आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या धोरणामुळे चाळीस लाख अल्पवयीन निराधार होणार का? अमेरिकेत अपत्यांना नागरिकत्व, मात्र पालकांना नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेली स्वीटलँड एडवर्ड- काही दिवसांपूर्वी अलेक्झांड्रोने पत्नी मारियाचा निरोप घेतला. तो आपल्या हिरव्या रंगाच्या पिकअप वाहनाने निघाला. काही अंतरापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी रोखली. त्याला अटक केले. त्याने फोनवरून पत्नीला घडला प्रकार सांगितला. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. तिला काय करावे हेच सुचेनासे झाले. कॅलिफोर्नियाच्या बॅकर्सफील्डमध्ये अनेक वर्षांपासून हे कुटुंब वसले आहे. दररोज तो आपल्या पिकअप वाहनात द्राक्ष, संत्री, पिस्ता कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीमध्ये घेऊन जात असत. मनीध्यानी नसताना त्याला अटक झाली. त्याने अवैध काम केले नव्हते. पोलिसांनी त्याला तत्काळ देश सोडून जाण्याचा आदेश दिला. मेक्सिकोला जाण्यास सांगितले. आपल्या व्हिसाचा अवधी संपल्याचे त्या वेळी पत्नीला लक्षात आले. मात्र, यापूर्वी अटक करण्याची कारवाई झाली नव्हती. अचानक कडक कारवाईला सामोरे जावे लागले. काही दिवसांनंतर कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी त्याला मिळाली. मारियाने नुकताच तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. तिन्ही मुली अमेरिकी नागरिक आहेत. मात्र, पालकांकडे कागदपत्रे नाहीत. पतीला हद्दपार केल्याने मारिया भेदरून गेली आहे.  


ही केवळ मारियाच्या कुटुंबाची कहाणी नाही. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानंतर अनेक कुटुंबांची ही स्थिती आहे. आेबामा प्रशासनाने इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटला (आयसीई) सांगितले होते की, गुन्हेगारीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना अटक करा. मात्र, ट्रम्प यांनी सरसकट कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे कुटुंबांची ताटातूट होत आहे. अंदाजे १ कोटी १० लाख नागरिक निर्वासित ठरवण्यात आले आहेत. आयसीईचे कार्यकारी संचालक थॉमस होमन यांनी म्हटले आहे की, हे लोक अवैधरीत्या देशात राहत  होते. आम्ही त्यांच्याच शोधात होतो.  


अलेक्झांड्रोसारखे अनेक जण पकडले गेले आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. आेबामा प्रशासनाने केवळ गुन्हेगारांची हद्दपारी केली. डोनाल्ड ट्रम्प सरकारने त्यापेक्षा दुप्पट निरपराध लोकांना हद्दपार केले.ते उपजीविकेसाठी अमेरिकेत वसले आहेत. 


परदेशातून आलेले लोक यामुळे चिंताक्रांत आहेत. टेक्सास विद्यापीठातील स्टीव्ह हिक्स स्कूलचे डीन लुईस जायस यांच्या मते, प्रत्येकाला लक्ष्य केले जात आहे. कोणीच सुरक्षित नाही. आयसीईचे कर्मचारी ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांनाही अटक करत आहेत. अनेकांनी मुलांना शाळेतून काढून घेतले. इमिग्रेशन स्टडीज सेंटरचे कार्यकारी संचालक मार्क क्रिकोरियन यांनी सांगितले की, अवैधरीत्या राहत असणाऱ्यांवर टांगती तलवार असणार हे स्वाभाविक आहे. २०१७ मध्ये मेक्सिकोला लागून असलेल्या अमेरिकेच्या सीमेजवळ अवैध प्रवेश करणाऱ्यांची संख्या ४६ वर्षांत प्रथमच लक्षणीय घटली.  

 

... प्रश्न असा आहे की  

अ मेरिकेत अवैधरीत्या राहत असणाऱ्यांवर नव्या धोरणांचा विपरीत परिणाम होत आहे, असे नव्हे. अमेरिकी नागरिक असून केवळ कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांवरही कारवाई होत आहे. त्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे विखुरली जात आहेत. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ४० लाख अपत्यांच्या आई वा वडिलांकडे कागदपत्रे परिपूर्ण नाहीत. ६० लाख नागरिक असे आहेत, जे कोणाचे तरी  नातलग आहेत, त्यांच्यावरही हद्दपारीची टांगती तलवार आहे. दरवर्षी हजारो मुलांच्या आई वा वडिलांना निर्वासित केले जात आहे. यामुळे कुटुंब दारिद्ऱ्याच्या गर्तेत अडकत आहेत. मारियासारखे पीडित याला क्रौर्य म्हणत आहेत. अपत्यापासून दुरावण्याचे भय त्यांना आहे.

 

मानवी तस्करी : अमेरिकेत अवैध प्रवेश  

३५ अब्ज डॉलरची मानवी तस्करी आणि भारतीय  

पंजाबचे मुलकित कुमार हे कोस्टारिकात राहणाऱ्या डोना केटियाच्या घरात आढळले. एक महिन्यापूर्वी ते पंजाबमधून येथे आले. लोकांना अवैधरीत्या एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाणाऱ्या तस्करांचे काम तेजीत सुरू आहे. अमेरिकेत प्रवेश करण्याचे प्रयत्न अनेक जण करतात. याचा फायदा तस्कर उचलतात. वार्षिक ३५ अब्ज डॉलर्स ते कमावतात. अवैध मार्गाने जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत.  


मुलकित यांच्या ४ बहिणींनी अमेरिकेत जाण्यास त्यांना आर्थिक मदत केली. पंजाबहून दिल्ली. दिल्लीहून इक्वाडोरची राजधानी क्विटो. तेथून कोलंबियाची सीमा १५० मैलांवर आहे. येथून मध्य वा उत्तर अमेरिकेत सहज प्रवेश मिळतो. लाखो रुपये त्यांनी भावासाठी खर्च केले. द. अमेरिकेत असलेला कोलंबिया मानवी तस्करीचे केंद्र मानला जातो. येथे अनेक कंटेनर उतरतात. कंटेनरद्वारे माणसाची वाहतूक होते. नंतर कारने त्यांना हव्या त्या देशात पोहोचवले जाते. नाव बदलून दिले जाते. हवे तितके पैसे वसूल केले जातात. यात भारतीय, बांगलादेशी अधिक आहेत. पनामा आणि कोस्टारिका सीमेवर या लोकांचे नामांतर करून त्यांना दुसऱ्या देशात पाठवले जाते. डोना केटियासारख्या महिला या कामात गुंतल्या आहेत. तिला दोन अपत्ये आहेत. गेल्या अडीच वर्षांत तिने ६०० जणांना अमेरिकेत पोहोचवले. तिला ग्राहक नावाने नव्हे, चेहऱ्याने माहीत असतो. द. आशियातून अवैधरीत्या आणण्याचा खर्च अंदाजे १० हजार डॉलर्स ते यापेक्षा तिप्पटही असू शकतो. सौदा कसा आहे, यावर ते अवलंबून आहे.  आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटनेने (आयआेएम) दिलेल्या माहितीनुसार अवैधरीत्या आणल्या जाणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वाधिक आहेत. यातील बहुतांश लोकांना अमेरिका गाठायची असते.

बातम्या आणखी आहेत...