Home | Divya Marathi Special | agriculture fruit product

फुलांच्या शेतीने दिले 'फळ', 14 लाखांचे उत्पन्न

विक्रम ढटवालिया (हमीरपूर) | Update - Jun 04, 2011, 01:08 PM IST

शेतात केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळाले नाही तर सहसा शेतकरी नाराज होतात. मात्र, कष्ट आणि थोडी कल्पनाशक्ती वापरली तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू शकते.

 • agriculture fruit product

  शेतात केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळाले नाही तर सहसा शेतकरी नाराज होतात. मात्र, कष्ट आणि थोडी कल्पनाशक्ती वापरली तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू शकते. हमीरपूरमधील चलाडा गावातील मंशाराम या शेतक:याने हे सिद्ध करून दाखवले आहे. अतिशय कमी शिकलेल्या मंशाराम याने ग्रीन हाऊसच्या माध्यमातून फुलशेती करून लाखो रुपये कमावले आहेत.

  मंशाराम याच्या शेताच्या आजूबाजूची जमीन नापीक होती. शिवाय सपाट नव्हती. मंशाराम याने ती जमीन सर्वप्रथम सपाट करून घेतली. त्यानंतर त्या जागेवर कर्ज घेऊन ग्रीन हाऊसची उभारणी केली. आणि आज मंशाराम याचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. विशेष म्हणजे आपल्या एका नातेवाइकाच्या सल्ल्यावरून मंशारामने ग्रीन हाऊस उभारणीचा निर्णय घेतला होता.

  मंशारामने एक हजार चौरस मीटर भागात ग्रीन हाऊसची उभारणी केली. यासाठी त्याला बारा लाख रुपयांचा खर्च आला. या खर्चापैकी त्याने सात लाख रुपयांचे कर्ज काढले आणि स्वत:कडचे पाच लाख रुपये घातले. अशा प्रकारे त्याने आपले स्वप्न पूर्ण केले.

  श्रमाने घालून दिला धडा
  या सर्व गुंतवणूकीतून मंशारामला गेल्या तीन वर्षांत जवळपास चौदा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ज्यापैकी नऊ लाखांचा त्याला निव्वळ फायदा झाला आहे. नापीक जमिनीमधे श्रम करून कसे उत्पादन काढता येते, याचा एक चांगला आदर्श मंशाराम याने सर्व शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे.

Trending