आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या मातीपासून निर्मित औषध थोपवू शकेल वार्धक्य?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंदरांसंदर्भात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असती तर यूटी २५९८ या उंदराची नोंद आज सापडली असती. उंदरांचे सरासरी आयुष्य दोन-तीन वर्षे असते. त्यानुसार, तीन वर्षांच्या आयुष्यात निरोगी उंदीर यूटी २५९८ सर्वात जास्त (वयाच्या चार वर्षांपर्यंत) जगण्याचा विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे. मनुष्याच्या आयुष्याच्या तुलनेत पाहिले तर तोे १०० वर्षांच्या आसपास आहे. तो त्याचे युवावस्थेतील भाऊ व बहिणींसारखा आहे. त्याचे केस काळे आणि चमकदार आहेत. तो आकर्षक असून, त्याच्या हालचाली आश्चर्यकारक आहेत. अमेरिकेच्या सेंट एंटोनियोतील टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स सेंटरमधील पिंज-यात तो दिवसभर फिरत असतो.

यूटी २५९८ नावाच्या उंदरातील हे बदल रेपामाइसिन मिश्रणामुळे झालेले आहेत. हे औषध वृद्धापकाळ आणि त्याद्वारे होणा-या पेशींच्या हानीचा वेग कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर यकृत व हृदय युवकांच्या यकृत व हृदयासारखे काम करते. वयाच्या मानाने रक्तवाहिन्या भरपूर लवचिक आहेत. त्याच्या शरीरात गाठ असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे तो कॅन्सरच्या प्रभावापासून बराच काळ मुक्त असेल. यूटी २५९८ आणि रेपामाइसिनचा प्रयोग वृद्धापकाळासंदर्भात सुरू असलेल्या प्रयोगाचे एक उदाहरण आहे. दीर्घायुष्यासह पेशींमध्ये बदल करण्याबरोबरच वृद्ध पेशी काढण्यासाठी प्रयोग वैज्ञानिक करत आहेत.

मिशिगन विद्यापीठात आयुर्मानाचे जीवशास्त्रासंदर्भात ग्लेन केंद्राचे संचालक रिचर्ड मिलप म्हणतात की, वृद्धापकाळ आणि त्यासंबंधित आजारांचा वेग कमी करण्यासाठी गृहितकांना कल्पना मानले जात होते. मात्र, आता आम्ही याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघत आहोत. वृद्धावस्था दूर करणे हे या प्रयोगामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

रेपामाइसिन २० महिन्यांचे आयुष्य (मनुष्यासाठी ६० वर्षे) असलेल्या उंदरांना देण्यात आले आहे. तरीही त्यांच्यातील वृद्धापकाळाचा वेग कमी झाल्याचे आढळले आहे. मनुष्यावर हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याला उंदरांसारखा फायदा होऊ शकतो. वयाच्या ६० आणि ७० व्या वर्षीसुद्धा कायाकल्प होऊ शकतो. मनुष्य आणि उंदरांमध्ये आढळणा-या एमटीओआरच्या कार्यप्रणालीत रेपामाइसिन अडचणी निर्माण करते. ते पेशींना बळ वापरण्याचे निर्देश देण्यासाठी वाहतूक सिग्नलसारखे काम करते. मोठ्या प्रमाणावर अन्नग्रहण केलेले असल्यास ते पेशींना न्यूट्रीन ग्रहण करण्यासाठी व विघटनासाठी हिरवा कंदील दाखवते. एमटीओआरटी कार्यप्रणाली कमी कॅलरीपासून आयुष्य वाढवण्याच्या सिद्धांताची व्याख्या तयार करते. अन्नपचनाच्या प्रक्रियेत पेशींना खूप मेहनत करावी लागते. त्यामुळेच प्राण्यांना उपाशी ठेवण्याऐवजी एमटीओआरला शांत ठेवणे हे लक्ष्य असले पाहिजे. रेपामाइसिन हे काम करते, असे वाटते. वृद्धापकाळ थोपवण्यासाठी रेपामाइसिन सर्वात उपयुक्त संयोग मानले जाते. हॅरिसन व त्यांच्या साथीदारांना त्याच्या भविष्याविषयी आशा आहे. तसेच, त्याबाबत ते सतर्कही आहेत. दरम्यान, द्राक्ष आणि रेड वाइनमध्ये असणा-या रेसवेराट्रॉल संयोगाने त्या उंदरांचे आयुर्मान वाढवण्यात यश प्राप्त केले होते, ज्यांना मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त आहार देण्यात येत होता. मात्र, सामान्य आहारावर असलेल्या प्राण्यांसंदर्भातील आयुमर्यादा वाढविण्यासंदर्भात ते यशस्वी झाले नाही. तरीही संशोधकांचे प्रयत्न सुरूच आहेत. ग्लॅक्सोस्मिथक्लिनमध्ये यासंदर्भात काम
सुरू आहे.

संशोधकांच्या मते, दीर्घायुष्यासंदर्भातील सूत्र आपल्याच गुणसूत्रातच लपलेले आहे. तरुण प्राण्यांच्या रक्तात जीडी ११ प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. हार्वर्ड स्टेम सेल इन्स्टिट्यूटचे एमी वेजर्स प्राणी आणि मनुष्यांमध्ये अधिक आयुर्मान असलेल्यांमध्ये जीडी ११ हा घटक जास्त होता की कमी, याबाबत संशोधन करत आहेत. तसेच, जीडी ११ असलेल्यांमध्ये वृद्धापकाळाशी संबंधित आजार उदा. हृदयरोग, स्मृतिभ्रंश आणि कमजोर होणा-या मांसपेशी आढळून आल्या आहेत. जीडी ११ प्रोटीन हा एकमेव आशेचा किरण नाही.

कलयुगातील अमृत
१९६४ मध्ये पश्चिम आयर्लंडवरून घेण्यात आलेल्या धुळीतील काही नमुने यूटी २५९८ च्या आयुर्मान वाढवणा-या आहारात रेपामाइसिनचे अस्तित्व असल्याचे उघड झाले आहे. धुळीच्या या नमुन्यांमधून रेपामाइसिन नावाचे नवीन अँटिबायोटिक विकसित करण्यात आले. संशोधकांच्या निष्कर्षानुसार ज्या उंदरांना हे औषध देण्यात आले होते, ते इतर उंदरांच्या तुलनेत २० टक्के अधिक जगले. जॅक्सन लॅबोरेटरीमध्ये कंपाउंडवर अभ्यास करणारे डेव्हिड हॅरिसन म्हणाले, रेपामाइसिन अनेक प्रजाती, किडे, माशांपासून उंदरांवर काम करते.

काही धोकेही आहेत
रेपामाइसिनमुळे होणा-या नुकसानावर नजर टाकल्यास असे लक्षात आले की, हे कंपाउंड देण्यात आलेल्या उंदराच्या शरीराचा आकार ३० टक्क्यांनी कमी झाला होता. उंदरांचे डोळे खराब आणि त्यांना मधुमेह होण्याची शक्यता आढळून आली. नर उंदरांची प्रजनन क्षमता कमी झाल्याचे निदर्शनास आले. किडनी ट्रान्सप्लांटनंतर हा दावा करणा-या मनुष्यांमध्ये मधुमेहाची शक्यता अधिक पाहायला मिळाली, तरीही रेपामाइसिन सुरक्षित औषध आहे. रुग्ण हे औषध घेत आहेत. संशोधक आयुर्मान वाढवणारे असे औषध बनवतील, ज्याने कमी नुकसान होईल.

गुणसूत्रांवर असणार लक्ष
देना दुबल क्लोथो नावाच्या हार्मोनवर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील न्यूरोबायोलॉडिस्ट काम करत आहेत. उंदरांमध्ये क्लोथोचा स्तर वाढवल्याने त्यांचे आयुर्मान ३० टक्के वाढले आहे. पाचपैकी एका व्यक्तीमध्ये क्लोथो गुणसूत्र आढळते. अशा लोकांचे आयुर्मान तीन ते चार वर्षांनी अधिक असते. सफेद केसांसारख्या वृद्ध पेशी कमी करणे हीसुद्धा वृद्धापकाळ थोपवण्याची एक पद्धत होऊ शकते. मेयो क्लिनिकमध्ये डॉ. जेन वान ड्युरेन यांची टीम यासंदर्भात एक प्रयोग करत आहेत. उंदरांच्या डोळ्यांतील, मांसपेशीतील आणि चरबीतील मृत होत चाललेल्या पेशींना बाहेर काढून त्यांचे आयुर्मान वाढवण्यात आले.