आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 17 वर्षांच्या तिकीट खरेदीनंतर 130 कोटींचा जॅकपॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील टायने अँड वियर या गावातील दोघी मैत्रिणी. ४५ वर्षांची पाउला बाराक्ला आणि ५४ वर्षांची लॉरेन स्मिथ. १७ वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दरवर्षी त्यांनी जॅकपॉट लॉटरीचे तिकीट खरेदी केले. या वेळी पहिल्यांदाच त्यांना विभागून जॅकपॉट लागला आणि तोदेखील तब्बल १३० कोटी रुपयांचा. दोघी मैत्रिणी एकमेकींना लॉली आणि पॉली म्हणतात. लॉटरी लागल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा लास वेगासला जाण्याचे ठरवले आहे. 
 
तेथे खरेदी करायच्या वस्तूंची एक यादीही बनवण्यात आली आहे. यादीत पहिल्यांदा फ्राइंग पॅन खरेदी करायचे ठरले आहे. एका पाळणाघरात कुक असलेली लॉरेन म्हणते, मी काही दिवसांपूर्वीच माझा जुनी फ्राइंग पॅन टाकून दिली. त्यामुळे पहिल्यांदा तीच खरेदी करीन. या रकमेतून खरेदी केली जाणारी ती पहिली वस्तू असेल.
 
 तिकीट खरेदी केल्याची आठवण सांगताना पाउला म्हणाली, मी सकाळी साडेसहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. तिथल्याच एका दुकानातून हे तिकीट खरेदी केले होते.  जॅकपॉट लागल्याचा फोन येताच मी पहिल्यांदा लॉरेनला ही आनंदाची बातमी दिली. लॉरेन म्हणते, मी आजही माझ्या आईसोबत राहते. माझ्या प्रत्येक सुखदु:खात ती सहभागी असते.
बातम्या आणखी आहेत...