Home | Divya Marathi Special | dr. vrunda bhargav write about Marathi language day special

मराठी भाषा दिन विशेष; समाज माध्यमांची ‘ग्लाेकल’ मराठी

डाॅ. वृंदा भार्गवे | Update - Feb 27, 2018, 08:28 AM IST

भारतात चाैथ्या तर जगभरात पंधराव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा अाता समाज माध्यमांच्या माध्यमातून ग्लाेकल हाेऊ लागली अा

 • dr. vrunda bhargav write about Marathi language day special

  भारतात चाैथ्या तर जगभरात पंधराव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा अाता समाज माध्यमांच्या माध्यमातून ग्लाेकल हाेऊ लागली अाहे.ग्लाेबल तंत्र अाणि लाेकल भाषा यातून एक नवीनच ‘ग्लाेकल मराठी’ रुजत अाहे. त्यामुळेच तिच्या वापराच्या कक्षा रुंदावत चालल्या अाहेत. या वाटचालीत समाज माध्यमांवरही ती प्रमाणभाषाच असावी असा अाग्रह अाता मागे पडून ‘तुम्हाला जशी येते तशी मराठी’ अशा अाविर्भावात तिचा वापर हाेताे अाहे. हा वापर किती याेग्य, किती अयाेग्य, त्याचा उपयाेग अाणि परिणाम यावरचा हा प्रकाशझाेत...


  मराठी ‘फॉरवर्ड’ झाली
  संकेतस्थळावर प्रकाशित होणा-या काही साहित्याचा दर्जा अपरिपक्व वाटतो. चमकदार शब्द वापरण्याच्या नादात अर्थाला गंभीर धोका पोहोचतो हेे लक्षात घेतले जात नाही. भडक संदेश आणि भडक भाषा हा समाज माध्यमांतील सिद्धांत समाजावर थोपविला जात आहे.


  यु निकोडची चावी साडपली आणि समाज माध्यमांवर मराठीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. ज्यांना ही भाषा संकेतस्थळांवर वापरता आली त्यांची प्रतिभा अनेकांना अचंबित करून गेली. गेल्या एक-दोन वर्षात, असंख्य मराठी समाज माध्यमक (समाज माध्यमावर वारेमाप लेखन करणारे) निर्माण झाले. या साऱ्यांना अभिव्यक्त व्हायचे आहे. वेबसाईट, यू ट्यूब, ब्लॉग्ज, फेसबुक, वॉट्सअप पाहाणाऱ्या, वाचणाऱ्यांना काय आवडेल हे ठरल्यावर, भाषेला दुय्यम स्थान असणार हे गृहीत धरायला हवे असे यांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे सोशल मीडिया हे लोकशाहीवादी माध्यम आहे. त्यामुळे मराठीवर व्याकरणिकदृष्ट्या काय परिणाम होतो, तिची कशी मोडतोड होते यावर काथ्याकूट होऊ नये असे अनेकांचे मत आहे. समाज माध्यमांचा विचार करता, ट्विटर वगळता अन्य माध्यमांवर मराठीतून विचार मांडण्याचे आणि देवाणघेवाणीचे प्रमाण वाढले आहे.


  विविध संकेतस्थळांवर मराठीमध्ये भरपूर साहित्य निर्माण झाले आहे. मराठी ब्लॉगर्सचा ‘मिसळ पाव’ ही वैचारिक खाद्य असणाऱ्यांना पर्वणी आहे. नुकतेच विराजमान झालेले ‘बिगूल’ हे पोर्टल किंवा ‘मराठी ब्लॉग जगत’, ‘मराठी ब्लॉगर्स’, ‘भुंगा’, ‘बृहत्कथा’, ‘शब्दवेल’, ‘खाईन पण तुपाशी’ ‘संदिग्ध अर्थाचे उखाणे’, ‘संजोपराव’, ‘दृष्टीआडची सृष्टी’, ‘आदिताल’, ‘रेषेवरची अक्षरे’ अशी अनेक नावे मराठीला समृद्ध करणारी. मराठी ही माझी भाषा आहे आणि मला हा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करावयाचा आहे, अशी भूमिका यातील अनेकांनी घेतली आहे. मिथिला पालकरचे ‘महाराष्ट्र देशा’ हे गीत या अस्मितेतून निर्माण झाले. कास्टिंग काऊच विथ अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी किंवा आपल्या बापाचा रस्ता किंवा स्ट्रगलर साला या वेब सिरीज शिवराळ मराठीचाच वारेमाप उपयोग करतात. यात असभ्य, अश्लिल शब्दांना प्रतिष्ठा मिळते. भडक संदेश आणि भाषा हा समाज माध्यमांतील सिद्धांत समाजावर थोपविला जात आहे. शेवटी भाषा ही शब्दांनी बनते आणि शब्द हे अमूर्त विचारांचे प्रतीक असतात. तसेच भाषेचा आणि संंस्कृतीचा थेट संबंध असतो. हे सारे लक्षात घेता, नव्या शब्दांचा शोध घेणे आणि ते रुजवणे अगत्याचे आहे. सध्या इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषा एकत्रच वापरल्या जात आहेत. परंतु, त्यातील सर्जनशीलता नष्ट व्हायला नको असे वाटते. अर्थ, आशय पोहोचला ना.. मग चर्चा नको .. या मानसिकतेचा गंभीर होवून विचार व्हायला हवा. समाजमाध्यमांवरील मराठीचा रंजन ते सृजन असा प्रवास झाला तर तो साऱ्यांच्याच हिताचा ठरेल.


  - डाॅ. वृंदा भार्गवे

Trending