आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भय स्वीकारा, यश चालून येईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरापासून मी अशा एका दांपत्याला ओळखते, ज्यांच्या नात्यात फारसा गोडवा राहिलेला नव्हता. ते एकमेकांशी फार कमी बोलत आणि त्यामुळे त्यांच्यातील दरी रुंदावत होती. पण इतरांसमोर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे भासवत. माझ्या परिचितांपैकी एक महिला अशाच. शारीरिकदृष्ट्या उत्तम. नियमित व्यायाम करत, पौष्टिक आहाराचे सेवन करत. मध्ये एकदा डॉक्टरांनी त्यांना मधुमेह असल्याचे निदान केले, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सहा महिन्यांनी इन्फेक्शन झाले तेव्हा त्यांना मधुमेह झाल्याची खात्री पटली.


या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. दोघेही सत्याचा स्वीकार न करता दूर पळत आहेत. समस्या मोठी आहे, पण ती गांभीर्याने समजून घेण्यात दोघेही अपयशी ठरले आहेत. याला सायक्लॉजिकल डिनायल म्हणतात. मानवी मेंदूमध्ये मानसिक सुरक्षा यंत्रणा असते. व्यक्तीस नकोशा परिस्थितीचा किंवा सत्याचा सामना करण्यापासून ही यंत्रणा रोखते. ते असे जाणूनबुजून करत नाहीत, पण मानसोपचार तज्ज्ञांच्या मते लोक अनेकदा समजून उमजून क्लेशकारक स्थितीचा सामना करणे टाळतात.


या समस्येची अनेक कारणे आहेत. काही लोक सत्याचा सामना करत नाहीत, काही लोक परिणामांना घाबरतात, तर काही लोक कठीण परिस्थितीत निर्माण होणा-या भावनांपासून दूर पळतात.
नाकारणे ही क्रिया प्रारंभी संरक्षणात्मक असते. यामुळे आपण कार्यक्षम बनतो. पुरेसे बळ आल्याची जाणीव होते, पण सुरक्षेचा हा तात्पुरता उपाय आहे. अडचणीत सापडलेली व्यक्ती बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधत असली तरी तिला अडचणींचा सामना करावाच लागतो. नाकारणे ही समस्या नाही, पण जेव्हा ही यंत्रणा तुम्हाला अडचणीतून मार्ग काढण्यास रोखते तेव्हा ती समस्येचे रूप घेते. अशा स्थितीत या नाकारण्यावर उपाय शोधणे गरजेचे बनते. मुलीला शाळेत काहीतरी अडचण असल्याचे तुम्हास ठाऊक आहे, पण शिक्षकांशी बोलण्यात वाटत असलेल्या भीतीमुळे ती या अडचणीकडे दुर्लक्ष करते आहे. अशा नाकारण्यावर गांभीर्याने चर्चा करा. आपल्याला नाकारण्याची समस्या भेडसावत असल्याचे अनेकांना ठाऊकच नसते. यावर उपाय कसा शोधणार? नाकारण्याची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवा. ही समस्या कठोरपणे नव्हे, तर भावनिकदृष्ट्या सोडवल्याने चांगले परिणाम मिळतील. गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी तुमच्याकडे काही कौशल्य असले पाहिजे. उदाहरणार्थ भीतीचा स्वीकार करा, यश तुमच्याकडे चालून येईल.


भयाशी निगडित सर्व माहिती गोळा करा. सहायक व्यवस्था निर्माण करा. हे करताना ‘नाकारणे’ हा तात्पुरता मित्र असल्याचे लक्षात घ्या. शेवटी प्रत्येकालाच भीती किंवा कठीण परिस्थितीला तोंड द्यावेच लागते.

मानसशास्त्राच्या प्राध्यापिका, एमआयएमएचएएनएस, बंगळुरू