Home | Divya Marathi Special | Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

हे आहे शंभूराजांचे जन्मस्थळ, इतिहासातील एका तहासाठी प्रसिद्ध आहे किल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 11:05 AM IST

संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  पुणे - इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. या किल्ल्याला वज्रगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावरच झाला होता. या किल्ल्यावर काही दिवस पेशव्यांची राजधानीही होती. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

  पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून अत्यंत सुरक्षित असा मानला जात होता. गडावर मोठ्या प्रमाणावर शिदोरी राहू शकत होती. तसेच दारूगोळा आणि धान्याचा साठा करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता, त्यामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते. या किल्ल्याच्या तीन बाजुंना दुर्गम परिसर होता.

  किल्ला साधारणपणे १२०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. १४८९ च्या सुमारास निजामशाहीतील मलिक अहंमदने किल्ला जिंकला. १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठवले तेव्हा याच किल्ल्यातून शिवरायांनी त्याला लढा दिला. पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने फत्तेखानाला पराभूत केले.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या या किल्ल्याची वैशिष्ट्ये आणि इतर माहिती...

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  १६५५ मध्ये शिवरायांनी नेताजी पालकरला सरनौबत नेमले. १६ मे १६५७ ला संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पण मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. त्यानंतर झालेल्या युद्धात मुरारबाजी पडला. त्यामुळे राजांना तह करावा लागला. हाच तो प्रसिद्ध पुरंदरचा तह. या तहात राजांना २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.​

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंजेबाने किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. १६९५ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पेशव्यांना दिला. या किल्ल्यावर अनेक दिवस पेशव्यांची राजधानी होती. 

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  बिनी दरवाजा - पुरंदर माचीवरील हा दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना लागतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. सरळ पुढे लष्कराच्या बराकी आणि काही बंगले आहेत. पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी मंदिर दिसते त्याचे नाव 'पुरंदरेश्र्वर'.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  रामेश्र्वर मंदिर - पुरंदरेश्र्वर मंदिराच्या मागील कोप-यात पेशवे घराण्याचे रामेश्र्वर मंदिर आहे. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्र्वनाथ यांनी बांधलेला एक वाडाही दिसतो. 

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  खंदकडा - तिसऱ्या दारातून आत गेल्यावर डावीकडे पूर्वेला गेलेला एक कडा दिसतो. तोच खंदकडा. त्याच्या शेवटी असलेला बुरूज पाहून परत यावे. पुढे जाताना रस्त्याच पाण्याचे टाके लागतात. रस्त्यात अंबरखान्याचे अवशेष दिसतात. पूर्वी या दरवाजाला फार महत्त्व होते.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  पद्मावती तळे - मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तळे आहे. 

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  शेंद-या बुरूज - पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याचे नाव शेंद-या बुरूज.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  पुरंदरेश्र्वर मंदिर - हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  दिल्ली दरवाजा - उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजाच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. दरवाजा सुस्थितीत आहे. आत उजवीकडे आणखी एक दरवाजा आहे. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुस-या टोकापर्यंत जाते. त्या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. 

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  केदारेश्र्वर - केदार दरवाजातून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर पायऱ्या लागतात त्या थेट केदारेश्र्वराच्या मंदिरापर्यंत जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्र्वर. येथे महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनाला येतात. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  पुरंदर माची - आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाजातून जाणा-या वाटेने थेट पुढे यावे. म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहचतो. वाटेत वाड्यांचे अनेक अवशेष दिसतात.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  भैरवखिंड -याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून चालत गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.

   

 • Purandar Fort Birth Place Of Sambhaji Maharaj

  वीर मुरारबाजी -बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.

Trending