आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या 'कास पठारा'वरील फुलांचे मनमोहक दृश्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युनेस्कोने 2012 मध्ये पश्चिम घातातील ज्या 39 ठिकाणांना जागतिक वारसा म्हणून जाहिर केले त्यातील एक म्हणजे 'कास पठार'. कास पठाराला 'कास पुष्प पठार' असेही म्हणतात. याच पश्चिम घाटातील म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले कास पठार हे पर्यटकांचे तसेच निसर्गप्रेमींचे खास आकर्षण आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळात स्थान मिळाले. यामध्ये कास पठार हे खासकरून फुलांसाठीचे पठार म्हणून कास पठाराला नामांकन मिळाले आहे. कास पठारचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उदवणार्‍या विविध जातींच्या वनस्पती आणि त्यांना येणारी फुले.
या पठारावर जवळपास 850 पेक्षा अधिक प्रकारची फुले आणि वनस्पती आढळतात. तर येथील फुलांवर बागडणारे 32 प्रकारची फुलपाखरे येथे संशोधकांना आढळून आली आहे. येथे आढळून येणार्‍या वनस्पतींमध्ये आरोग्यवर्धक वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे. तसेच येथे प्राण्यांच्याही विविध 19 जाती, त्यात सस्तन प्राण्याच्या 10 तर पक्षांच्या 30 जाती आहेत. तर रेड डाटा या पुस्तकात नमुद असलेल्या 40 प्रकारच्या फुलांचे प्रकार येथे आढळतात. कास पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे.
याच सुंदर अशा कास पठाराचे नैसर्गिक सौंदर्य दाखवणारी छायाचित्रे पाठवलीत आमचे वाचक मित्र संतोष कुलकर्णी (औरंगाबाद) यांनी...