आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुष्काळग्रस्तांची क्रुर चेष्टा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्मक्लेश करुन घेतला. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रीया आल्या आहेत. विरोधकांनीतर पवारांच्या आत्मक्लेशाला नौटंकी ठरवून टाकले. बूंद से गयी, हौद से नहीं आती अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांच्या आत्मक्लेशाने काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मराठवाड्यातील दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला कोर्टाने दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा गेल्या आठवड्यात सुनावली. यावर बेगने या स्फोटात १७ निरपराधांचा बळी गेला आणि मी अठरावा ‘बळी’ ठरेल, असे म्हणत न्यायालयात नक्राश्रू ढाळले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी अभद्र युती करून बेकायदा बांधकामांना पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या ठाणे बंदमुळे ठाणेकरांचे हाल झाले असले तरी, पायी चालत अथवा मिळेल त्या वाहनाने रेल्वेस्टेशन गाठून नोकरी-धंद्यानिमीत्त बाहेर पडून ठाणेकरांनी एकप्रकारे बंद हाणून पाडला. यासह गेल्या आठवड्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती मागोवा महाराष्ट्राचामध्ये आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा...
बूंद से गयी, हौद से नहीं आती
बेगला फाशीची शिक्षा
ठाणेकरांनी बंद झुगारला
कलमाडींवर फौजदारी गुन्हाच दाखल करा !
ई-व्होटिंगचा पहिला प्रयोग सांगलीत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.