आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त गटारीचे... रात्रीच्‍या उदरात उदासीन मळमळणारे आणि छातीमध्‍ये जळजळणारे Alcohol!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या देशात सणांची कमतरता नाही. प्रत्‍येक आठवड्याला एक सण धरला तरी, सणांचा हिशेब करता येणार नाही. दिवे लावण्‍यासाठी दिवाळी ( वाईट अर्थाने नाही), बोबंलण्‍यासाठी शिमगा. अबीर गुलालासाठी 'रंगपचंमी'. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे सण आहेत. माणंसाने आपल्‍या सोयीनुसार सणांची वर्गवारी करून ठेवली आहे. या सणांच्‍या माध्‍यमातून आपल्‍या सर्व इच्‍छा पुर्ण कशा करता येतील याचा प्रयत्‍न प्रत्‍येकजन करत असतो. आपल्‍या पुर्वजानी आपण बिगडणार नाहीत,यासाठी वेगवेगळ्या सणांची रेलचेल करून ठेवली आहे. हे सण्‍ा कमी पडत असल्‍यामुळे कदाचीत, आणखी सणांची आवश्‍यकता आजच्‍या माण्‍ासाला पडू लागली आहे.
संशोधन करून माणसाने वेगवेगळे शोध लावले. अगदी तसाच एक शोध आजच्‍या माणसाने लावला आहे. हा लावलेला शोध 'गटारी अमवश्‍येचा. तळीराम तर ज्‍या कोणी या गटारीचा शोध लावला त्‍याचे आभार व्‍यक्‍त करण्‍यासाठी याला-त्‍याला त्‍याचा पत्ता विचारत असतील. खरच काय आहे या गटारीचा इतिहास? याचा विचार गटारे साजरे करणारे आणि तिला विरोध करणारे यापैकी कोणीच करत नसावेत. आपल्‍या प्रियशीची वाट पाहिल्‍यासारखी प्रत्‍येकजण गटारीची वाट पाहात असतो. कारण गटारी म्‍हणजे प्रत्‍येकाला बेहोश करणारा सण. ज्‍यांनी मद्याला किंवा ड्रींकला रामराम ठोकला, ते ही गटारीची अतुरतेने वाट पाहात असतात. ( पिण्‍यासाठी की पाहण्‍यासाठी त्‍यांनाच माहित). कोणत्‍या पुराणात किंवा कुराणामध्‍ये या गटारीची नोंद केलेली नाही. ( मद्याचे संदर्भ कदाचीत सापडतील).
गटारीविषयी आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...