आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेचा ताण घेतला नाही तरच मिळतील अधिक गुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शभरात सध्या विविध परीक्षा सुरू अाहेत. त्यांची तयारी करत असताना विद्यार्थी तणावाचा सामनाही करत अाहेत. फोर्टिस हेल्थकेअरच्या पाहणीनुसार ७० % विद्यार्थी परीक्षा व त्यापूर्वीच्या काही अाठवड्यांत पूर्ण झाेप घेत नाहीत. त्यापैकी १८ % विद्यार्थी केवळ तीन ते पाच तास झाेप घेतात; परंतु कमी झाेपेचा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर वाईट परिणाम हाेत असताे. तज्ज्ञांनुसार परीक्षेत चांगली कामगिरी हाेण्याची चिंता व नातेवाइकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या तणावामुळे विद्यार्थी परीक्षेच्या ताणाचे शिकार हाेतात. भारतीय वैद्यकीय संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. के.के.अग्रवाल यांच्या सल्ल्यानुसार परीक्षा या भविष्यातील यश निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात; परंतु त्यासाठी गरजेपेक्षा अधिक तणाव घेतल्याने काम बिघडू शकते. परीक्षेत नैराश्य येणे सहज अाहे; परंतु परीक्षेदरम्यान याबाबत कुटुंबीय व मित्रांशी चर्चा करणे हेदेखील गरजेचे अाहे. तसेच छोटे-छाेटे ब्रेकही घ्या. परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंत त्याचीच चिंता करू नका. मजबूत तयारीसह जर तुम्ही ताणाचे व्यवस्थापनही केले, तर निकाल अपेक्षेपेक्षा अधिक चांगला लागेल.

 

तणावापासून दूर राहण्यासाठी असे बनवा स्वत:च्या अभ्यासाचे वेळापत्रक... 

याेग्य ते नियाेजन करा
परीक्षा सुरू झाली असेल तरीही स्वत:साेबत अधिक कठाेर हाेऊ नका. या काळासाठी तुमच्याकडे एक शॉर्ट प्लॅन असला पाहिजे, जाे तुम्हास महत्त्वाचे मुद्दे पाठांतरासाठी मदत करू शकेल. येथे एका निश्चित टाइमलाइनमुळेच यश मिळेल. जे मुद्दे कव्हर करू शकले नाहीत, त्यांची चिंता करू नका. ते मजबूत करा, ज्यासाठी तुम्ही चांगली तयारी केलीय.

 

स्टिकी नोट्सचे घ्या साह्य 
अनेक संशाेधनातून हे सिद्ध झाले अाहे की, विद्यार्थ्यांना स्वत:च लिहिलेल्या नोट्स जास्त लक्षात राहतात. तसेच रंगीत चिकटवल्या जाणाऱ्या नोट्सवर लिहिलेले फाॅर्म्युलेही दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामुळे अशा नोट्सवर महत्त्वाचे मुद्दे, सूत्रे अादी लिहून अभ्यासाचे टेबल व भिंतीवर चिकटवा. ही लक्षात ठेवण्याची परिणामकारक पद्ध अाहे, जी तुम्हास कामी येईल.

 

अभ्यासाच्या स्राेतांत बदल
अनेकदा सातत्याने एकाच साधनाद्वारे अभ्यास केल्याने कंटाळा येऊ लागताे. त्यामुळे अभ्यासाच्या पद्धतीत बदल करण्यासह स्राेतदेखील बदलले जाऊ शकतात. पुस्तके व नोटबुक्सशिवाय विषयााशी संबंधित यू-ट्यूब चॅनलही पाहू शकता. याव्यतिरिक्त अनेक संकेतस्थळे ऑडिअाे लेक्चरची सुविधाही देतात. त्यामुळे तुम्हास एेकून समजून घेणे साेपे जाईल.

 

सादरीकरणातून मजबूत करा स्वत:चा सराव
जेव्हाही एखाद्या मुद्द्याची तयारी कराल, तेव्हा त्याचा सराव अशा सादरीकरणाच्या रूपात करा, जसे तुम्ही परीक्षेत उत्तरपत्रिकेवर लिहीत अाहात. प्रश्नांच्या उत्तरांतूनही तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे. सर्व उत्तरे शक्य असेल तेवढे फॅक्ट्स व अाकडेवारीसह देण्याचा प्रयत्न करा. याशिवाय प्रत्येक मुद्द्यासाेबत तर्कदेखीलद्या. या पद्धतीने तुमचे गुण वाढण्यास मदत मिळेल.

 

ही अाहेत तणावाची मुख्य कारणे :
- काही दिवसांतच वर्षाच्या पूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करण्याचा प्रयत्न.
- परीक्षेत चांगल्या कामगिरीची अनिश्चितता

- कुटुंबाच्या अपेक्षांचे अाेझे व मित्रांशी तुलना होण्याची भीती

- उत्तम महाविद्यालय वा अभ्यासक्रमास प्रवेशाचे मापदंड चांगले गुण असणे.

 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
शारीरिक लक्षणे :
हृदयाचे ठाेके वाढणे, मांसपेशींमध्ये हलकासा तणाव, खूप घाम येणे, भीती वाटणे, डाेके जड हाेणे, ताेंड काेरडे पडणे, थकवा, भूक कमी लागणे.
 
वागणुकीसंबंधी लक्षणे : कामे टाळण्याची वृत्ति, लोकांपासून दूर राहणे, छोट्या-छोट्या बाबींवर राग येणे, स्वत:ची पर्वा न करणे, स्वत:ला नुकसान पाेहाेचवणे, रडावेसे वाटणे, चिडचिड.  

 

तयारीच्या पद्धतीत करा थोडा फार बदल
- एकाच वेळी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वाचू नका. प्रत्येक सेशनदरम्यान पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक जरूर घ्या.
- एकाच वेळी अनेक मुद्दे मेंदूत जमा करू नका. तसेच सर्व कठीण मुद्दे एकदम वाचू नका व सर्व साेपे मुद्देदेखील कव्हर करू नका.
- की-वर्ड‌्सना अधाेरेखित करा. त्यामुळे तुमच्या मेंदूत एक चित्र तयार हाेईल व परीक्षेत ते की-वर्ड लक्षात येऊन संपूर्ण उत्तर अाठवेल. प्रवाही तक्ते अाणि ग्राफिक्सची मदत घ्या.

 

बातम्या आणखी आहेत...