आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कचऱ्याचा फेरवापर करणाऱ्या साहित्याचा जगातील पहिला कारखाना उभारला.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅपटॉप, स्मार्टफोन, कॉम्प्युटर सर्किट बोर्ड््स हे जेव्हा निकामी होतात तेव्हा तो ई-कचरा होतो. त्याला ३ डी प्रिंटिंगसाठी सिरॅमिक आणि प्लास्टिक फिलामेंट्समध्ये रूपांतरित करणारा जगातील पहिला कारखाना आयआयटी कानपूरमध्ये शिकलेल्या वीणा यांनी उभारला आहे.त्या ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्समध्ये मटेरियल सायंटिस्ट आहेत. २०११ मध्ये विज्ञानावर काम करण्यासाठी प्रवासी भारतीय महिला आहेत. भारतीय विज्ञान अकादमीचा प्रतिष्ठित ज्युबिली प्रोफेसरशिप हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला. त्या ऑस्ट्रेलियात सर्वाधिक इनोव्हेटिव्ह इंजिनिअर मानल्या जातात. ऑस्ट्रेलियाच्या प्रथम १०० इनोव्हेटिव्ह विजेत्यांत त्यांचाही समावेश आहे. वीणा आॅस्ट्रेलियात सेंटर फॉर सस्टेनेबल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (स्मार्ट) संचालक आहेत. त्यांनी ‘ग्रीन स्टील’चा शोध लावला असून तो पर्यावरणपूरक आहे. त्यात रबरी टायर रियासकल करून पोलादाच्या उत्पादनात वापरले जाते आणि कोळसा किंवा कोकचा वापर न करता‘ग्रीन स्टील’ बनवतात.  


आयआयटीच्या शिक्षणानंतर वीणा कॅनडात मास्टर्स डिग्री करण्यास गेल्या. तेथे त्यांची भेट राम महापात्र यांच्याशी झाली. वीणा सिंधी आहेत, तर राम ओडिशाचे. दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अमेरिकेतून मटेरियल सायन्समध्ये डॉक्टरेट केले. घरातही स्वयंपाकासाठी त्या टायर आणि प्लास्टिक कचराच इंधन म्हणून वापरतात.

- प्राध्यापक वीणा सहजवाला, वैज्ञानिक  

बातम्या आणखी आहेत...