आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wow!!! कारच्या ईएमआयपासून मिळवा तीन वर्ष सुटका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महागाईच्या या जमान्यात ईएमआयच्या भीतीमुळे कार विकत घेण्याचे तुमचे स्वप्न अपूर्ण राहणार असेल, तर अजिबात चिंता करू नका. आता तुमच्यासाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आपण फक्त कारमध्ये बसण्याचा आनंद लुटण्यासाठी तयार राहा. ईएमआय देण्याची चिंता दुसरया कुणावर सोडून द्या.

एक जाहिरात कंपनी भारतात पहिल्यांदाच अशी अफलातून योजना घेऊन आली आहे. या अंतर्गत तुम्हाला तुमच्या कारवर काही जाहिराती लावाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला पहिले तीन वर्ष कारचे ईएमआय द्यावे लागणार नाहीत. कारण ही जाहिरात कंपनी पहिले तीन वर्ष तुमचे ईएमआय भरणार आहे. ड्रिमर्स मीडिया अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हटायझिंग या कंपनीने ही योजना भारतात सादर केली आहे. सध्या सहा लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कार किंवा सेदान स्वरूपातील कार या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ही योजना प्रत्यक्षात लागू केल्यावर सुमारे १५० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

ड्रिमर्स मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी युनुस मोहंमद यांनी सांगितले, की या योजनेत सहा लाख रुपयांपर्यंतच्या कारचा समावेश करण्यात आला आहे. यात एसयुव्हीचा समावेश केला जाणार नाही. ग्राहकांना कारच्या किंमतीच्या २५ टक्के हिस्सा डाऊन पेमेंट करावा लागणार आहे. त्यानंतर तीन वर्ष आम्ही कारचे ईएमआय भरणार आहोत. या कारचे लोन पाच वर्षांसाठी असेल. त्यामुळे ग्राहकाच्या कारवर सुमारे ४० ते ६० टक्के भागावर आम्ही जाहिराती लावणार आहोत.