आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदींचे एके-४७ मानले जाणारे ज्योती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही पाच वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. रजा मंजूर होऊनही त्या रद्द का केल्या जात आहेत, या कारणामुळे गुजरातमधील सर्व प्रशासकीय अधिकारी हैराण होते. मागच्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रात नियुक्त करण्यात आलेले हंसमुखा अधिया यांचीही रजा नामंजूर करण्यात आली होती. यामागे गुजरातचे मुख्य सचिव सनदी अधिकारी ए. के.ज्योती यांचा हात होता. त्या वेळी गोल्डन गुजरात महोत्सव सुरू होणार होता त्यामुळेच अधिकार्‍यांच्या रजेवर गंडांतर आणण्याचे फर्मान जारी झाले होते.

एका बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधिकार्‍यांनी शक्यतो रजेवर कमी जावे, असे सहज म्हटले होते. मात्र, ज्योतींनी सर्वांना सक्तीने परत बोलावले. कदाचित यामुळेच त्यांना मोदींचे "एके-४७' म्हटले जाते. मुख्यमंत्रिपदी असताना मोदी सार्वजनिकरीत्या ज्योतींच्या कामाची स्तुती करायचे. स्वर्णिम गुजरात अभियानादरम्यान अनेकदा ज्योती खेड्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत कार्यरत असायचे. गुजरातध्ये त्यांनी दीर्घकाळ मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळली. १९७२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षीच ते गुजरात कॅडरचे आयएएस बनले. सरदार सरोवरासोबतच कांडला पोर्ट ट्रस्टचेही ते अध्यक्ष होते. ६२ वर्षीय ज्योतींची वर्षांसाठी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जन्म- २३जानेवारी १९५३, पंजाबचे रहिवासी
शिक्षण- एम.एस्सी(रसायनशास्त्र), आयएएस
चर्चेचे कारण- या निवृत्त अधिकार्‍याची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती.
बातम्या आणखी आहेत...