आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या छळप्रकरणी ‘स्टार्टअप गुरू’ला अटक व जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या महेश यांचे वडील लष्करात कर्नल होते. महेश यांचा स्वभाव सुरुवातीपासूनच चंचल होता. अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेले खरे; परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडत विपणन क्षेत्रात आले. विशेष म्हणजे ते अभिमानाने कॉलेज ड्राॅपआऊट असल्याचे सांगतात. महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला तेव्हा त्यांना घरातून हाकलून देण्यात आले होते. शिष्यवृत्तीच्या पैशावर ते सिकंदराबादच्या हॉटेलमध्ये राहत होते. रोज रात्रीचे ५० रुपये भाडे चुकवत होते. वयाच्या १९ व्या वर्षी शिक्षण अर्धवट ठेवून युरेका फोर्ब्जचे व्हॅक्यूम क्लीनर घरोघरी जाऊन ते विकू लागले. त्या काळात बहुतांश लोकांचे मासिक उत्पन्न तीन हजार रुपयांच्या आसपास होते. तेव्हा त्यांना अनेकांनी १०० रुपयांत कार्पेट स्वच्छ करण्यास सांगितले. कंपनीची यासाठी तयारी नव्हती.

 

महेश मात्र तयार होते. यानंतर वर्षभरात स्वत:ची कंपनी स्थापन करून काम सुरू केले.  
यानंतर ते जाहिरात क्षेत्रात आले. त्यांनी हाँगकाँगमध्येही काम केले. त्यांच्या ग्राहकांमध्ये युनिलिव्हर, द इकॉनॉमिस्ट, हॅवलेट पेकॉर्ड, पेप्सी होते. यानंतर एमटीव्हीसाठी शशांक घोष यांच्यासोबत ६ चित्रपट दिग्दर्शित केले. कानमध्ये त्यांना पुरस्कारही मिळाला. महेश यांनी पोर्टलँडमध्ये याहूसोबत काम केले. २००० पासून एंजल फंडिंगमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी प्रवीण गांधी व भारती जेकब यांच्यासमवेत पिन्स्टॉर्म २००४ मध्ये सुरू केले. त्याच काळात एका मित्राने स्वयंसेवी संस्थेसाठी निधी संकलनाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा गुगल एडवर्ड््सची सुरुवातच झाली होती. पहिल्याच प्रयत्नात महेश यांना यश मिळाले. पैसे येऊ लागले. याच पद्धतीने त्यांनी देशात दहा स्टार्टअप्सची फंडिंग केली आणि लोक त्यांना स्टार्टअप गुरू म्हणून लागले. जियोडेसिक, ईझीबाय, करिअर लाँचर, तुल्लीहो व पिंस्ट्रॉमसारख्या स्टार्टअपची सुरुवात केली. गेल्या वर्षी एका लेखिकेने महेश यांच्याविरुद्ध छळ केल्याचा आरोप ठेवला. मात्र, त्यांनी तो नाकारला. राष्ट्रीय महिला आयोगाने महेश यांच्याविरुद्ध अनेक महिलांच्या तक्रारीचा उल्लेख केला तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर त्यांना जामीन मिळाला.  

 

जन्म - ११ सप्टेंबर १९६५  
शिक्षण - केंद्रीय विद्यालय, सिकंदराबादमधून शालेय शिक्षण, उस्मानिया विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यात सोडले 
का आहे चर्चेत - नुकतेच महिलांचा छळ करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या जामिनावर आहेत.  

बातम्या आणखी आहेत...