Home | Divya Marathi Special | age is not limit

इच्छाशक्तीला नसते वय

अमन शर्मा (उधमपूर) | Update - Jun 04, 2011, 01:09 PM IST

इच्छाशक्ती दांडगी असेल तर वयाचा अडसर ठरू शकत नाही. गुजरातच्या राजकोटचे जयशंकर व्यास यांनी हे सिद्ध केले आहे. जयशंकर यांनी सुरुवातीपासूनच गिर्यारोहणाची आवड आहे.

  • age is not limit

    इच्छाशक्ती दांडगी असेल तर वयाचा अडसर ठरू शकत नाही. गुजरातच्या राजकोटचे जयशंकर व्यास यांनी हे सिद्ध केले आहे. जयशंकर यांनी सुरुवातीपासूनच गिर्यारोहणाची आवड आहे.

    सध्या ८ वर्षांचे असलेले व्यास आपल्या मित्रांसोबत हेरिटेज ट्रॅकसाठी रवाना झालेले आहेत. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने या हेरिटेज ट्रॅकचे आयोजन करण्यात आले आहे. इथे आलेल्या मित्रासोबत व्यास यांनी आपला ८१ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. विशेष म्हणजे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या व्यास यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी गिर्यारोहणाला सुरुवात केली. कैलास पर्वतापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला २४ दिवसांचा प्रवास हा आपल्या आयुष्यातील सर्वात आठवणीतील प्रवास असल्याचे त्यांनी 'भास्कर' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कैलास मानसरोवर इथं आपला शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा आहे. मात्र, पूर्ण तयारी करूनही चीनकडून व्हिसा न मिळाल्याबद्दल दु:ख वाटते.

Trending