Home | Divya Marathi Special | The BJP's focus is on eight crore voters from 18 to 21 years

भाजपचे लक्ष 18 ते 21 वर्षांच्या 8 कोटी मतदारांवर, काँग्रेसची नजर दुसऱ्यांदा मत देणाऱ्या 11 कोटीवर

संतोषकुमार/मुकेश कौशिक, अमितकुमार निरंजन | Update - May 25, 2018, 01:46 AM IST

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. १८ ते २१ वर्षे वयोगटातील पहिल्यांदा मतदान

 • The BJP's focus is on eight crore voters from 18 to 21 years

  नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. १८ ते २१ वर्षे वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या ८ कोटी मतदारांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले, तर दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या ११ कोटी ७२ लाख लोकांवर काँग्रेसची नजर आहे. पक्षाच्या मते हे मतदार नरेंद्र मोदी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत आहेत.
  निवडणूक आयोगाच्या मते, देशात ८७.६७ कोटी मतदार आहेत.

  २०१९ मध्ये मतदारांची ही संख्या वाढून ८९ कोटींवर जाण्याची आशा आहे. २००१ मध्ये १.३० कोटी मुलांचा जन्म झाला. २०१९ मध्ये ही मुले १८ वर्षांचे होतील. पुढील वर्षी नवीन मतदार वाढतील. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवांची संख्या कमीत कमी ८ कोटी होईल. या मतदारांसाठी भाजप युवा मोर्चाकडून विशेष अभियान चालवले जात अाहे. याअंतर्गत २००० मध्येे जन्मलेल्या तरुणांची मतदार यादीत नोंदणी, ‘कॉलेज कनेक्ट’च्या माध्यमातून तरुणांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी जोडले जात आहे. भाजयुमो स्वयंसेवकांसाठी कार्यक्रम सुरू करणार आहे.

  या अभियाना अंतर्गत कोणता तरुण भाजपशी जोडला जाऊ इच्छितो त्याची ओळख पटवली जाईल. यानंतर जिल्हा, विभागीय स्तरावर संमेलन घेतले जाणार आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय सचिव गौरव तिवारी म्हणाले की, जुलैमध्ये मुंबईमधून या अभियानाला सुरूवात केली जाईल. युवा मोर्चा ‘बुथ कनेक्ट’ अंतर्गत सोशल मिडिया आणि विशेषत: व्हाॅटस्अॅपच्या माध्यमातून तरुणांंचे ग्रुप बनवण्याचे काम करणार आहे.


  दुसरीकडे २०१४ मध्ये पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने चांगलाच धडा घेतला आहे. त्यावेळी युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात युवकांत निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा भाजपने घेतला होता. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या ११ कोटींपेक्षा अधिक मतदारांकडे लक्ष केंद्रीत करणे काँग्रेसला फायद्याचे वाटत आहे. काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागातील प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना आम्ही माेदी सरकारच्या पूर्ण न झालेल्या आश्वासनांचे सत्य सांगणार आहोत.

  त्यासाठी आम्ही सोशल मिडियाचा आधार घेणार असून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्यावरही भर असेल. मतदारांशी जोडण्यासाठी पक्षाने ग्रीन रूम टीम बनवली आहे. विशेष बाब म्हणजे या टीममध्ये तरुण महिलांची आहे. या टीममध्ये प्रियंकासह एनएसयूआयच्या रुची गुप्ता आणि काँग्रेस सोशल मिडियाचे काम पाहणाऱ्या दिव्य राम्या स्पंदना सक्रिय आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या टीमच्या संपर्कात आहेत. माध्यम प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि शशी थरूरही याच टीमचा हिस्सा आहेत.


  २०१४ मध्ये ३५% तरुणांचे मत भाजपला, काँग्रेसला मात्र १९% मतदान : निवडणूक आणि धोरण विश्लेषण संस्था सीएसडीएसचे संचालक संजय कुमार म्हणाले की, मागील निवडणुकीत नवीन मतदारांच्या पसंतीचा एक नवीन पॅर्टन दिसला. भाजपला एकूण ३१ टक्के मतदान झाले. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मतदार या पक्षाकडे अधिक झुकले होते. जवळपास ३४ ते ३५% तरुणांनी त्यांना मत दिले. त्याचमुळे मोदींच्या लोकप्रियतेची लाट उसळली होती. काँग्रेसला १९% मतदान झाले. तुलनेत तरुणांचे मत त्यांना तितकेच मिळाले. तरुणांचा पाठिंबा काँग्रेसला जास्त नव्हता; पण तो म्हणावा तितका कमीही नव्हता.

  भाजप -२५ लाख कार्यकर्त्यांशी संवाद
  भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की,
  कर्नाटकात नमो अॅपद्वारे २५ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात १३.५ लाख एससी, एसटी, ओबीसी मोर्चातील, तर ४ लाख शेतकरी आणि उर्वरित युवा-महिला मोर्चाचे कार्यकर्ते होते. नवीन मतदारांना जोडण्यास त्यांना सांगितले गेले. कॉलेजबाहेर स्टॉल लावले, परिसंवाद घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय महासचिव रामलाल म्हणाले.

  काँग्रेस - पर्दाफाश अभियान
  काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागाच्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मागील वेळी भाजपने तरुणांच्या मनातले ओळखल्याचा दावा केला होता. आता पर्दाफाश अभियानाद्वारे त्यांच्या आश्वासनपूर्तीबद्दल सांगितले जाईल. कॅम्पस कनेक्टद्वारे पक्ष सरळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. कर्नाटकमध्ये या मॉडेलवर काम झाले.

  पुढील स्लाईडवर वाचा, २१४ देशांतील लोकसंख्या भारतातील यंदाच्या नव्या मतदारांच्या संख्येपेक्षा कमी

 • The BJP's focus is on eight crore voters from 18 to 21 years
 • The BJP's focus is on eight crore voters from 18 to 21 years

Trending