आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार तर स्थापन झाले, जुगाडही सुरूच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण धूर्त लोकांचे आश्रयस्थानच... इंग्रजी साहित्यातील महर्षी शेक्सपिअरचे हे मत अाहे. माझे राजकीय भाष्य आपल्यार्पंत पोहोचावे अशी देशातील सर्वात मोठे व प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर/ दिव्य मराठी’ची इच्छा आहे. माझ्या टिप्पणीपूर्वी मला माझ्या ज्या बालमित्राचे ज्ञान ऐकून घ्यावे लागते ते म्हणजे ‘हाजी पंडित’! आश्चर्य वाटू देऊ नका, कारण  हे राजकीय तज्ज्ञ नाहीत, फक्त अलिप्त व तटस्थ भावनेने राजकीय मत मांडतात.म्हणूनच बिचारे लहानपणीच्या माझ्या इतर राजकीय मित्रांसारखे ते धोकेबाज आणि स्वार्थी नाहीत...

 

‘हाजी पंडित’चे आजोबा इंग्रजांच्या काळात अनेक श्रीमंतांना तीर्थयात्रेवर घेऊन जात. हाजी पंडितचे पिता बसेसर पंडित यांचेही प्रस्थ होते. छोटेसे घरवजा बांधकाम, त्यात चार खुर्च्या, एक पलंग आणि पत्र्याच्या बोर्डवर छुट्टन पेंटरने रंगवलेले ‘श्री बृज तीर्थ-यात्रा संस्थान’रूपी जुगाड... आमच्या गल्लीत ‘तीर्थ कंपनी’ म्हणून याचा लौकिक होता. आता आपली जिज्ञासा नेत्यांच्या भाषणासारखी मर्यादा ओलांडू नये म्हणून मुद्द्यावर  अर्थात हाजी पंडितवर येतो. वास्तविक आपल्या तीर्थयात्रा व्यापारात पित्याची अचानक  रुची संपल्यामुळे पंडितला कमी वयातच पित्याचा व्यवसाय सांभाळावा लागला. पंडित यांचे पूर्ण नाव कृष्णगोपाल कौशिक. लहानपणी ते घरी लाडके होते.

 

तारुण्यातही त्यांची ख्याती होती. गल्लीतील लोक, नातेवाइकांत हाजी पंडित कान्हा, कृष्णा, गुपाल, किरसन नावाने प्रसिद्ध होते. आपल्या मुस्लिम ग्राहकांना यशस्वी हज यात्रा घडवून आणण्यातही त्यांचा हातखंडा. आता तर त्यांचे नाव हरिद्वारमधील हॉटेलांपासून गंगासागरमधील धर्मशाळांपर्यंत, दिल्लीतील हज-टर्मिनलपासून सौदीमध्येही चर्चिले जातेे. त्यांच्या टिप्पणींचा उल्लेख याकरिता कारण, सकाळी दुकान उघडताना किंवा सायंकाळी परतताना हाजी पंडित माझ्या घरी असतातच. मी घरी असो वा नसो, पत्नी, मुले, आई-वडील कुणीच नाही भेटले तर बागकाम करणारा माळी किंवा खानसामाशी तरी गप्पा मारणार. अशा प्रकारे  समोर असलेल्या व्यक्तीस किमान अर्धा तास तरी हाजीभाईंचे प्रवचन ऐकावेच लागते.

 

आज सकाळी ते असेच अचानक धडकले आणि बडबडू लागले, ‘हे कर्नाटकचे नाटक पहिल्या भागासारखेच निवडणुकीनंतरही तेवढेच रंजक झालेय. लक्षात ठेवा, ही नौटंकी एकोणिसच्या लोकसभेच्या तोंडावर  संपूर्ण अठरा पर्व असलेल्या महाभारताच्या रूपात बदलेल... आणि तुम्ही महाकवी (मला टोमणे मारण्यासाठी त्यांच्याकडे ज्या उपाध्या आहेत त्यातील महाकवी ही उपाधी म्हणजे अचूक बाणच...) ना दक्षिणचा विचार करताय ना दक्षिण पंथाचा’

 

ते म्हणाले, या लोकांच्या ‘सत्यनिष्ठा आणि इमानदारीला तरी काय म्हणावे?’ आता मी गप्प बसू शकलो नाही. मी म्हणालो, ‘आता कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर गव्हर्नर साहेब तरी काय करतील हाजीभाई? तुम्ही उगाच ‘लोकशाही धोक्यात आहे’सारख्या फोबियाने ग्रासले आहात.’ ते म्हणाले, ‘तुमचेही म्हणणे बरोबरच आहे म्हणा... कर्नाटकात सत्तेची 
छोकरी अनैतिक निघाली तर भाजपाई शिटी मारू लागले आणि काँग्रेस यावर काय करणार? त्यांनी स्वत:च साठ वर्षांत लोकशाही आणि तिच्या नैतिकतेला चौकात मांडले आहे... आणि तुमच्यातील धडाडी, पात्रतेला याच काँग्रेसचा १०० कोटींचा अजगर गिळंकृत करून बसला.’ मी म्हणालो, ... आता तर बहुमत चाचणीही झाली आहे, उगाच कशाला गावभर ढिंडोरे पिटताय?’ ते म्हणाले, ‘बहुमताचे तर विचारूच नका. बिचाऱ्या राहुलला बहू मिळेना, बहुमतही कसेबसे जुगाड लावून मिळते, आणि इतर ना बहूचे ऐकतात ना बहुमताचे! जाऊ द्या, आपल्याला काय त्याचे? निघतो, कर्नाटकात बड्या-बड्यांनी दुकाने थाटली, आता आम्ही आमचे दुकान तरी सजवतो...

 

तोपर्यंत हे महाकवी, एक शेर तर ऐक...’
(हाजी पंडितने हिंदीतून शेर ऐकवला)
‘वोटर ये सोचता है कि 
एमएलए जो चुना, 
उनका कबाड़ है 
या वो इनका कबाड़ है?
उन्नीस के नाटक का 
रिहर्सल है कर्नाटक, 
सरकार बन गई है 
पर जारी जुगाड़ है!’

बातम्या आणखी आहेत...