Home | Divya Marathi Special | pratish nandi write about Budget 2018

जेटली पुन्हा एकदा आर्थिक नियती बदलण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत

प्रीतीश नंदी | Update - Feb 02, 2018, 03:30 AM IST

अर्थसंकल्पात चांगली गाेष्ट ही अाहे की, शेतकऱ्यांना खूप काही मिळू शकते. किमान हमीभाव वाढवणे, हे भाजपचे खूप जुने अाश्वासन

  • pratish nandi write about Budget 2018

    अर्थसंकल्पात चांगली गाेष्ट ही अाहे की, शेतकऱ्यांना खूप काही मिळू शकते. किमान हमीभाव वाढवणे, हे भाजपचे खूप जुने अाश्वासन अाहे व ते शेवटी पूर्ण झाले ही अाणखी चांगली गाेष्ट. शेतकऱ्यांना नेहमीच दोन्हीकडे चांगले मिळते. याच कारणामुळे अापले इतके सगळे खासदार सांगत असतात की, ते शेतकरी अाहेत. ते आयकर भरत नाहीत व अाता त्यांच्या खरीप पिकांतून त्यांना ५० % लाभ हाेण्याची खात्री अाहे. ही काही वाईट बाब नाही. विशेषत: तेव्हा ज्या वेळी अापल्यापैकी बहुतांश जण व्यवसायात नफा-नुकसान समान करू शकलाे तर स्वत:ला नशीबवान मानतील. अाराेग्य विम्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह अाहे. गरीब कुटुंबे एखाद्या गंभीर अाजारामुळे पूर्णपणे उद‌्ध्वस्त हाेतात. त्यामुळे हे पाऊल राष्ट्रीय अाराेग्य विमा याेजनेचा भाग बनेल, अशी अाशा अाहे. यामुळे कमी उत्पन्न असलेली कुटुंबे हेल्थ केअरच्या वाढत्या खर्चाला ताेंड देऊ शकतील व ती दरिद्री होण्यापासून वाचतील. ईश्वर न कराे अशा स्थितीत ज्या वेळी कुटुंबातील एखाद्या सदस्याला असा अाजार व्हावा, ज्यावर रुग्णालयात दीर्घ लढ्यानंतर िवजय मिळवला जाऊ शकेल.


    मध्यमवर्गीयांना खराेखर काहीच मिळालेले नाही. उलटपक्षी त्यांना कॅपिटल गेन्स टॅक्सही द्यावा लागेल, ज्यामुळे शेअर बाजाराचा उत्साह नष्ट करेल, असे मला वाटते. गुंतवणूकदार शेअर व इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करतील. कमीत कमी सध्या तरी अशीच स्थिती होईल; परंतु बंॅकांचे व्याजदर पाहता माझा अंदाज अाहे की, त्यांच्याकडे इक्विटी म्युच्युअल फंडात अाहे त्या स्थितीत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सेवानिवृत्तांना अंशत: फटका बसेल. त्यांना काही तरी मिळाले अाहे; परंतु असे काहीही नाही की, ज्यामुळे त्यांना पूर्णपणे लाभ मिळेल. वैश्विक चलन व ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत कॉर्पोरेट कर ३५ ते २१ %पर्यंत अाणल्याने ज्या कॉर्पोरेट्सना याची अपेक्षा हाेती ते प्रचंड नाराज झाले अाहेत. मला पूर्ण विश्वास अाहे की, जर अाम्ही कॉर्पोरेट कराला अधिक तर्कसंगत पातळीवर अाणावे लागेल. या पातळीवर की, विदेशी गुंतवणूक इतक्या दूर येऊन भारतात अापला पैसा गुंतवतील; अन्यथा त्यांच्यासाठी भारतात गुंतवणुकीची कारणे कमीच हाेत जातील. १८ टक्केचा अर्थ असेल अधिक गुंतवणूक व अधिक विदेशी गुंतवणुकीचा अर्थ असेल भारतीयांसाठी राेजगारांच्या अधिक संधी, असे मला वाटते.


    अाम्ही भूतकाळाकडून (व उर्वरित जगाकडूनही) अजूनही काही शिकलाे नाहीत की, जितका कमी कर तुम्ही लावाल, तितके चांगले पालन होईल व तितका अधिक कर गाेळा हाेईल. मात्र, भारतात कोणतेही सरकार ही जोखीम घेण्यास तयार नाही. हे दुर्दैवी अाहे. एकंदरीत, अर्थसंकल्प ओके अाहे, ज्यास पुरेसा म्हणता येऊ शकत नाही. कल्पनाहीन, पुरेशा धैर्याचा अभाव; परंतु वाईट तर मुळीच नाही. यास मी तर १०पैकी ४ गुण देईन. अरुण जेटली हे याहून अधिक चांगले करू शकत हाेते, असे मला वाटते. ते स्मार्ट अाहेत. जगात काय चाललेय व भारतीय अर्थ धाेरणावर स्वत:ची छाप साेडू इच्छितील. मात्र, प्रत्येक वेळी स्वत:ला ते असे करण्यापासून का राेखतात, ज्यामुळे भारताची आर्थिक नियती बदलू शकते. याचे मला खूप अाश्चर्य वाटते व हीच बाब मला चिंतित करते.

    - प्रीतीश नंदी, ज्येष्ठ पत्रकार व चित्रपटनिर्माते

Trending