Home | Divya Marathi Special | Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराजांच्या काळातील चलनाला म्हटले जाते 'शंभुराई', असे होते स्वरुप

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 10:41 AM IST

आधीचे चलन सुरू ठेवले त्यात छोटा कार्यकाळ यामुळे संभाजी महाराजांचे हे चलन अत्यंत दुर्मिळ आहे.

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 1681 मध्ये झाला. त्यानंतर संभाजी महाराजा राज्याचा कारभार पूर्णपणे चालवू लागले. राज्य चालवण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे असते ते चलन. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तयार केलेले शिवराई हे चलन पुढे सुरू ठेवले. पण त्याचबरोबर संभाजी राजांनी स्वतःचीदेखिल काही नाणी पाडून घेतली. पण आधीचे चलन सुरू ठेवले त्यात छोटा कार्यकाळ यामुळे संभाजी महाराजांचे हे चलन अत्यंत दुर्मिळ आहे.

  छत्रपती शिवाजी महाराजांचे चलन म्हणजे शिवराई ही सोने, चांदी, रुप्य आणि ताम्र अशा स्वरुपातील नाण्यांमध्ये होते. संभाजी महाराजांच्या चलनातील मात्र केवळ ताम्र नाणी सापडली. सध्याचे अभ्यासक संभाजी महाराजांच्या या चलनाला शंभुराई असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपतींच्या चलनाबाबत आणखी तपशीलवार माहिती.

  पुढील स्लाइड्सवर, संभाजी महाराजांचे चलन शंभुराईमधील नाण्यांबाबतची माहिती.


  (औरंगाबादचे आशुतोष पाटील शिवकालीन नाण्यांचा अभ्यास करतात. त्यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.)
  फोटो सौजन्य - किरण करांडे, प्रशांत ठोसर, किरण शेलार, अमीत लोमटे आणि विनय चुंबळे

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  संभाजी महाराजांच्या काळातील नाणी ही शिवाजी महाराजांच्या नाण्यांसारखीच होती. फक्त त्यावर समोरच्या बाजुला 'श्री/ राजा/ शिव' ऐवजी 'श्री/ राजा/ शंभु' असे लिहिलेले असून मागे दोन्ही नाण्यांवर 'छत्र/ पति' असे कोरलेले दिसते. 
   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  संभाजी महाराजांचे उपनाव 'शंभु' असल्याने पूर्ण संभाजी ऐवजी 'शंभु' असे कोरले असावे. या ताम्र नाण्याचे वजन 10 ते 12 ग्रॅम पर्यंत आढळते. नाण्यांचे वजन त्यावरील अक्षराचे वळन त्यावरील बिंदुमय वर्तुळ हे शिवछत्रपतिंच्या नाण्याप्रमाणेच आढळते.

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  संभाजी महाराजांची नाणी ही धातुवर हातोड्याने ठोकुन बनवल्यामुळे त्यावरील काही अक्षरे ही नाण्याबाहेर गेलेली  असतात. या प्रकारे पाडलेल्या नाण्यांना क्रुड कॉईन्स म्हणतात.

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  राजा सिव, राजा सीव
  शिवाजी महाराजांच्या काही नाण्यांवर आपल्याला लेखनात बदल आहे. 'शिव'ऐवजी सिव, सीव, शीव असे कोरलेले आढळते. तसेच संभाजी राजांच्या महाराजांच्या नाण्यावरही हा बदल दिसतो. या नाण्यांवर 'शंभु' ऐवजी 'संभु' कोरलेले आढळते. 

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  'श्री/ राजा/ संभु' व 'छत्र/ पति'
  नाणी तांब्याची असुन त्यावर पुढील बाजुनी बिंदुमय वर्तुळात तीन ओळीत 'श्री/ राजा/ संभु' व मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत 'छत्र/ पति' अशी अक्षरे अंकीत केलेले असतात. 

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  उलटा 'छ' 
  या नाण्यावरील 'छत्र' चा 'छ' हा उलटा अंकीत केलेला आहे.  ही नाण्यासाठी डाय बनवणाऱ्याची चूक असावी. काही संग्राहकांनी त्यांवा ही नाणी कोल्हापूर भागात सापडली आहेत असे सांगितले. 

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  श्री अक्षराचे वेगवेगळे वळण 
  श्री/ राजा/ शंभु/ छत्र/ पति लीहीलेल्या या शंभुराईंवर श्री या अक्षराचे दोन विविध प्रकारात लिखाण आढळते. पहिल्या प्रकारात 'श्री' हा साधारण असतो. दुसऱ्या प्रकारात 'श्री' या अक्षरामधुन एक तिरपी रेघ गेलेली असते आणि या नाण्यावर 'श्री' अक्षराच्या च्या बाजुला एक बारीक फुल आलेले आपल्याला दिसते.

   

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  'छत्र' शब्दाच्या वर चांदणी
  आणखी एक नाणे आढळलेले आहे ज्यावर पुढील मागील बाजुचे लेखन समान असुन फक्त त्या नाण्यावर छत्र या शब्दाच्या वर एक चांदणी कोरलेली आहे.

   

 • Story About Currency Of Chhatrapati Sambhaji Maharaj

  संभाजी महाराजांच्या नाण्याचा आणखी एक प्रकार निदर्शनास आलेला आहे. पुढील बाजुला पहिल्या ओळित 'श्रीरा' दुसरऱ्या ओळीत 'जाशं' आणि तिसर्या ओळीत 'भु' अशी अक्षरे आहेत. मागील बाजुला दोन ओळीत 'छत्र/ पति' कोरलेले आहे. अशीच काही नाणी ही शिवाजी महाराजांनी जिंजी भागातून पाडलेली आढळतात. 

Trending