इकडे मराठवाड्यात एकगठ्ठा मतदान देशमुखांच्या पारड्यात पडले. बडाेद्याच्या अायाेजक संस्थेच्या मतांमध्ये विभागणी झाली असली तरी त्यातील अधिकाधिक मतांचा फायदा देशमुखांनाच झाला. असे असतानाही शाेभणे यांनी चांगलीच लढत दिली. शाेभणे यांनी मागील दाेन निवडणुकांत माघार घेतली हाेती. त्यामुळे या वेळी त्यांच्यासाठी विदर्भातून किशाेर सानप यांनी माघार घ्यावी असा एक मतप्रवाह हाेता. पण सानपांनी माघार घेतली नाही. राजन खान यांना गेल्या दाेन निवडणुकांत अत्यल्प मतदान हाेते. यंदा त्यांनी १२३ मते मिळविली. अशी मतांची विभागणी हाेत गेल्याने शाेभणेंना फटका बसला. अाता यात मागे विठ्ठल वाघ म्हटल्याप्रमाणे ‘पवार नावाची काेणी व्यक्ती हाेती का?’  तर हा संशाेधनाचा विषय ठरेल. मात्र प्रत्येकच वेळी अध्यक्षपदासाठी लाॅबिंग हाेत असेल तर उत्सवाला हे अशाेभनीय अाहे. त्यामुळेच या प्रक्रियेवरील सामान्यांचा विश्वास उडेल अाणि या प्रक्रियेकडे पर्यायाने पदाकडे काेणीही गांभीर्याने बघणार नाही.  त्यामुळे अंमळ विश्वास अाहे ताेपर्यंतच प्रक्रियेतील काही घटकांवर नियंत्रण अाणण्याची गरज निर्माण झाली अाहे अाणि तेच नियंत्रण वा विश्वास चपळगावकरांच्या रुपाने निर्माण झाला असता किंबहुना बडाेद्याच्या संमेलनाला ते शाेभनीयच ठरले असते. पण, काही लाेकांच्या अाडमुठेपणामुळे ते झाले नाही अाणि पुन्हा तीच री अाेढली गेली की, ‘नेमेची येताे पावसाळा अन‌् बघू काैतिक साेहळा...’

बातम्या आणखी आहेत...