वयाच्या 12 वर्षांपर्यंत एमिली ब्लंटचे शब्द फुटत नव्हते, आज मात्र टॉपची अभिनेत्री
ती जेव्हा १२ वर्षांची होती, तेव्हापासून तिला बोलण्याचा त्रास होत होता. स्वत:चे नावही धडपणे सांगू शकत नव्हती. आज आपण तिला
-
एमिली अोलिविया ले ब्लंट, अभिनेत्री जन्म : २३ फेब्रुवारी १९८३
ती जेव्हा १२ वर्षांची होती, तेव्हापासून तिला बोलण्याचा त्रास होत होता. स्वत:चे नावही धडपणे सांगू शकत नव्हती. आज आपण तिला द डेविल वियर्स प्राडा, द गर्ल ऑन द ट्रेन आणि एज ऑफ टुमॉरो सारख्या चित्रपटातून श्रेष्ठ अभिनयासाठी ओळखतो. हॉलीवूडमध्ये तिला कायम मागणी असते. आपण वाचत आहोत, ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एमिली ब्लंटबाबत, जिला शानदार अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले अाहेत.
एमिलीचे वडील बॅरिस्टर तर आई शिक्षिका आहे. एमिली जेव्हा आठ वर्षांची होती, तेव्हापासूनच तिला बोलण्याची अडचण येत होती. सतत सात वर्षे असेच चालले होते. या काळात तिला फार चिडवत होते आणि त्रास देत होते. एमिलीला स्वत:चे नावही सांगता येत नव्हते. म्हणून तिला जे नाव उच्चारणे शक्य होते, ते नाव ती सांगत असे. एकदा तर अशी वेळ आली की, बोलण्याच्या होत असलेल्या त्रासामुळे तिने बाेलणेच बंद करून टाकले.
आई -वडील तिला अनेक प्रशिक्षक व वाचा दोष निवारण तज्ञांकडे घेऊन गेले. पण काहीच उपयोग होईना. नंतर एक दिवस एमिलीच्या शिक्षकाला एक कल्पना सुचली, तिला अभिनयाचा कोर्स करण्यास सांगितले. त्या शिक्षकाचा असा अंदाज होता की, यामुळे बोलण्याचा चांगला सराव होईल आणि उच्चार सुधारण्यास मदत होईल. पण एमिलीला असे होऊ शकेल का याची शंका वाटत असल्याने ती हे टाळत राहिली. शिक्षक म्हणत होते की, आवाज बदलून बोल. मजेदार आवाजात बोललीस तर कदाचित काही फायदा हाेईल. शिक्षकांचा अंदाज बरोबर ठरला आणि त्याचा खरेच फायदा झाला. उच्चार स्पष्ट होऊ लागले. एमिली म्हणते की, हा अनुभव जादूई होता.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिने हर्टवुड्स हाउस आर्ट््स कॉलेजात प्रवेश घेतला.
२००० मध्ये तिने एडिनबर्ग फेस्टिव्हलमध्ये अभिनय कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. तेथे तिने अभिनेता केनेथ मिक्रेडीचे लक्ष वेधून घेतले. एमिलीला लंडन थिएटरपर्यंत पोहचविण्यामध्ये केनेथची भूमिका महत्वाची होती. केनेथमुळेच तिला अनेक एेतिहासिक नाटके मिळाली. २००४ मध्ये माय समर अॉफ लव्हमध्ये एमिलीने अविस्मरणीय अभिनय केला. २००३ मध्ये ‘वॉरियर क्वीन'द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. २००९ मध्ये द यंग व्हिक्टोरियासाठी तिला समीक्षकांनी पुरस्कार दिला. त्याच वर्षी तिला बाफ्टा अवॉर्डही मिळाले होते.
२०१० मध्ये तिने अमेरिकन अभिनेता जॉन क्रैसिंस्कीशी विवाह केला, तिला दोन मुलीही झाल्या. पण गरोदर असताना पुन्हा बोलण्याची समस्या आली. तेव्हा डॉक्टरांनी तिला जराही ताण घेऊ नकोस, असा सल्ला दिला. त्यांंच्या या सल्ल्यानुसार ती बराच वेळ पडून राहात असे. तेव्हा कुठे तिला बोलता येत असे.
२०१६ मध्ये द गर्ल ऑन द ट्रेन चित्रपट आला आणि तिचे पुन्हा कौतुक झाले. एज ऑफ टुमॉरोमध्ये तिने टॉम क्रूजसमवेत काम केले. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. चित्रीकरण चालू असताना टॉम क्रूज तिच्या हातून जखमी हाेता होता वाचला. यात मोटारीच्या पाठलागाचा प्रसंग होता. एमिली गाडी चालवत असताना गाडी झाडावर जाऊन आदळली. मागच्या सीटवर टॉम क्रूज बसला होता. या चित्रपटात तिने जो मटल सूट घातला होता, त्याचे वजन ४० किलो होते. इतका वजनदार सूट घालून आणखी पाच महिने काम करायचे आहे हे जेव्हा तिला समजले तेव्हा रडायलाच आले. तो तिचा पहिला अॅक्शन चित्रपट होता. आता एमिली व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम करते. ती अनेक पात्रांना आवाज देते. अॅनिमल क्रॅकर्स, माय लिटिल पोनी- द मूव्हीमध्ये तिने आपला आवाज दिलेला आहे. पण आजही ती थकून जाते तेव्हा तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. बोलण्यासाठी तिला परिश्रम करावे लागतात.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर बोलताना पहिल्यांदा मानसिक तयारी करावी लागते. फोनवर बोलतानाही तिला लांबलचक पॉज घ्यावा लागतो. परिश्रम, जिद्द आणि नशीब यांचा त्रिवेणी संगम म्हणजे एमिली हिचे व्यक्तिमत्त्व आणि संघर्षमय जीवन होय.- बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन
- अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर स्टटरिंगच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये समावेश.
- कॅप्टन अमेरिका- द फर्स्ट अॅव्हेंजरमध्ये प्रमुख रोल देण्यास नकार मिळाला.> काम- ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री आहे. द गर्ल ऑन द ट्रेन आणि एज ऑफ टुमॉरोमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाते.