आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम लांगुलचालनाच्या अाराेपांमुळे अाम्ही फक्त 44 जागांवर गुंडाळले गेलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिमांनी खुलेपणाने साथ द्यावी, जेणेकरून काँग्रेस पुन्हा त्यांच्यासाठी सहारा बनेल - Divya Marathi
मुस्लिमांनी खुलेपणाने साथ द्यावी, जेणेकरून काँग्रेस पुन्हा त्यांच्यासाठी सहारा बनेल

काँग्रेसचे नेते तथा माजी कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी अापल्याच पक्षावर मुस्लिमांच्या रक्ताचे शिंताेडे असल्याचे वक्तव्य केले हाेते, तेव्हा काँग्रेसनेच अापली मुस्लिमप्रेमी प्रतिमा बदलण्यासाठी तर त्यांना असे बाेलायला नाही ना लावले? असे प्रश्न उपस्थित झाले हाेते. दैनिक भास्करचे मुकेश काैशिक व अमित निरंजन यांनी खुर्शीद यांना अशाच विषयांवर बाेलते केले.  

 

प्रश्न : २०१४ च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसला असे वाटते का की, माेदी असेपर्यंत मुस्लिम मते काँग्रेसलाच मिळतील. त्यांना गाेंजारायचे कशाला?  
उत्तर : असे नाही, सच्चाईने जाे पक्ष राजकारण करत नाही अशा विराेधकांशी तुम्हाला सामना करायला लागत असेल तर त्यासाठी रणनीतीत बदल करावाच लागेल. अाम्ही अल्पसंख्याकांसाठी जी कर्तव्ये पार पाडत हाेताे, त्यावर त्यांनी (भाजपने) लांगुलचालनाचे लेेबल चिकटवले. सच्चर समिती न्यायासाठी बनवली हाेती, तिलाही चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात अाले.  


* प्रश्न : सच्चर समिती लांगुलचालनासाठी नव्हती का?  
उत्तर : नाही, ती तर न्यायासाठी हाेती. मात्र, अाराेप असे करण्यात अाले की अाम्ही लांगुलचालन करत अाहाेत. दुसरीकडे, मुस्लिम अाम्हाला म्हणत हाेते की, शिंताेडे अामच्यावर उडवत अाहात... 

 
* प्रश्न : काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या मनात संभ्रमाची अवस्था निर्माण केली नाही का? जसे, राम मंदिराचे कुलूप राजीव गांधींनी उघडले हाेते...  
उत्तर : कुलूप राजीव गांधींच्या सरकारने नाही, तर न्यायालयाने उघडले हाेते.  

 
* प्रश्न : तेव्हा मुस्लिमांना धक्का बसला नाही का?  
उत्तर : त्यांना हे समजत नाही का की, त्यांच्यामुळेच (मुस्लिम) अाणि त्यांचे लांगुलचालन केल्याच्या अाराेपामुळेच अाज अाम्ही ४४ खासदारांवरच मर्यादित राहिलाे. काेणी असेही म्हणेल, यात मुस्लिमांचे काय देणे-घेणे. काँग्रेस लायक नव्हती म्हणून ४४ जागांवर मर्यादित राहिली. मात्र, अाम्ही चांगले सरकार दिले हाेते. मात्र, तरीही अामच्यावर विकास न करण्याचे, न्याय मिळवून न देण्याचे अाराेप लागले. अाम्ही त्यांना (मुस्लिमांना) न्याय कसा देणार? त्यांनी समिती नेमली अाणि या माध्यमातून देशभरात मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षाही बिकट असल्याचा निष्कर्ष काढला. त्याच अाधारे ते म्हणू लागले, ‘तुम्ही काय कल्याणाच्या गाेष्टी करता, सच्चर समितीनेच उघड केलेय की तुमच्या सरकारने अामच्यासाेबत काय केलेय ते? ’ त्यामुळे तर अामचे कशातच काही राहिले नाही. 
 

प्रश्न : मुस्लिम मतांचे महत्त्व कमी झाले अाहे काय?  
उत्तर : हे तर मुस्लिम समाजालाच समजायला पाहिजे की त्यांच्या समाजाचे किती लाेक संसदेत अाहेत. त्यांच्या समाजाचा अावाज कुठे कुठे एेकला जाताेय. लाेक सल्ला देतात, तुमची जी वेगळी अाेळख अाहे ती अाधी संपवा अाणि सर्वांमध्ये सामील व्हा. तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारताे की ‘म्हणजे नेमके काय करायचे?’ त्यांचा सल्ला एेकून बुरखा- टाेपी उतरवून टाकू का? कुठेही माेकळेपणाने नमाज पढू नकाे का? अाेळखच जर नष्ट झाली तर काेणाला काय मिळेल?  


प्रश्न : मात्र, राहुलजी असे मानत नाहीत. मागील वर्षभरात जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे त्यांनी मंदिर व मठांमध्ये जाऊनच प्रचाराची सुरुवात केली. तेथील दर्गा व मशिदीत मात्र ते गेले नाहीत?   
उत्तर : जेव्हा अाम्ही राजकारणात अालाे तेव्हा अाम्हीही मंदिरांत गेलाे. तेव्हा अामच्याविराेधात फतवे निघत हाेते. राहुल गांधी मजारींवरही गेले हाेते. मी गुपचूप नमाज पढत असेल अाणि काेणी म्हणत असेल की हे नमाज पढत नाही तर काय करायचे? कधी कधी राजकारणात काही संदेश, संकेत देण्यासाठी असे करावे लागते.    


प्रश्न : मात्र, त्यामुळे मुस्लिमांना अापण बेसहारा झाल्याचे वाटणार नाही का? त्यांना काँग्रेसचाच सहारा हाेता ना?  
उत्तर :  असे असेल तर तर मग मुस्लिमांनी उघडपणे काँग्रेसला साथ द्यावी, जेणेकरून काँग्रेस पुन्हा त्यांच्यासाठी सहारा बनेल. हिंदू, मुस्लिमांची एकता हेच देशाचे वैशिष्ट्य अाहे. मग ते अश्फाकउल्ला असाेत की संत कबीर. 

  
* प्रश्न : राहुल गांधींनी मशिदीतही जायला नकाे का?  
उत्तर :  ते मशिदीत का जातील? ते थाेडेच नमाज पढतात? हां, तर दर्ग्यात गेलेले अाहेत. तसे तर अाम्ही तरी किती वेळा मशिदीत जाताे? 

 

* प्रश्न : तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, काँग्रेसच्या अंगावरही मुस्लिमांच्या रक्ताचे शिंतोडे आहेत. त्याचा अर्थ काय होता? रक्ताने बरबटलेल्या कोणत्या हाताची गोष्ट तुम्ही करत होता?  
उत्तर : अंगावर रक्ताचे शिंतोडे होते असे वृत्त दिले नाही, हे विडंबन आहे. वृत्त असे दिले की, रक्ताने हात बरबटलेले आहेत.  


* प्रश्न : तरीही तुम्हाला हे म्हणावेच का लागले?  
उत्तर : आमच्यावरही काही प्रश्नचिन्हे लागली आहेत, हे सामान्य नागरिकांसमोर स्वीकारायचे आहे. काही लोक काँग्रेसबद्दल असंतुष्ट असल्याने आरोप करतात. शीख आणि मुस्लिम समाजाचे काही लोक काँग्रेसवर आरोप करतात. त्या आरोपांना आम्ही उत्तरही देतो. उत्तर देण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे वाद घालणे की, तुम्ही म्हणता ते निखालस खोटे आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे समजा हे खरे आहे तर आता आपण काय करायला हवे? पुढे पाहायचे की मागे, हे सांगा. 

 
* प्रश्न: अंगावर शिंतोडे आहेत हे खरे का?
उत्तर : हिंदुस्थानमध्ये कोणी खरे ऐकण्यास तयार होत नाही, कारण सत्यात हेतू शोधला जातो. आपले दु:ख कोणी सांगू शकत नाही की, मी अपयशी ठरलो आणि जे व्हायला नको होते ते माझ्या वेळी झाले. जर मी असताना असे झाले आहे, ज्यामुळे मला दु:ख झाले आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की ते मी केले आहे. आमच्या समाजात अनेक त्रुटी आहेत.  


* प्रश्न : पक्षाने तुम्हाला साथ दिली?  
उत्तर : माझ्या पक्षाने आणि नेत्यांनी मला साथ दिली याचा मला अभिमान आहे. सामान्यपणे कोणताही पक्ष असे म्हणतो की, अरे, तुम्ही ही कोणती नवी समस्या निर्माण केली?  


* प्रश्न : मुस्लिम समर्थक प्रतिमेपासून सुटका करून घेऊन मवाळ हिंदुत्वाचा चेहरा घेण्यासाठी पक्षाने आपल्या जुन्या, विश्वासू आणि जबाबदार नेत्यांकडून असे वक्तव्य करून घेतले, असे तर नाही ना?  
उत्तर
: मला अनेक लोकांनी विचारले की एवढे सर्व होऊनही भाजपने त्याचा वापर का केला नाही?  तुम्ही एकाच वेळी तुष्टीकरणाचा मुद्दा मांडायचा आणि यांनी तुष्टीकरणाची गोष्ट मान्य केली असेही म्हणायचे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. त्यामुळे भाजपने हा मुद्दा आणखी वाढवला नाही, दाबून टाकला.  


प्रश्न : तुम्ही असे वक्तव्य का केले, असे पक्ष नेतृत्वाने तुम्हाला विचारले नाही का?  
उत्तर : पहिल्या दिवशी पक्षाने या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले होते. पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, कोणीही असे वक्तव्य करायला नको होते, असे पक्ष प्रवक्त्याने म्हटले होते.  


* प्रश्न : सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रकरणाच्या दररोजच्या सुनावणीला तुम्ही विरोध का केला?  
उत्तर : आम्ही विरोध केला नाही. जे वकील मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाकडून आपली बाजू मांडत होते, त्यांनी तसे म्हटले. त्याचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही.  


* प्रश्न : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची जी नोटीस काँग्रेसने दिली होती, त्यावर तुमचे मत वेगळे होते का?  
उत्तर
: हे पाहा, माझे मत वेगळे नव्हते. माझ्याशी या मुद्द्यावर पक्षाने चर्चा केली नाही, कारण मी संसद सदस्य नाही.  


* प्रश्न : एकूणच काँग्रेसचे हे पाऊल योग्य नव्हते का?  
उत्तर
: मला त्यावर सहमती देण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मी याच गोष्टीवर समाधानी आहे की, किमान माझ्या हाताने असे काम करण्याची संधी मिळाली नाही.  


* प्रश्न : तीन तलाकवर पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती भाजपला फायदा पोहोचवणारी नाही का?  
उत्तर : मी आधीही तुम्हाला म्हटले होते की, भाजपने याचा कुठे फायदा घेतला तर आम्हाला हात आखडता घ्यावा लागेल. आम्हाला तेथे थोडासा कूटनीतीचा वापर करावा लागेल. हे तीन तलाकचे प्रकरण भाजपची अवैध मोहीम आहे.  


* प्रश्न : प्रियंका गांधी राजकारणात आल्यास गेमचेंजर होऊ शकतात का?  
उत्तर : त्या आताही गेमचेंजर आहेत. त्यांनी ज्या प्रकारे राहुल यांना आणि पक्षाला आधार दिला आहे, त्या ज्या प्रकारे काम करत आहेत त्यामुळे पक्षाला खूप आधार मिळत आहे. पडद्यामागे त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.  


* प्रश्न : त्यांनी पडद्यासमोर यायला नको का?  
उत्तर : त्या पडद्यासमोर आल्या तर खूपच चांगले. मात्र, हे कौटुंबिक प्रकरण आहे.  


* प्रश्न : मोदींशी लढत देण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यात आहे का?  
उत्तर : होय, क्षमता आहे. मोदींचा प्रभाव संपत आहे, तो अत्यंत पोकळही आहे.  


* प्रश्न : राहुल यांच्या नेतृत्वात जवळपास सर्व ठिकाणी सत्ता गमावली आहे. काँग्रेसला अजूनही राहुल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का?  
उत्तर
: ते नेतृत्व करू शकत नाहीत, अशी काडीमात्रही शंका आमच्या लोकांच्या मनात  नाही. ज्या स्थितीत काँग्रेस पक्ष आहे, राहुलजी ज्या प्रकारे नेतृत्व करत आहेत आणि दुसरा एखादा नेता असता तर त्याचे काय झाले असते याचा अंदाज तुम्ही लावूच शकत नाही. 

 
* प्रश्न : अलिगड विद्यापीठात जिना फोटोच्या वादाला कुठला रंग मिळेल?  
उत्तर : कोणाचा फोटो लावायचा याचा अधिकार विद्यापीठालाच असायला हवा. एएमयूलाच सद््बुद्धी यावी, यासाठी मी प्रार्थना करतो.  


* प्रश्न : म्हणजे सध्या त्यांना सद््बुद्धी नाही?  
उत्तर : जर मी हो म्हटले तर लोक मला त्याच गटाचे मानतील, जे हल्ले करत आहेत.  

 

 

बातम्या आणखी आहेत...