आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नाशीनंतर प्रोस्टेट चेक-अप आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत आहेत. मागील जनगणनेनुसार स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी 31 वर्षे असलेले सरासरी आयुर्मान 67 वर्षांवर पोहोचले आहे. आगामी दशकात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या 11 टक्क्यांहून अधिक होणार आहे. परिणामी म्हाता-या होणा-या आमच्या लोकसंख्येला जास्तीची देखभाल आणि आरोग्य सेवांची आवश्यकता भासणार आहे. 50 वर्षे वयाच्या प्रत्येक पुरुषाच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये थोडी वाढ होते. या वयाचे जवळपास 17 टक्के पुरुष आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जवळपास 35 टक्के पुरुष लोअर युरिनरी ट्रॅक्ट सिम्टम्सने (एलयूटीएस) ग्रस्त असतात. प्रोस्टेट ग्रंथी वाढण्यामागे सामान्यत: बेनिग्नची (कर्करोगविरहित) वाढ किंवा प्रोस्टेटमध्ये कर्करोगाच्या वाढीची कारणे असू शकतात.
लक्षणे : प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे एलयूटीएस होतो. त्याला आधी प्रोस्टेटिझम म्हणत असत. बिनॉइन प्रोस्टेट हायपर प्लासिया (बीपीएच) म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीमध्ये असामान्य वृद्धी झाल्यामुळे दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यापैकी एक स्टोरेज सिम्टम्स. त्यामध्ये रात्रंदिवस सातत्याने लघवीला येते. फार काळापर्यंत लघवी थांबवून ठेवणे अशक्य होते. आणीबाणीच्या वेळीही नियंत्रण राहत नाही. दुसरे लक्षण व्होइडिंग सिम्टम्सचे आहे. या लक्षणात लघवी करायला वेळ लागतो. म्हणजेच युरिनरी सिस्टिम कमकुवत होते. युरिनरी टॅक्ट इन्फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ होते किंवा काही लोकांच्या लघवीबरोबर रक्तही येते. मूत्राशय किंवा मूत्रपिंडामध्ये कर्करोग असल्यावरही लघवीवाटे रक्त येऊ शकते. जर त्याचे निदान प्राथमिक स्तरावरच झाले तर हा आजार औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेद्वारे बरा करता येऊ शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, लघवीतून रक्त येणे, मूत्रपिंड बंद पडणे, मुतखडा होणे इत्यादी जटिल समस्या निर्माण होऊ शकतात.
निदान : डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे बीपीएचचे निदान करता येऊ शकते. त्यामुळे प्रोस्टेटचा आकार आणि प्रोस्टेटच्या विविध प्रकारच्या आजारांचीही माहिती मिळू शकते. त्यामुळेच 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन करून घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या निदानासाठी ट्रान्सअ‍ॅब्डॉमिनल अल्ट्रासाउंड करावी लागते. त्यात युरोफ्लोमीट्री आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजनद्वारे तपासणी केली जाते.
प्रोस्टेट कॅन्सर- अमेरिकेत पुरुषांना होणा-या कर्करोगामध्ये प्रोस्टेट कर्करोग सर्रास आढळतो. जागरूकतेच्या अभावामुळे भारतात प्रोस्टेट कर्करोगाची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध नाही. प्रोस्टेट कर्करोगाच्या प्राथमिक स्तरावर कोणतीही विशेष लक्षणे दिसत नाहीत. रुग्णाला आजाराची माहिती मिळेपर्यंत तो खूप वाढलेला असतो. प्रोस्टेट कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर हा आजार पूर्णत: बरा होतो. मात्र अ‍ॅडव्हॉन्स स्टेजला पोहोचल्यानंतर तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. अमेरिकेत 90 ते 95 टक्के प्रोस्टेट कर्करोगाचे निदान अ‍ॅडव्हान्स स्टेजवरच होते.