मुंबई- सहा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या 26-11 हल्ल्यातील शहीदांना आज आदरांजली वाहत आहेत. या हल्ल्यात 166 जण मारले गेले होते. पण हजारो लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अनेकांना
आपले हात-पाय गमवावे लागले आहेत. कोणाला आयुष्यभरासाठी अंपगत्व आले तर कोणी जागेवरूनच उठू शकत नाही. याचबरोबर ही घटना पाहणा-यांना ती रात्र आठवली की रात्र-रात्र झोप लागत नाही.
त्या रात्रीच्या 26/11 हल्ल्यावेळी मुंबईतील पूनम सिंग सीएसटी स्थानकातून घराकडे निघाल्या होत्या. मात्र त्याचवेळी पूनमवर कसाबने बेछूट गोळीबार केला. त्यात पूनमच्या पोटात गोळी शिरली जी आजही तिच्या पोटात आहे. पूनमसोबत तिचा मुलगा सचिनही होता. त्याच्या हाताला गोळी लागली. आज तो चांगला झाला आहे. मात्र पूनमच्या पोटातील गोळी तशीच आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की ती गोळी काढली तर जीवाला धोका निर्माण होईल, त्यापेक्षा आहे तेथेच तिला राहू द्या.
सरकारने जखमी पूनम यांना अडीच लाख रूपयांची मदत दिली. पण त्यांच्यावर आतापर्यंत 10 लाख रूपयेपेक्षा जास्त खर्च आला आहे. यापुढेही ही गोळी पूनम यांना त्रास देणार आहे. पण डॉक्टरांचे म्हणणे रास्त असल्याचे सांगत त्या गोळीचा त्रास सहन करण्यापलीकडे मी काय शकत नाही, असे पूनम म्हणतात.
सीएसटी स्थानकावर कसाबने केलेल्या गोळीबारात एक श्वानही जखमी झाला होता... वाचा पुढील स्लाईडवर....बघा फोटो....