Home | Divya Marathi Special | joy of life will increase by 14 things in new year

नव्या वर्षात या 14 गोष्टी वाढवतील जीवनाचा आनंद, पालटेल तुमचे आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 01, 2018, 06:51 AM IST

२०१८ मध्ये आपले आयुष्य अधिक रोमांचक, सुविधायुक्त व आरोग्यदायी होण्यासाठी काही तंत्रज्ञान व सुविधा आपल्यासाठी येत आहेत. त

 • joy of life will increase by 14 things in new year

  २०१८ मध्ये आपले आयुष्य अधिक रोमांचक, सुविधायुक्त व आरोग्यदायी होण्यासाठी काही तंत्रज्ञान व सुविधा आपल्यासाठी येत आहेत. तुम्ही घरातील काही वस्तू आवाजाने नियंत्रित करू शकाल. बायोमेट्रिक ओळखीचा वाढता वापर होईल. रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ लागतील. यासोबत देशात १००% युजर्स फोरजी डेटा वापरू लागतील.या वर्षी होणाऱ्या अशाच मोठ्या बदलांबाबतची माहिती जाणून घेऊया.

  > या महत्त्वाच्या गोष्टींची छाप

  रेडिओ टॅग: वाहनांना आता टोलवर थांबायची गरज नाही
  रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे आरएफआयडी तंत्रज्ञान स्थिरस्थावर होत आहे. आरएफआयडी टॅग डिसेंबरपासून सर्व नव्या वाहनांत लावणे बंधनकारक केले आहे. टॅगमध्ये वाहनाची, बँकेची माहिती, रिचार्ज रक्कमही असेल. वाहन टोलवरून जाईल तेव्हा खात्यातून पैसे कपात होतील. वाहन थांबवावे लागणार नाही. देशातील ३७० टोल प्लाझावर आरएफआडी रीडर आहेत. त्यात याचा वापर होईल.
  - १५ लाख वाहनांमध्ये मार्चपर्यंत टॅग लावण्याचे उद्दिष्ट आहे.महामार्गावर धावणाऱ्या ४० लाख वाहनांपैकी ६.२० लाख वाहनांमध्ये टॅग लावला आहे.


  प्रथमच देशात एअरबस वैमानिकांना प्रशिक्षण
  देशातील पहिल्या फ्लाइट स्टिम्युलेटरची सुरुवात या वर्षअखेरीस होईल. वैमानिक व विमान देखभाल अभियंत्यांची मागणी पाहता एअरबसने दिल्लीच्या इंदिरा गांधी अांतरराष्ट्रीय विमानतळाजवळ याची स्थापना करण्याचा २०१७ मध्ये निर्णय घेतला.दोन फ्लाइट स्टिम्युलेटरने सुरुवात होईल.८०० वैमानिक व २०० अभियंत्यांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाईल.


  महिला: गाव चांगले व्हावे, यासाठी प्रशिक्षण
  ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या महिला पंचांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे त्या गावातील प्रशासन व्यावसायिक पद्धतीने चालवू शकतील.याची सुरुवात नोव्हेंबर २०१७ मध्ये झाली होती.मार्च २०१८ पर्यंत २५ हजार महिलांना हे प्रशिक्षण मिळेल. देशातील अशा पहिल्याच कार्यक्रमात शिक्षण, वित्त व महिलांशी संबंधित मुद्द्यांशिवाय हलके-फुलके अभियांत्रिकी कौशल्यही शिकवले जाईल. यासोबत सरकारी धोरण व योजना, कायदा, सरकारी कामावर लक्ष ठेवण्याच्या पद्धती आदींची माहिती दिली जाईल.


  >५८ नवी वैद्यकीय महाविद्यालये उघडतील, ११००० काेटी खर्च

  अायअायटीत वाढतील १००० हजार जागा
  - मेडिकल काॅलेजच्या जागा वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न अाहे. तब्बल ११ हजार काेटी रुपये खर्च करून ५८ नवे मेडिकल काॅलेज सुरू केले जातील. याचा फायदा २०१८ या वर्षात विद्यार्थ्यांना हाेईल. वैद्यकीय अभ्यासाच्या जागा वाढतील.
  - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार,शैक्षणिक सत्र २०१८- २०१९ पासून देशभरातील सर्वच अायअायटी संस्थांमध्ये एक हजार जागा वाढू शकतील. सध्या या संस्थांमध्ये १० हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत.
  - उर्दू भाषेतही प्रथमच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळेल. एका याचिकेवर सुनावणीदरम्यान
  सर्वाेच्च न्यायालयाने हे अादेश दिले हाेते.


  ७० मेडिकल काॅलेजमध्ये सुपर स्पेशालिटी ब्लॉक्स बनतील
  सरकार नव्या वर्षात ११ हजार काेटी खर्च करुन ५८ नवीन मेडिकल काॅलेज सुरू करणार अाहे. तसेच ७० मेडिकल काॅलेजांमध्ये सुपर स्पेशालिटी ब्लाॅक्स तयार केले जातील. २०१८ वर्षात त्याचा फायदा मिळेल. ग्रेस मार्क्सचा वाद व प्रश्नपत्रिकेतील चुका टाळण्यासाठी २०१८ पासून जेईई अॅडव्हान्स परीक्षा ऑनलाइनच घेतली जाईल.


  पुढील स्लाइडवर पाहा अधिक माहिती....

 • joy of life will increase by 14 things in new year

  अॅलेक्सा: बोलता-बोलता करता येईल ३०% तंत्रज्ञानाचा वापर 

   

  - ३० हजार अॅलेक्सा कौशल्य आहेत. त्याचा आवश्यकतेनुसार वापर करू शकतो. भारतात अॅलेक्सा स्पीकर्सवर १० हजार कौशल्य केल जाऊ शकतात. उदा.बुकिंग, जेवणाची ऑर्डर आदी.

   

  अॅलेक्सा अॅमेझॉनचे व्हाइस असिस्टंट आहेत. यातून तुम्ही घर स्मार्ट करू शकता.अॅमेझॉनने भारतात अॅलेक्सा एनेबल्ड स्पीकर लाँच केला आहे.  याला जोडणारा बल्ब व प्लग भारतात लाँच झाला आहे. २०१८ मध्ये अॅलेक्साशी कनेक्ट होणारा स्मार्ट स्पीकर बनवणारा बीपीएल भारताचा पहिला ब्रँड ठरेल. यावर संगीत,अलार्म, टायमर्स, कॅलेंडर्स चेक आदी कामे केले जातात. अॅलेक्साच्या मदतीने तुम्ही विद्युत उपकरणे चालू-बंद करण्यापासून शॉपिंगही करू शकाल. गार्टनरनुसार, २०१८ मध्ये ज्या काही तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल त्यापैकी ३०% वापर  बोलून करू शकू. म्हणजे व्हाइस कमांडच्या माध्यमातून हे काम होईल.

   

 • joy of life will increase by 14 things in new year

  शेतकऱ्यांपासून लष्करापर्यंत सर्वांना फायदा पोहोचवणारे ७ नवे उपाय...
   

   

  बंगळुरूमध्ये तयार आयफोन, मिळेल स्वस्त

  अॅपल या वर्षी आयफोन- एसईचा सेकंड जेनरेशन फोन आणत आहे.हा वर्षाच्या मध्यास बाजारात येईल. विशेष म्हणजे, तैवानी कंपनी विस्टर्न बंगळुरूत याचे उत्पादन करेल. म्हणजे हा मेड इन इंडिया अॅपल आयफोन असेल. आयफोन ७ मध्ये वापरलेले फ्यूजन चिपसेट तंत्रज्ञान यात असेल. असे असले तरी हा नव्या आयफोन्सच्या तुलनेत बराच स्वस्त असेल. सुरुवातीची किंमत २९ हजार रुपये असेल.याचा स्क्रीन ४ ते ४.२ इंच असेल. हा ३२ जीबी आणि ६४ जीबीच्या दोन इंटर्नल मेमरी व्हेरिएंट्समध्ये येतील. 

   

  शेतकऱ्यांच्या खात्यांत येईल सबसिडी
  नववर्षात देशभरात शेतकऱ्यांना सबसिडी त्यांच्या बँक खात्यात मिळेल. काही राज्यांमध्ये ही व्यवस्था सुरू झाली आहे. १२ बड्या राज्यांत जानेवारीपासून होईल. केंद्र सरकारच्या गॅस सिलिंडरनंतर ही सर्वात मोठी थेट खात्यात जमा प्रणाली असेल.


  एका क्लिकवर पीएफची माहिती
  आपल्या ईपीएफ खात्यांची पूर्ण माहिती एका क्लिकवर मिळेल. ईपीएफओ पूर्णपणे पेपरलेस होईल. असंघटित क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना भविष्य निर्वाह निधी व विम्याची सुविधा मिळेल.


  ट्रकचालकास एसी केबिन
  १ जानेवारी २०१८ पासून ट्रकचालकांसाठी एसी केबिनची सक्ती केली आहे. परिवहन मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या अधिसूचनेद्वारे ट्रक उत्पादकांना १ जानेवारीनंतर ट्रकमधील एसी केबिन अनिवार्य केली आहे. ज्या ट्रकमध्ये एसी केबिन बसू शकत नसेल त्यात केबिन व्हेंटिलेशन प्रणाली लावणे बंधनकारक केले आहे.


  गुगलपेक्षा अचूक भारताची जीपीएस ‘नाविक’
  या वर्षापासून तुम्ही देशातील कोणत्याही भागाची भौगोलिक स्थिती आणखी अचूक व स्पष्ट पाहू शकाल.रस्त्याचा चांगल्या पद्धतीने शोध घेता येईल. भारताची स्वत:ची जीपीएस प्रणाली या वर्षीच्या सुरुवातीच्या महिन्यांत काम सुरू करेल.‘नाविक’ नावाची ही प्रणाली ७ उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे काम करेल. आता लष्करासमोर कारगिल युद्धासारखी स्थिती येणार नाही.तेव्हा अमेरिकेने जीपीएसची मदत दिली नव्हती.


  साहित्य पाठवणे स्वस्त होेईल
  एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सामग्री पाठवणे जास्त सोयीस्कर होईल. कारण जीएसटी परिषदेने १ फेब्रुवारीपासून ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक-वे बिल लागू लागू करण्याची तयारी केली आहे. म्हणजे जानेवारी संपता संपता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सामान पोहोचवणे खूप सोपे होईल.यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांचाही फायदा होईल.


  ज्येष्ठांची पेन्शनवाढ शक्य
  ज्येष्ठांचे निवृत्तिवेतन किमान रोजगाराच्या ५०% पेक्षा कमी असायला नको, अशी मागणी निवृत्तवेतन परिषदेने पंतप्रधानांकडे केली आहे. सरकारने नुकतेच गरीब ज्येष्ठांची पेन्शन वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर ही मागणी आली आहे.

 • joy of life will increase by 14 things in new year

  ई-केवायसी: बँक खाते वापर हाेईल अंगठ्याच्या ठशाने

  - आधार कार्डधारक अंगठ्याचा वापर करून बँक खात्याचा वापर करू शकतील. यासाठी देशभरातील बँकांत प्रवेशद्वारावरच बायोमेट्रिक सिस्टिम लावली जाईल.


  नेट बँकिंग व एटीएमचा गैरवापर राेखण्यासाठी २०१८ मध्ये नवीन ई-केवायसी पद्धती सुरू करण्याची सरकारची तयारी अाहे. यात ग्राहकांचे बँक खाते बायाेमेट्रिकने 
  (अंगठ्याचा ठसा) वापरता येईल. यामुळे ठिकठिकाणी सह्या करण्याची व वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची झंझट राहणार नाही. यातून पासवर्ड हॅक करून हाेणारी लूटही राेखण्यास मदत हाेईल. अाधार नंबरला जुने खाते अाधार कार्डने लिंक केले जाईल. तसेच नवीन खातेही याच पद्धतीने उघडता येईल. सध्या जुनी खातीही अाधार लिंक हाेत अाहेत. मात्र  ‘ई-केवाईसी’मुळे बँकांचे सर्व्हर अाधार कार्डने पूर्णपणे जाेडले जातील व व्यवहार सुरक्षित हाेऊ शकतील.

 • joy of life will increase by 14 things in new year

  विमानतळ: १० मिनिटांत तपासणी, फेस स्कॅनही आले
  - ७५३ सुविधांचा उपयोग या वर्षी होईल. याद्वारे प्रवाशांचा फायदा होईल.हवाई प्रवासात लगेज कुठे आहे याची जून २०१८ पासून माहिती देणे बंधनकारक होणार आहे.


  या वर्षी मार्चमध्ये बंगळुरूचे केम्पेगा विमानतळ देशातील पहिले आधार आधारित प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीचे विमानतळ होणार आहे. यानंतर विमानतळावर ठिकठिकाणी आयडी कार्ड नव्हे तर केवळ मशीनसमोर हात दाखवावा लागेल. सध्या तपास नाक्यावर सुमारे २५ मिनिटे वाया जातात. आता ही प्रक्रिया १० मिनिटांत होईल. यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. दुसरीकडे देशातील अनेक विमानतळांवर हँड बॅगेज टॅगपासून सुटका झाली आहे. अमेरिकेतील काही शहरांमध्ये सुरक्षा तपासणी फेस स्कॅन आणि व्हिसा स्कॅनच्या माध्यमातून सोईस्कर करण्यात आली आहे.

 • joy of life will increase by 14 things in new year

  देशातील पाण्याखालचा पहिला रेल्वे बोगदा: दरराेज ६ लाख लोक करतील प्रवास, गंगेच्या १३ मीटर खालून धावेल कोलकाता मेट्रो


  तीनशे वर्षे जुन्या काेलकाता शहरातून देशातील पहिली मेट्राे धावली. अाता इथेच देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा उभारण्यात अाला अाहे. जमिनीपासून ३० मीटर व गंगा नदीच्या तळापासून १३ ते १५ मीटर खाली हा बोगदा असेल. हावडा मैदान ते महाकरणपर्यंत १६.५५ किमी मेट्राे प्रकल्प काॅरिडाॅरचा हा बोगदा एक भाग असेल. एप्रिल २०१७ मध्ये सुरू झालेल्या बोगद्याचे काम ६६ दिवसांत जुलैमध्ये पूर्ण झाले. अविश्रांत चाललेल्या या कामावर २५० मजूर, २० अभियंते २४ तास काम करत हाेते. कारण हे काम काही वेळ जरी थांबले असते तर त्या ठिकाणी पुन्हा मातीची भर पडली असती. या संपूर्ण काॅरिडाेरचा ५.७४ किमी हिस्सा जमिनीच्या वर व १०.८१ जमिनीच्या खाली असेल. काॅरिडाॅरचा पहिला टप्पा जून २०१८ मध्ये सुरू हाेईल. ताे साॅल्ट लेक सेक्टर-५ ते फुलबागानला जाेडेल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण हाेईल. या मेट्राे टनेल रस्त्याचा उपयाेग करून दरराेज सहा लाख प्रवासी रेल्वे प्रवास करू शकतील.


  ५२०-५२० मीटर
  चे दाेन बोगदे अाहेत. ५.५. मीटर रुंदी.  गंगा नदीच्या खालून मेट्राे रेल्वेच्या प्रवासासाठी या बोगद्यांचा वापर केला जाईल.

 • joy of life will increase by 14 things in new year

  औषधाप्रमाणे गिळता येऊ शकेल रोबोट 
  एडिबल हेल्थ रोबोट औषधासारखे असतात.धमन्या ब्लॉक झाल्यास हे नॅनोरोबोट तुमच्या गळ्यातून शरीरात जातील व अडथळा नष्ट करतील. हे रक्तप्रवाहात समाविष्ट होऊन रक्तास आवश्यक पोषक तत्त्वही देतात. २०१७ मध्ये व्हंकुव्हरमधील जागतिक परिषदेत स्वित्झर्लंडच्या संशोधकांनी यचे प्रोटोटाइप सादर केली होती. हे रोबोट या वर्षी येऊ शकतील.


  मायग्रेनची वेदना सुरू होण्यापूर्वी अटकाव
  ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी २०१८ मध्ये डोकेदुखी कमी करू शकणारी मोठी बातमी येऊ शकते.टेवा फार्मास्युटिकल व एमजेस, नोव्हार्टिस यांच्यासोबत औषधनिर्मिती करत आहे. यातून मायग्रेन अॅटक रोखता येऊ शकेल. नोव्हेंबरमध्ये याचे उत्साहवर्धक निष्कर्ष मिळाले. न्यू इंग्लंड  जर्नल ऑफ मेडिसीनमधील अहवालात अशाच औषधाचा ऊहापोह केला आहे.
  - ३३% च्या जवळपास भारतीय महिलांना मायग्रेनची समस्या. मायग्रेन पीडितांमध्ये ७५% महिला असतात.


  कोलेस्टेरॉलसाठी सर्वात प्रभावी औषध येणार
  जगात दीर्घकाळापासून सुरू कार्डियोव्हास्कुलर क्लिनिकल ट्रायलचे निष्कर्ष २०१८ मध्ये येतील.ओडिसी नावाच्या या चाचणीवर जगातील हृदयरोग तज्ज्ञांच्या नजरा आहेत. यात पीसीएसके 9 नावाच्या एका नव्या औषधाची चाचणी रुग्णांवर केली जात आहे. हे एलडीएल वा बॅड कोलेस्टेरॉलचा स्तर आश्चर्यकारक पद्धतीने कमी करते. औषध गंभीर रुग्णांवरही परिणामकारकरीत्या काम करते.
  - २0 लाख जणांना देशात दरवर्षी हृदयविकाराचा झटका. शहरी लोकांना ग्रामस्थांच्या तुलनेत धोका तिप्पट जास्त आहे.

 • joy of life will increase by 14 things in new year

  रोबोटिक शस्त्रक्रिया: भारत दुसऱ्या मोठ्या केंद्राच्या दिशेने

  - २०२० पर्यंत वार्षिक २०,000 पेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया होतील. यात  सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया होणाऱ्या अमेरिकेनंतर भारत जगातील दुसरा देश होईल.

   

  - सध्या देशात ५० सर्जिकल रोबोट्स आहेत. यासोबत रोबोटिक शस्त्रक्रियेत हातखंडा असणारे ३०० डॉक्टर्स आहेत. देशात दर महिन्यास ७०० शस्त्रक्रिया रोबोट्सने होतात. देशात रोबोटिक शस्त्रक्रियेला प्रोत्साहन देणाऱ्या वात्तीकुती फाउंडेशननुसार २०१८ मध्ये आणखी १०० डॉक्टरांना अशा शस्त्रक्रियेत प्रशिक्षित केले जाईल.आतार्पंत त्यांनी ३६० सर्जन्सना याचे प्रशिक्षण दिले आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशात रोबोटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ६०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. देशातील द्विस्तरीय शहरे उदा. कोइम्बतूर, नागपूर, मनाली, इंदूरमध्येही रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होईल.

Trending