आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयांची उणीव सर्वात मोठा घटक, द्रमुक घेणार फायदा; रजनी-कमल हसनवर विश्वास कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नईहून सिंधू मधुसूदन यांचा वृत्तांत 
कल्पक्कम येथील अॅटॉमिक रिसर्च सेंटरचे सायंटिफिक ऑफिसर टी. व्ही. मारन सध्या रजनीकांतसारखा लिमिटेड एडिशन चष्मा (काळा) मिळाल्याने उत्साहित आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू न शकल्याचे दु:ख त्यांना आहे. पण आपण रजनीकांत किंवा त्यांच्या पक्षाला मत देणार नाही, असे मारन यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांत जनतेचे मन जाणून घेताना आम्हाला मारन यांच्यासारखी इच्छा असणारे अनेक लोक भेटले. विशेषत: मागास समुदायाशी संबंधित. मारन म्हणाले की, रजनीकांतने ‘कबाली’ चित्रपटापासूनच या वर्गाला आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

 

तरी अडचण ही आहे की रजनीकांत यांचा कल भाजपकडे आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या वादामुळे मागास आणि आदिवासी भाजपबद्दल नाराज आहेत. तामिळनाडूत मागास आणि आदिवासींची लोकसंख्या २२ टक्के असल्याने या वर्गांकडे दुर्लक्ष करता येत नाही. ही संख्या अल्पसंख्याकांच्या संख्येपेक्षा जवळपास दुप्पट आहे.  


हे आहे तामिळनाडूचे खरे चित्र. आधी येथील लोक अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्यांना मत देताना जराही विचार करत नसत. आता तसे नाही. त्यामुळे कमल हसनपुढेही अडचणी असतील. तेही आता निवडणूक मैदानात आहेत. ‘मक्कल निधी मय्यम’ नावाचा पक्ष, झेंडा आणि एका अॅपसह. येथील एक मीडिया आंत्रप्रेन्योर एस. श्रीराम म्हणाले की, हा सुपरस्टारही जनतेत विश्वास निर्माण करत असल्याचे दिसत नाही. चित्रपटात समाजाची खिल्ली उडवत असल्याने ब्राह्मण मतदार त्यांच्यावर विश्वास टाकू शकत नाहीत.

 

या समुदायाची संख्या ३ टक्केच आहे. पण गैर-ब्राह्मण त्यांच्यासोबत असतील, असे म्हणणेही चूक ठरेल. कारण कमल त्यांच्यापैकी नाही. या सुपरस्टारबाबत लोकांशी झालेल्या चर्चेतही आम्ही जातीचा वारंवार उल्लेख केला. आम्ही चकित झालो. पण स्थानिक राजकारणातील तज्ज्ञांनी सांगितले की, दक्षिणेत धर्म अनेक गोष्टी ठरवतो, पण तामिळनाडूत जातीला जास्त महत्त्व आहे. विशेषत: राज्याच्या मध्य आणि दक्षिण भागात. 


सुपरस्टारबाबतचा राज्यातील लोकांचा दृष्टिकोन बदलला असला तरी प्रादेशिक पक्षांबाबतचा दृष्टिकोन बदललेला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजपला या प्रादेशिक पक्षांच्याच खांद्यावर बसून मैदानात उतरावे लागते. त्यापैकी एक म्हणजे जयललितांचा अद्रमुक, तर दुसरा एम. करुणानिधींचा द्रमुक. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१६ च्या विधानसभा निवडणुकीएवढीच मते मिळतील, असा विश्वास द्रमुकच्या नेत्यांना वाटतो. तेव्हा पक्षाला ३१.६% मते मिळाली होती. अद्रमुकबद्दल नाराज असलेली मतेही आपल्याकडे वळतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे. या नेत्यांच्या मते, जयललितांच्या निधनानंतर अद्रमुकमधील गटबाजी पाहता लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अद्रमुकला ४०.८८% मते मिळाली होती.  


कावेरी मुद्द्यावर सरकारच्या चुप्पीमुळेही लोक नाराज   
राज्यातील लोक सत्ताधारी अद्रमुकबद्दल नाराज असल्याचे एक कारण म्हणजे कावेरी पाणी वाटपाच्या  वादावरील निष्क्रियता असेही सांगितले जाते. मात्र, लोक या निष्क्रियतेचा संबंध केंद्रातील भाजप सरकारशी जोडत आहेत. २०१७ मध्ये राज्यात पाणी वाटप वादाच्या मुद्द्यावर सुमारे २४ हजार लहान-मोठी आंदोलने झाली. त्यात कुठलाही मोठा राजकीय चेहरा सहभागी नव्हता. पण कावेरी पाणी वाटपाशी संबंधित वादानंतर ‘गो बॅक मोदी’ कॅम्पेन त्यापैकी एक आहे. त्यामुळेच सुपरस्टार रजनीकांतही सध्या भाजपबाबतचे पत्ते उघड करत नाही, असे म्हटले जात आहे.  

 

मोठ्या पक्षांची अशी तयारी  

भाजपने तामिळनाडूत प्रयत्न सुरू केले आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना तामिळनाडूत भाजपचा चेहरा बनवण्याची तयारी सुरू आहे. त्याशिवाय लहान पक्षांना सोबत आणण्याचीही भाजपची योजना आहे. दुसरीकडे, कर्नाटकात सत्तेत कायम राहिल्याने उत्साहित राहुल गांधी तामिळनाडूचे दौरे करत आहेत. भाजपबद्दलच्या नाराजीचा फायदा घेत आहेत. तुतिकोरीनच्या घटनेसाठीही त्यांनी भाजप, संघाला जबाबदार ठरवले आहे.  

 

लहान पक्षांचीही अपेक्षा  

संघाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे एस. श्रीराम म्हणाले की, विधानसभा-लोकसभा निवडणूक एकत्र झाली तर येथे लहान पक्ष एक-दोन जागा जिंकू शकतात. राजकारणात रस असलेले स्वामिनाथन बाबू याबाबत चिंतित आहेत. ते म्हणाले की, लहान पक्षांना जास्त जागा मिळाल्यास लोकसभेत आमचा आवाज कमजोर होईल. एखाद्या मुद्द्यावर पाठिंब्यासाठी त्यांना एकत्र आणणे कठीण होईल. 

 

बातम्या आणखी आहेत...