Home | Divya Marathi Special | Photograph by a fighter pilot

दिव्य मराठी विशेष : लढाऊ वैमानिकाने काढलेले छायाचित्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 01, 2018, 07:22 AM IST

कॉकपिटमधून एखाद्या वैमानिकाने काढलेले छायाचित्र बहुधा तुम्ही पाहिले नसेल. हा हवाई दलाचा सूर्यकिरण चमू आहे. त्याचे घोषवाक

  • Photograph by a fighter pilot

    कॉकपिटमधून एखाद्या वैमानिकाने काढलेले छायाचित्र बहुधा तुम्ही पाहिले नसेल. हा हवाई दलाचा सूर्यकिरण चमू आहे. त्याचे घोषवाक्य ‘ऑलवेज द बेस्ट’ आहे. ते नववर्षात आपलेही होऊ शकते.

    कॉकपिटच्या काचेवरील लायनिंग छायाचित्राला आणखी आकर्षक बनवत आहे. हे स्थळ आहे कर्नाटकमधील बिदर हवाई तळ. २०१८ मध्ये प्रथमच लढाऊ विमान उडवणार असलेल्या महिला वैमानिकांना येथे प्रशिक्षण दिले होते. या चमूत हॉक्स विमान उडवणारे सर्वश्रेष्ठ वैमानिकच असतात. दरवर्षी दोनच वैमानिक निवडतात. ग्रुप कॅप्टन अजित कुलकर्णी म्हणाले की, येथे नेहमीच धोका असतो, त्याच्याशी झुंजण्यात आनंद असतो. हे विशेष छायाचित्र आमचे डिफेन्स कॉरस्पाँडंट डी. डी. वैष्णव यांनी मिळवले आहे.

Trending