आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Acid Attack Judgement 15 Days Jail, 300 To 3000 Rupees Punishment

अ‍ॅसिड हल्ल्याचे निकाल असेही : 15 दिवस जेल, 300 ते 3000 रुपये दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1966 दिल्लीच्या गीतावर तिच्याच समाजातील मेवालाल या आरोपीने तेजाब फेकले. त्याला 300 रुपये दंड व 15 दिवस तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर सुटका करण्यात आली.
2013 दिल्लीतील एका न्यायालयाने तेजाब फेकणा-या दोन आरोपींना केवळ 15 दिवस तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.


नऊ वर्षांनंतर शिक्षा, सहा महिन्यांनंतर पुन्हा जामीन
खटला -1
सन 2000 मध्ये कानपूरच्या आरती श्रीवास्तव या 18 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच वर्गातील अभिनवने अ‍ॅसिड हल्ला केला. आरती वडिलांसोबत स्कूटरवरून येत असताना ही घटना घडली. तेजाबमुळे डोक्याची त्वचा जळाली. तिच्या डोळ्यात व तोंडात अ‍ॅसिड गेले. आरतीला अनेक वर्षे डोळे उघडे ठेवून झोपावे लागत होते. चेहरा ठिकठाक करण्यासाठी नऊ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हल्ल्यानंतर अभिनवने एमबीए करून लग्न केले. नऊ वर्षांनंतर 2009 मध्ये जलदगती न्यायालयाने अभिनवला दहा वर्षे शिक्षा सुनावली. पाच लाख रुपये दंडही ठोठावला. मात्र, सहा महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. जामिनाच्या आदेशामुळे अभिनव साडेसहा वर्षे तुरुंगात राहिला. सात दिवसांनंतर नवा जामीन आदेश जारी झाला. लिपिकाच्या चुकीचा हवाला देऊन शिक्षेचा कालावधी सहा वर्षांऐवजी सहा महिने करण्यात आला. मात्र, अभिनवचा जामीन रद्द झाला नाही. दोन वर्षांपासून या खटल्याच्या सुनावणीसाठी पुढील तारखा मिळत आहेत. अद्याप सुनावणी झाली नाही.


आईचा मृत्यू, मुलीचे डोळे गेले, दंड केवळ 3 हजार
खटला -2
1998 मध्ये महाराष्टÑातील एका महिलेवर अ‍ॅसिड हल्ला झाला तेव्हा तिच्याजवळ अडीच वर्षांची मुलगी होती. हल्ल्यामध्ये तिची व मुलीची दृष्टी गेली. महिलेचा मृत्यू झाला. हल्लेखोर तिचा दीर होता. त्याला जन्मठेप सुनावण्यात आली. दोन कलमांंतर्गत दंड केवळ 1000 व 2000 रुपये बजावण्यात आला.
तेजाब पाजून प्राण घेतले, शिक्षा मिळाली सात वर्षे
खटला -3
1986 मध्ये घटस्फोटाला नकार देणा-या पतीने पत्नीला बळजबरीने तेजाब पाजले होते. हवाई दलात कार्यरत पतीला दुसरे लग्न करायचे होते. हल्ल्याच्या दिवशीच महिलेचा मृत्यू झाला. कलम 302 नुसार आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने 1975 मध्ये शिक्षा कायम ठेवली.


तेजाब फेकून पत्नीचा जीव घेतला; दंड 2000 रुपये
खटला -4
2002 मध्ये चेन्नईत पतीने पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यानंतर 24 दिवसांनी पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याचा संशय होता. मद्रास उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कलम 302, 313 अंतर्गत आरोपीला जन्मठेप व 2000 हजार रुपये शिक्षा सुनावली.


हसीनाला न्यायालयाने दिली भरपाई
खटला -5
कर्नाटकात 1999 मध्ये हसीनावर झालेल्या हल्लाप्रकरणात दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. याव्यतिरिक्त हसीनाच्या आई-वडिलांना 3 लाख रुपये अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने बजावले. नोकरी सोडल्यामुळे नाराज झालेल्या बॉसने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले होते.


... आणि जगभरात
ब्रिटनमध्ये पाइपर कांडानंतर हल्ले वाढले
ब्रिटनमध्ये मॉडेल व टीव्ही कलाकार केटी पाइपरवर 2008 मध्ये तिच्या बॉयफ्रेंडने अ‍ॅसिड हल्ला
केला होता. कडक कायद्याची मागणी करण्यात आली. मात्र, अ‍ॅसिड विक्री सुरूच राहिली. परिणामी 2008 मध्ये 67, 2009 मध्ये 69, 2010- 98 आणि 2011 पर्यंत 110 अशा घटना झाल्या.


हल्लेखोरासोबत राहण्याची तिच्यावर वेळ आली
बांगलादेशच्या नूरबानोला लग्नानंतर 18 वर्षांनी पतीच्या विश्वासघाताची जाणीव झाली. त्याने तिला तलाक दिला. आठ दिवसांनंतरच त्याने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. पतीला तुरुंगवास झाला. मात्र, सासूच्या दबावामुळे नूरबानोने पतीच्या सुटकेसाठी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर तिला पतीसोबत राहणे भाग पडले. पती अद्यापही तिला त्रास देतो.


कायदाच नसल्याने अ‍ॅसिडची विक्री
कमकुवत कायदा

किरकोळ बाजारातील स्फोटकांची तपासणी आणि त्यावर लक्ष ठेवण्यापूरताच कायदा मर्यादीत असून याद्वारे अ‍ॅसिडचा साठा बघितला जात नाही. मॅन्युफॅक्चर, स्टोरेज अँड इम्पोर्ट ऑफ हर्जाडस केमिकल रुल्स 1989 नुसार अ‍ॅसिडच्या स्टॉकची तपासणी आणि पडताळणी केवळ व्यवसायापुरतीच मर्यादित आहे. अ‍ॅसिडच्या खुल्या विक्रीबाबत कोणताच कायदा सध्या अस्तित्वात नाही.


परिणाम
भारतात टॉयलेट क्लीनरच्या नावाखाली अ‍ॅसिडची विक्री केल्या जात आहे. त्यामुळे लहान- मोठ्या दुकानांतून अ‍ॅसिड कितीही प्रमाणात विकत घेता येऊ शकते. यावर कोणाचेच नियंत्रण नाही.


दोन घातक अ‍ॅसिडची देशातील वार्षिक विक्री
38 लाख टन सल्फ्युरिक अ‍ॅसिड
3.25 लाख टन नायट्रिक अ‍ॅसिड


अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात विक्रेत्यास आरोपी बनवण्यात यावे : याचिका
तामिळनाडू मानवाधिकार चळवळीने जनहित याचिका दाखल करून हल्लेखोरास अ‍ॅसिड विकणा-या विक्रेत्याला आरोपी बनवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अ‍ॅसिड हे स्फोटक पदार्थाच्या प्रकारात मोडत असल्यामुळे याची विक्री एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टच्या अधीन राहून करण्यात यावी, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील वाथन चेट्टियार यांनी कोर्टात केला.


अनेक प्रकरणांत आरोपींनी बॅटरीमधून अ‍ॅसिड काढून हल्ला केल्याचे समोर आले आहे. म्हणून ज्याठिकाणी अ‍ॅसिडचा उपयोग होतो, तिथे सुरक्षेच्या उपाययोजना व्हायला हव्यात.


अलोक दीक्षित, स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटक्स कॅम्पेनचे प्रमुख
अ‍ॅसिड तयार करणा-या औद्योगिक परिवाराचे हित लक्षात घेत आहे म्हणून अ‍ॅसिडच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात सरकार अपयशी ठरली आहे. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय द्यावा.
कविता कृष्णन, सचिव, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन्स असोसिएशन
अ‍ॅसिडची विक्री रोकणारी दोन प्रबळ सरकारे
सिक्किममध्ये
अ‍ॅसिडच्या विक्रीवरील नियंत्रणासाठी सिक्किम ट्रेड लायसेंस अँड मिसलेनियस प्रोव्हिजन रुल्स 2011 मध्ये बदल करून उपनियम 17 ए अंतर्भुत करण्यात आले आहे. सिक्किमने परवाना पद्धत लागू करून अ‍ॅसिडच्या काउंटर विक्रीवर नियंत्रण ठेवले आहे.
बांगलादेश सरकारने 2002 मध्ये अ‍ॅसिड कंट्रोल अ‍ॅक्ट अस्तित्वात आणला आहे. अ‍ॅसिडची विक्री आणि खरेदी कोणी करावी याचा निर्णय जिल्हास्तरावरील 15 लोकांची एक समिती ठरवते. अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचीही या अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अ‍ॅसिड हल्ल्यात 20-30 टक्क्यांनी घट झाली आहे.