आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षाभूमीचे शिल्पकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक परिवर्तनाची भूमी म्हणून ओळख लाभलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीच्या प्रकल्पाचे दादासाहेब गवई हे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे दीक्षाभूमीवरील जगप्रसिद्ध स्तुपाच्या निर्मितीसह संपूर्ण परिसराचा विकास झाला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात लाखो अनुयायांच्या साक्षीने बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन सामाजिक परिवर्तनाचा एक अध्याय पूर्ण केला. दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक ठिकाणावर स्मारक उभे व्हावे, यासाठी नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आली होती. बाबासाहेबांचे सहकारी दादासाहेब गायकवाड हे समितीचे प्रमुख होते. त्यांच्या पश्चात १९६९ मध्ये स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून दादासाहेब गवई यांच्याकडे समितीची सूत्रे आली. दीक्षाभूमीवर भव्य अशा स्तुपाच्या उभारणीची कल्पना पुढे आल्यावर दादासाहेबांनीच सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शिवदानमल यांच्याकडे आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. या कामासाठी स्मारक समितीला निधीची चणचण मोठ्या प्रमाणात भासत होती. दादासाहेबांनी सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून बांधकामासाठी तब्बल सहा कोटींचा निधी उभारला. २००१ मध्ये स्तुपाचे बांधकाम पूर्ण होऊन १८ डिसेंबर २००१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद््घाटन समारंभ झाला. दीक्षाभूमीवरील स्तुपाची दिव्य वास्तू आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे एक केंद्र बनली आहे. दरवर्षी याच ठिकाणावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन केले जाते.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनाने अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे ते अजातशत्रू नेते होते.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रतिक्रिया...