आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी सिस्टिमः आयआयटीत येऊन स्वप्न भंगले..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी रुरकीमधून काढून टाकलेल्या ७३ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. संस्था त्यांना परत घेण्यास तयार नाही. बडतर्फ विद्यार्थ्यांचे कष्ट आणि त्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची कहाणी जाणून घेऊया...
कोचिंगमधील शिकवण्याच्या पद्धतीचा फटका त्यांना बसला
केस - १- आयआयटी रुरकीमधून बडतर्फ विद्यार्थी-१ (पहिल्या वर्षांत ४.९२ सीजीपीए)
आठवीत होतो तेव्हा पहिल्यांदा इंजिनिअर शब्द ऐकला होता. मजुरी करणाऱ्या माझ्या वडिलांनी अचानक इंजिनिअरचे महत्त्व पटवून दिले. त्याच दिवशी मी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या सरकारी विद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालो. २०१३ मध्ये पहिल्यांदाउर्वरित. आयआयटी प्रवेशाच्या परीक्षेस बसलो. निवड झाली नाही. वडिलांनी कोचिंगसाठी दुसऱ्या शहरात पाठवले. निकालात मला चांगली रँक मिळाली होती.

आयआयटी-रुरकीत प्रवेश मिळाला. अभ्यासात कसर केली नाही,मात्र अपेक्षित निकाल आला नाही. कोचिंगमधील शिकवण्याच्या पद्धतीचा हा फटका असू शकतो. आम्ही जास्त गुण घेण्याच्या दृष्टीने शिकवले जाते. कोचिंगमधील चुका आयआयटीशिवाय आणखी कोण सुधारू शकतो. मला ४.९२ सीजीपीए मिळाल्यानंतरही काढून टाकण्यात आले. मला संधी मिळायला पाहिजे. आम्हाला निकालाबाबत कोणताही इशारा देण्यात आला नव्हता,अचानक एके दिवशी बडतर्फीची नोटीस आली. पाच वर्षांच्या कष्टानंतर मिळालेले स्वप्न भंग पावले. आता कुठलाही मार्ग दिसत नाही. बडतर्फीचा कलंक लागल्याने कुठेच प्रवेश मिळणार नाही. घरच्यांना तोंड दाखवण्याचे धाडस नाही. वडिलांनी माझ्यासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा आहे. माझ्या नोकरीतूनच आशा होत्या, नव्या करिअरचा विचार करणेही कठीण आहे.


ग्रामीण विद्यार्थ्यांना हिंदीत कोणी नियम समजावून सांगत नाही :
केस - २ । आयआयटी,रुरकीतून बडतर्फ विद्यार्थी - २ (पहिल्या वर्षांत सीजीपीए - ४.९५)
२००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर गेल्या १५ जून रोजी पुन्हा संकट कोसळले. एका सीनियरने आयआयटीतून बडतर्फ केल्याची फोनवर माहिती दिली हाेती. १८ जूनला रुरकीला पोहोचलो आणि नंतर डीनची भेट घेतली. निर्णय माघारी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. निर्णय सिनेट घेईल,असे सांगितले. ८ जुलै रोजी सिनेटची बैठक झाली.मात्र, सिनेटने बडतर्फीच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले.

उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या विद्यार्थ्यांचे अनेक पेपर अडकले आहेत. मला दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पाचपेक्षा जास्त सीजीपीए आहे. पहिल्यात ४.८० आले तरीपण मला काढले. मी कामगिरी सुधारण्याच्या प्रयत्न करत आहे. हजेरी कमी असेल तर तीन महिने आधी नोटीस मिळते. या प्रकरणात मला काहीच पूर्वसूचना दिली नाही. आयआयटीचे सर्व काम इंग्रजीत होते. आमच्यासारख्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान हिंदीत नियम समजून सांगितले पाहिजे.

आयआयटी सुधारणेसाठी संधी देत नाही. पूर्व उत्तर प्रदेशातील एका लहान गावात माझे लहानपण गेले. त्यावेळीच मी इंजिनिअर होण्याचे ध्येय ठेवले होते. नववीत असताना वडिलांचे निधन झाले. कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानुसार वाटचाल करत होतो. वडिलांच्या निवृत्ती वेतनावर तीन भाऊ व एका पोलिओग्रस्त बहिणीचा खर्च पुरेसा नव्हता. मला माध्यमिक शाळेपासूनच शिष्यवृत्ती मिळत होती,त्यामुळे माझ्या शिक्षणावर परिणाम झाला नाही. कोचिंगसाठी परगावी गेलो. बारावीसोबत आयआयटी प्रवेशाची परीक्षा दिली. नापास झालो तेव्हा क्लासच्या टिचर्सनी तू यशाच्या जवळ असल्याचे सांगितले. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालो आणि रुरकीला प्रवेश मिळाला.

पात्र नव्हतो तर माझ्यासाठी जेईई अॅडव्हान्स चांगली रँक कशी झाली
केस - ३ । राज माहेश्वरी,आयआयटी रुरकीतून बडतर्फ - ३
देशातील चांगल्या अभियांत्रिकी संस्थेपैकी एकामध्ये प्रवेश मिळाला तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. बीटेकच्या पहिल्या वर्षी खूप अभ्यास केला,मात्र निकाल चांगला लागला नाही. ही माझी चूक आहे. मात्र, मला दुसरी संधी मिळायला नको का? तुम्ही पात्र नाहीत,असे सांगून संस्थेने काढून टाकले. आम्ही जर पात्र नसू तर जेईई अॅडव्हान्स्डमध्ये माझी रँक ४५०० च्या जवळ कशी आली. तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून मिळवलेला माझा आनंद हिरावून घेतला आहे. पुढे काय होईल,माहीत नाही. वडील बँक कर्मचारी आहेत. इंजिनिअरिंगनंतर मोठा सरकारी अधिकारी व्हावे असे त्यांना वाटते. मात्र, आता माझ्या पदवीलाच ग्रहण लागले आहे.