आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष; अाग्रह करणारेच अडखळतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी प्रमाण भाषा बोलणारे लोक सोशल मीडियावर आल्यावर ड्यूडवाली भाषा बोलायला लागले नाहीत. सोशल मीडियाशिवाय एरवीही त्यांची व्यक्त होण्याची भाषा प्रमाण मराठी ही नव्हतीच.म्हणूनच सोशल मीडियावरील ड्युडवाली भाषा त्यांना सोयीची आणि सुलभ वाटली. 


‘स माजमाध्यम’ हा शब्दच खरं तर सोशल मीडियावर कुणीही वापरत नाही. मराठी भाषेचे टोकदार अभिमानी लोक सोडले तर बहुतेक लोक सोशल मीडिया हाच शब्द वापरतात. 


सोशल मीडिया आणि मराठी भाषा या विषयाची सुरुवातच इथून होते असे मला वाटते. इथे हट्टाने मराठी टायपिंग करणारे असतात तसे whtaapवालेही असतात. त्यामुळे सोशल मीडियामुळे मराठी भाषा बिघडली आहे या आरोपात काहीही अर्थ नाही. सोशल मीडियामुळे सर्वच भाषांचा ढाचा बदलत चालला आहे आणि मराठीही याला अपवाद नाही हे खरे. जसे मराठी अशुद्ध लिहिणारे खूपजण आहेत तसेच इंग्रजीही अशुद्ध लिहिणारे भरपूरजण आहे. 


सोशल मीडियामुळे मराठी भाषेतील रोजच्या वापरातील शब्द मागे पडून त्यांची जागा इंग्लिश शब्द येवू लागले आहेत यात शंका नाही. सराव, मैदान, वेळ, उशीर याऐवजी प्रँक्टीस, ग्राउंड, टाईम, लेट हे शब्द बोली भाषेतही वापरले जाऊ लागले आहेत. हा फक्त फक्त सोशल मीडियातील नाही तर लोकांच्या जगण्यातील बदल आहे. रोजच्या बोलण्यातच इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. सोशल मीडियामुळे मराठी भाषा बिघडली की सुधारली याचा विचार करता, मुळात बिघडणे म्हणजे काय आणि सुधारणे म्हणजे काय याच्या व्याख्या ठरवाव्या लागतील. आणि याचे काही गणिती उत्तर नाही. 


आपण जर प्रमाण भाषेबद्दल बोलत असू तर ती बिघडली आहे असेच वाटते. परंतु, त्याची कारणे सोशल मीडियापेक्षा इतरही अनेक आहेत. एरवी प्रमाण भाषा बोलणारे लोक सोशल मीडियावर आल्यावर ड्यूडवाली भाषा बोलायला लागले नाहीत. सोशल मीडियाशिवाय एरवीही त्यांची व्यक्त होण्याची भाषा प्रमाण मराठी ही नव्हतीच. म्हणूनच सोशल मीडियावरील ड्युडवाली भाषा त्यांना सोयीची आणि सुलभ वाटली. प्रमाण मराठीपेक्षा ती त्यांनी त्वरित आत्मसात केली आणि उपयोगातही आणली हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. उलटपक्षी, एरवी लिखाणासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरणारे लोक सोशल मीडियावरील तथाकथित अप्रमाण किंवा बोली भाषेबाबत अधिक अडखळू लागले आहेत. खरे तर सोशल मीडियाच्या वापरामुळे बोली मराठीचा वापरही वाढला आहे. बोली भाषेच्या वापरामुळे मराठीचा ऱ्हास होतो या आरोपात काहीही तथ्य नाही.  तेच सूत्र सोशल मीडियालाही लागू पडते. शेवटी, पातेलं म्हटलं की सुधारलेली मराठी आणि भगुनं म्हटलं तर बिघडलेेली मराठी हे ठरवणारे आपण कोण? 


- गाैरी पटवर्धन 

बातम्या आणखी आहेत...