Home | Divya Marathi Special | All the fights from name book to praise

जिनांवरून असंतोष नामफलकापासून ते प्रशंसेपर्यंत सर्वच वादात

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 06, 2018, 04:07 AM IST

सात दशकांपूर्वी महंमद अली जिनांनी देशाचे दोन तुकडे केले होते. मात्र त्यांच्या नावाखाली मतांचे विभाजन आजही सुरू आहे. कधी

 • All the fights from name book to praise

  सात दशकांपूर्वी महंमद अली जिनांनी देशाचे दोन तुकडे केले होते. मात्र त्यांच्या नावाखाली मतांचे विभाजन आजही सुरू आहे. कधी त्यांची प्रशंसा केली जाते तर कधी छायाचित्रावरून वाद होतो. नवा वाद हा छायाचित्राशी संबंधित आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठात ते लावले आहे. भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने ते हटवण्याची मागणी केली आहे. एएमयूला मात्र ते मान्य नाही.


  जिनांच्या नावाने पूूर्वीही या कारणांनी वाद झाले होते...

  * मुुंबईच्या लेमिंग्टन रोडजवळ असलेल्या काँग्रेस भवन परिसरात काही वर्षांपूर्वीपर्यंत जिनांच्या सन्मानार्थ नामफलक लावलेला होता. येथे जिनांच्या सन्मानार्थ एक दालन होते. याची उभारणी १९१८ मध्ये झाली होती. त्याकाळी मोठी निदर्शने झाली होती व त्याचे नेतृत्व जिना व त्यांच्या पत्नीकडे होते. या घटनेच्या स्मरणार्थ हा नामफलक होता. ८० च्या दशकात हे दालन राजकीय घडामोडींचे केंद्र होते. इंदिरा गांधी, मोरारजी देसाईंच्या बैठका होत. शिवसेनेच्या विरोधानंतर हा वाद पेटला व नामफलक हटवला.


  * शिवसेना व भाजपने मुंबई येथील जिना हाऊस पाडण्याचा प्रयत्नही केला आहे. फाळणीच्या पूर्वीपर्यंत जिना याच घरात राहत होते. जिनांची एकुलती एक कन्या दिना वाडियाने या घरावर हक्क सांगितला व मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आयुष्यातील अखेरचा काळ त्यांनी येथेच घालवला. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता ही सरकारी मालमत्ता आहे.


  * लालकृष्ण अडवाणींचे प्रकरण यात चर्चित होते. २००५ मध्ये पाक दौऱ्यादरम्यान त्यांनी जिनांची स्तुती केली होती. जिना महान व्यक्ती होते, धर्मनिरपेक्ष नेते असल्याचे अडवाणी बोलले. यामुळे भाजप अध्यक्षपद त्यांनी गमावले. संघाशी त्यांचे संबंध बिघडले ते नेहमीसाठीच. २००९ मध्ये जसवंत सिंह यांनी जिनांची प्रशंसा केली. त्यांना पक्षातून काढून टाकले. ते म्हणाले होते की, जिनांना फाळणी नको होती. त्यांना बाध्य केले गेले होते. आता भाजप नेते वादात अडकले आहेत. उ.प्र. सरकारचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी जिनांना महापुरुष म्हटलेे आहे.

  छायाचित्र केव्हापासून लावले आहे?
  एएमयूमधील इतिहासाचे प्रोफेसर मुं. सज्जाद सांगतात की, हे छायाचित्र ८० वर्षांपासून येथे आहे. म्हणजे फाळणीच्याही ९ वर्षे आधीपासून. जिनांना विद्यापीठाचे आजीवन सदस्यत्व दिले होते. वास्तविकता एएमयूच्या छात्रसंघाचे आजीवन सदस्यत्व मिळवणारे महात्मा गांधी पहिले व्यक्ती होते. या यादीत डॉ. आंबेडकर, नेहरू, सी. व्ही. रमण यांचीही नावे आहेत.

  जिनांच्या नावाने वाद का भडकला आहे?

  एका पत्रानंतर जिनांच्या नावाने वाद उफाळून आला आहे. १ मे, सोमवारी हे पत्र अलिगडचे आमदार सतीश गौतम यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांना लिहिले होते. यात आमदाराने एएमयूच्या विद्यार्थी संघटना कार्यालयातील जिनांचे छायाचित्र लावण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. ‘विद्यापीठात जिनांचे छायाचित्र कुठे व का लावले आहे,’ असा प्रश्न पत्राद्वारे विचारण्यात आला. फाळणीचे ते प्रमुख सूत्रधार होते. सध्यादेखील पाकिस्तान कुरापती करत आहे. या पार्श्वभूमीवर जिनांचा फोटो लावणे किती तर्कशुद्ध आहे हे पत्र माध्यमांच्या मथळ्यात प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते जिनांच्या फोटोचा विरोध करण्यासाठी विद्यापीठात धडकले. विद्यापीठाच्या बाबा सय्यद प्रवेशद्वारावर जिनांची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न झाला. एएमयूच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मारहाण केली. विद्यापीठ परिसरात तणाव वाढला. निदर्शने झाली, पोलिसांना लाठीमार करावा लागला.

  छायाचित्र हटवण्याची मागणी का?

  स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित नेहरूंसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या जिनांचे नाव इतिहासात भारत-पाकिस्तानच्या फाळणीचे सूत्रधार म्हणून नोंदवले गेले. या फाळणीत ५ लाखांपेक्षा अधिक लोक बळी गेले. अनेकांच्या कत्तली झाल्या. हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. १ कोटीपेक्षा अधिक नागरिक शरणार्थी झाले. मोहंमद अली जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने फाळणीचा पाया रचला. भारतातील मुस्लिम नागरिकांसाठी पाकिस्तान हा स्वतंत्र देश निर्माण करण्याची इच्छा याच्या मुळाशी होती. जुलै १९४६ मध्ये जिनांनी घोषणा केली की, १६ ऑगस्ट ‘धडक कृती दिन’ असेल. भारतातील १० कोटी मुस्लिमांना पाकिस्तान हवा आहे हे ब्रिटिश सरकारसमोर त्यांना सिद्ध करायचे होते. त्यांच्या या घोषणेने दंगली भडकल्या. कोलकात्यात ७२ तासांमध्ये ६ हजारपेक्षा अधिक नागरिक मारले गेले. जिनांच्या या हट्टाग्रहामुळेच स्वातंत्र्यदिनाच्या रात्री देशाची फाळणी झाली.

  तरीसुद्धा एएमयूमध्ये आतापर्यंत जिनांचे छायाचित्र का?

  वाद उफाळून आल्यानंतर एएमयूचे प्रवक्ते शैफी किडवई यांनी स्पष्टीकरण सादर केले. ‘ज्या तैलचित्राविषयी आमदार बोलत आहेत ते दशकांपासून संस्थेत अडकवलेले आहे. जिना या विद्यापीठाचे संस्थापक होते, असाही युक्तिवाद केला. छात्रसंघाचे आजीवन सदस्यत्व त्यांना प्रदान केले होते. आजीवन सर्वच सदस्यांची छायाचित्रे विद्यार्थी संघाच्या कार्यालयात लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे जिनांचेही आहे.

 • All the fights from name book to praise

Trending