आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! अशी बाटली दिसली तर चोरीला जाऊ शकते तुमची कार, अशी आहे Trick

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - चोरट्यांना आला घालण्यासाठी पोलिस रोज नवनवीन उपाययोजना करत असतात. पण चोरटेही अमनेकदा दोन पावले पुढे जाऊन चोरी करण्यासाठी नवनवीन ट्रिक शोधत असतात. अशाच एका ट्रिकबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. या ट्रिकचा वापर करून चोरटे कार चोरत असतात. पाश्चात्य देशांत काही भागांत या ट्रिकचा वापर करून कारची चोरी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही ट्रिक व्हायरल झाल्याने इतर ठिकाणीही या ट्रिकचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ही बातमी देत आहोत. तुम्हालाही असा काही संशय आला तर तुम्ही तशी काळजी घेऊ शकाल. 


अशी आहे ट्रिक
>> चोरटे तुमच्या कारच्या समोरच्या चाकाला ड्रायव्हरच्या विरुद्ध दिशेला जे चाक असते त्या चाकाच्या आणि कारच्या गॅपमध्ये रिकामी पाण्याची बाटली फसवतात. 
>> ही बाटली फसवल्यानंतर चोरटे आसपास लपून बसलेले असतात. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून गाडी सुरू करता आणि चालवायला लागता त्यावेळी या बॉटलमुळे अगदी विचित्र असा आवाज येऊ लागतो. 
>> रिकाम्या बाटलीचा हा आवाज नेमका का येतोय असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. नेमका आवाज कशाचा हे पाहण्यासाठी आपण गाडीच्या खाली उतरतो. 
>> आपण गाडीला सगळीकडे फिरुन चेक करत असतो. यावेळी आपल्या गाडीची किल्ली मात्र गाडीलाच असते.
>> आपण जेव्हा दुसऱ्या बाजुला येऊन वाकून पाहत असतो, हीच संधी साधून चोरटे पटकन गाडीत बसतात आणि किल्ली लावलेली असल्याने गाडी घेऊन थेट फरार होतात. 
>> चोरट्यांना माहिती असल्याने अत्यंत वेगाने ते हा सर्व प्रकार करतात, अशावेळी आपल्या डोळ्यासमोरून गाडी चोरली जाण्याची शक्यता असते. 

 

अशी घ्या काळजी 
>> कधीही गाडीत बसण्यापूर्वी सर्व बाजुने कारचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते. यामुळे पुढील धोके टाळता येऊ शकतात. 
>> गाडीत बसल्यानंतर अशाप्रकारचे काही आवाज आले तरी लगेचच गोंधळून जाऊ नका. काय होत आहे याचा अंदाज घेऊन विचारपूर्वक पुढची पावले उचला. 
>> काहीही झाले तरी प्रत्येकवेळी गाडीतून खाली उतरताना गाडीची किल्ली काढायचे विसरू नका. कारण किल्ली नसेल तर चोरट्यांच्या अशा ट्रिकचा काहीही फायदा होणार नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...