आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकडोनाल्ड्स: वय ५३ वर्षे, कित्येक आजार, आर्थिक चणचण, तरीही उभारली फूड चेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रे क्रॉक, फाउंडर, मॅकडॉनल्ड्स - Divya Marathi
रे क्रॉक, फाउंडर, मॅकडॉनल्ड्स
रे क्रॉक चार वर्षांचे असताना त्यांचे वडील एका फ्रेनॉलॉजिस्टकडे (डोकं पाहून भविष्यवाणी करणारा) घेऊन गेले. रे यांचे डोके तपासून त्याने सांगितले- हा मुलगा शेफ होईल किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये जाईल. १९५४ मध्ये रे ५२ वर्षीय क्रॉक मल्टी मिक्सर विकण्याचा व्यवसाय करायचे. एक दिवस मॅकडोनाल्ड्सला गेले. तिथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड नावाचे भाऊ प्रत्येक ग्राहकास साठ सेकंदांत बर्गर देत होते. एकाच वेळी ४० मिल्कशेक तयार करत होते. मात्र, ग्राहकांची गर्दी कमी होत नव्हती. मॅकडोनाल्ड भावंडांनी फोर्डची असेंब्ली लाइनचे तंत्र रेस्तराँमध्ये अवलंबले असावे, असे रे यांना वाटले. प्लास्टिक प्लेट आणि पेपर नॅपकीनमुळे भांडीकुंडी स्वच्छ करण्याची कोणतीही झंझट नव्हती. रे यांनी मॅकडोनाल्ड भावंडांना चेन उघडण्याचा सल्ली दिला. ते यासाठी राजी न झाल्याने स्वत:च त्याच्यावर काम करू लागले. रे यांच्या मनात डोकावलेला हाच विचार मॅकडोनाल्डच्या विशाल साम्राज्याचा पाया ठरला. मूळ मॅकडोनाल्ड रेस्तराँ रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड या भावंडांनी १५ मे १९४० रोजी कॅलिफोर्निया येथे उघडले होते. मात्र, सध्याचे मॅकडोनाल्ड स्वत:ची स्थापना १९५५ मध्ये झाल्याचे मानतात. ते रे यांनी १५ एप्रिल ११५५ रोजी शिकागो येथे उघडले होते. रे यांनी मॅकडोनाल्ड सिस्टिम इंक. कंपनी उभारली आणि फ्रँचायझी उघडणे सुरू केले. १९८३ पर्यंत त्यांचे ३० देशांमध्ये ७,७७८ रेस्तराँ होते. १९८४ मध्ये रे यांचा मृत्यू झाला त्या वेळी त्यांची संपत्ती ५० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त होती. रे यांच्या समर्पणाचा अंदाज याच वक्तव्यावरून घेतला जाऊ शकतो- माझा ईश्वर, कुटुंब आणि मॅकडोनाल्डमध्ये विश्वास आहे. कार्यालयात हा क्रम उलट होतो. मॅकडोनाल्डला प्रारंभीला कडवा संघर्ष करावा लागला. रे यांचे म्हणणे होते- जर तुम्ही जोखीम घेऊ शकत नसाल तर व्यवसाय सोडून दिला पाहिजे. त्यांनी रेस्तराँ उघडले त्या वेळी त्यांचे वय जास्त होते आणि कित्येक आजार जडले होते. मधुमेह होता, पित्ताशय खराब झाले होते. थायरॉइड ग्रंथीची अवस्था बिकट होती आणि संधिवाताचा आजारही जडला होता. कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नसल्याने आर्थिक चणचणही होती. पैशासाठी १९६५ पर्यंत संघर्ष करावा लागला. तोपर्यंत कंपनीचे आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाले नव्हते.
प्रारंभीचे रेस्तराँ यशस्वी झाल्यावर रे यांनी मॅकडोनाल्ड बंधूंकडून रेस्तराँ चेन घेण्याचा निर्णय घेतला त्या वेळी त्यांच्या जीवनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. मॅकडोनाल्ड फ्रँचायझी चेनचे पूर्ण अधिकार किती डॉलर्समध्ये विकाल, असे त्यांनी डिक यांना विचारले. दोन दिवसांनंतर दोन्ही भावंडांनी उत्तर दिले- २७ लाख डॉलर्स. आकडा ऐकताच रे यांची शुद्धच हरपली. सौदा महाग होता. रे यांनी कर्ज घेऊन रेस्तराँ चेन विकत घेतली. १९६१ मध्ये मॅकडोनाल्ड भावंडांना पूर्ण रक्कम देऊन मॅकडोनाल्डचे सर्वच अधिकार खरेदी केले. इथूनच मॅकडोनाल्डची खरी प्रगती सुरू झाली.
केवळ पैसा कमावण्यासाठी काम करत असाल तर पैसा मिळवणे शक्य होणार नाही. जे कराल ते मन लावून करा, यशाला नक्कीच गवसणी घालाल.
- रे क्रॉक