आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना विमानात बसण्याची सुरक्षित जागा कोणती?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८५ नंतर वायू दुर्घटनांच्या एका अभ्यासानुसार विमानातील मागील बाजूच्या मधील काही आसने सर्वाधिक सुरक्षित असतात. विमानात दोन-तीन मिनिटांतच आत लागलेली आग जीवघेणी होऊ शकते. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन नियमांनुसार बाहेर पडण्याच्या दरवाजांचे अंतर एक-दुसर्‍यापासून ६० फुटांपेक्षा जास्त नको. आपत्कालीन स्थितीत विमान ९० सेकंदांमध्ये रिकामे व्हायला हवे.

खराब वेळ आणि ठिकाण
एका अभ्यासानुसार, विमानामध्ये कॉरिडॉरजवळील आसने सुरक्षित आसनांच्या तुलनेत ५७ टक्के अधिक सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक विमान अपघात उड्डाणावेळी किंवा िवमान उतरताना होतात.

सूचनांकडे दुर्लक्ष
आसनांच्या मागील खिशात आपत्कालीन स्थितीतून वाचण्याचे उपाय सांगणारे सेफ्टी कार्ड असते. मात्र, ८९ टक्के प्रवासी ते वाचतच नाही. फक्त अर्धे प्रवासी सुरक्षेसंदर्भात सांगण्यात येणार्‍या सूचनांकडे लक्ष देतात.

सर्वाधिक सुरक्षित
विमानात मागून तिसर्‍या ओळीच्या मधील आसनांवरील मरणार्‍यांची संख्या (२८ टक्के) सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. आग लागल्यावर शेवटच्या ओळीत बसलेल्या प्रवाशांना दरवाजा जवळ असल्याने बचावाची संधी अधिक.

पाचवी रांग
आग लागण्याच्या परिस्थितीत दरवाजापासून पाच ओळींपेक्षा जास्त मागे असलेल्या आसनावर बसलेल्या लोकांची मरण्याची शक्यता जास्त असते.
पुढची आसने- 38% घातक
मधील आसने- 39% घातक
शेवटची आसने - 32% घातक
अभ्यासानुसार 17 व्यावसायिक प्रवासी विमानांच्या 1985 नंतरच्या घडलेल्या अपघातांच्या आधारावर प्रवाशांच्या वाचण्याची टक्केवारी काढण्यात आली आहे. या विमानांच्या आसन व्यवस्थेला ध्यानात घेण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...