आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AJANTA CAVES: बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तीचीत्रे, शिल्पकलेचा आदर्श नमुना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादपासून सुमारे 102 किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे आणि ध्वान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार आणि आश्रम आहेत.
लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839 मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.
अशी सापडली लेणी
शिकारीसाठी जॉन स्मिथ अजिंठा लेणीच्या घळीसारख्या पर्वतावर आला होता. येथून त्याला पर्वताच्या उदरात काहीतरी बांधकाम दडले असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना येथे लेण्या आढळून आल्या. त्यानंतर लेण्यांची स्वच्छता करण्यात आली.
सप्तकुंड तलाव
घळीसारख्या पर्वतावरुन धबधब्याच्या रुपांनी कोसळणारे निळेशार पाणी या तलावात जमा होतो. त्यामुळे याला सप्तकुंड असे नाव पडले असावे. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची 56 मीटर असून सुमारे 550 मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत.
अशी काढली दगडांवर सुंदर चित्रे
प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात डोंगरातील दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अजिंठाचे अतुलनीय सौंदर्य...बघा एकापेक्षा एक सरस फोटो...अजिंठाच्या वातावरणात हरखून जा...