अण्णाभाऊ साठे जयंती / अण्णाभाऊ साठे जयंती विशेष: सांगली ते मुंबई केला पायी प्रवास; पोहोचले मॉस्को, तळागाळातील हृदयापर्यंत

दिव्‍य मराठी वेब टीम

Aug 01,2018 03:18:00 PM IST
भारत स्वातंत्र्य होण्याआधी देशात दलितांची काय अवस्था होती, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याकाळी सांगलीच्या एका खेड्यातील एक मुलगा मुंबईच्या मायानगरीत येतो आणि मुंबईचाच होऊन जातो. नंतर तो केवळ मुंबई किंवा महाराष्ट्राचा नाही तर या विश्वाचाही होतो. ती व्यक्ती म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे.
'पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे', हे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अनेक पोवाडे लिहून सरकारवर असूड ओढले होते. लाखोंच्या जनसमुदायाला खिळवून ठेवण्याची ताकद या शाहीरात होती. लौकीकार्थाने दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी शेकडो कथा, नाटके, प्रवासवर्णने आणि 35 हून अधिक कादंबर्‍या लिहिल्या.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणकोणत्या कादंबर्‍यावर तयार झाले चित्रपट.

मुंबईत गिरणी कामगारांमुळे डाव्या चळवळीकडे वळलेल्या अण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊंना कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान जवळचे वाटत होते. त्यांनी 1944 मध्ये लालबावटा कला पथक स्थापन केले होते. हे नाव त्यांनी मार्क्स तत्वज्ञानावरुनच घेतले होते. त्यांना कॉर्मेड म्हटलेले आवडायचे. त्यांच्या डाव्या चळवळीकडील ओढ्यामुळेच ते 1963 साली मॉस्कोला गेले. ते तिथे जाण्याआधी त्यांचे साहित्य, त्यांचे पोवाडे तिथे पोहचलेले होते. अण्णाभाऊ मॉस्कोमध्ये गेल्यानंतर त्यांचे मोठे स्वागत झाले. तिथेही त्यांनी आपली कला सादर केली.कार्ल मार्क्स आणि डाव्या चळवळीकडे अण्णाभाऊ झुकलेले असले, तरी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी येथील दबलेल्यांचा आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत असे सांगितले. शोषित, दलितांच्या उद्धारासाठी आंबेडकरी तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितले. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव... या त्यांच्या कवनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञानच महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवले. त्यांची प्रसिद्ध आणि अनेक आवृत्या निघालेली फकिरा ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेबांना अर्पण केली आहे.- अण्णाभाऊ साठे यांनी 35 हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. - अण्णाभाऊ साठेंच्या कथा आणि कादंबरीमधील नायक हा परिस्थितीशी दोन हात करणारा राहिला आहे. - मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्याचे ते उदघाटक होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह दलित शोषितांच्या चळवळीत आणि जातीअंताच्या लढ्यातील ते सक्रिय कार्यकर्तेही होते. त्यामुळे एका जातीपूरते किंवा समाजामध्ये ते कधीच अडकले नाही. अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले त्यांच्या साहित्यामुळे अण्णाभाऊ देखील वैश्विक झाले आहेत.अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या १ आग २ आघात ३ अहंकार ४ अग्निदिव्य ५ कुरूप ६ चित्रा ७ फुलपाखरू ८ वारणेच्या खोऱ्यात ९ रत्ना १० रानबोका ११ रुपा १२ संघर्ष १३ तास १४ गुलाम १५ डोळे मोडीत राधा चाले १६ ठासलेल्या बंदुका १७ जिवंत काडतूस १८ चंदन १९ मूर्ती २० मंगला २१ मथुरा २२ मास्तर २३ चिखलातील कमळ २४ अलगुज २५ रानगंगा २६ माकाडीचा माळ २७ कवड्याचे कणीस २८ वैयजंता २९ धुंद रानफुलांचा ३० आवडी ३१ वारणेचा वाघ ३२ फकिरा ३३ वैर ३४ पाझर ३५ सरसोबतअण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे.अण्णाभाऊंचे दुर्मिळ छायाचित्र

मुंबईत गिरणी कामगारांमुळे डाव्या चळवळीकडे वळलेल्या अण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊंना कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान जवळचे वाटत होते. त्यांनी 1944 मध्ये लालबावटा कला पथक स्थापन केले होते. हे नाव त्यांनी मार्क्स तत्वज्ञानावरुनच घेतले होते. त्यांना कॉर्मेड म्हटलेले आवडायचे. त्यांच्या डाव्या चळवळीकडील ओढ्यामुळेच ते 1963 साली मॉस्कोला गेले. ते तिथे जाण्याआधी त्यांचे साहित्य, त्यांचे पोवाडे तिथे पोहचलेले होते. अण्णाभाऊ मॉस्कोमध्ये गेल्यानंतर त्यांचे मोठे स्वागत झाले. तिथेही त्यांनी आपली कला सादर केली.

कार्ल मार्क्स आणि डाव्या चळवळीकडे अण्णाभाऊ झुकलेले असले, तरी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी येथील दबलेल्यांचा आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत असे सांगितले. शोषित, दलितांच्या उद्धारासाठी आंबेडकरी तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितले. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव... या त्यांच्या कवनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञानच महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवले. त्यांची प्रसिद्ध आणि अनेक आवृत्या निघालेली फकिरा ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेबांना अर्पण केली आहे.

- अण्णाभाऊ साठे यांनी 35 हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. - अण्णाभाऊ साठेंच्या कथा आणि कादंबरीमधील नायक हा परिस्थितीशी दोन हात करणारा राहिला आहे. - मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्याचे ते उदघाटक होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह दलित शोषितांच्या चळवळीत आणि जातीअंताच्या लढ्यातील ते सक्रिय कार्यकर्तेही होते. त्यामुळे एका जातीपूरते किंवा समाजामध्ये ते कधीच अडकले नाही. अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले त्यांच्या साहित्यामुळे अण्णाभाऊ देखील वैश्विक झाले आहेत.

अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या १ आग २ आघात ३ अहंकार ४ अग्निदिव्य ५ कुरूप ६ चित्रा ७ फुलपाखरू ८ वारणेच्या खोऱ्यात ९ रत्ना १० रानबोका ११ रुपा १२ संघर्ष १३ तास १४ गुलाम १५ डोळे मोडीत राधा चाले १६ ठासलेल्या बंदुका १७ जिवंत काडतूस १८ चंदन १९ मूर्ती २० मंगला २१ मथुरा २२ मास्तर २३ चिखलातील कमळ २४ अलगुज २५ रानगंगा २६ माकाडीचा माळ २७ कवड्याचे कणीस २८ वैयजंता २९ धुंद रानफुलांचा ३० आवडी ३१ वारणेचा वाघ ३२ फकिरा ३३ वैर ३४ पाझर ३५ सरसोबत

अण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे.

अण्णाभाऊंचे दुर्मिळ छायाचित्र
X
COMMENT