आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठही आयव्ही लीग स्कूलमध्ये अव्वल, अमेरिकेच्या 30 विद्यार्थ्यांमध्ये निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा चंद्रशेखर
वय: १७ वर्षे
कुटुंब: वडील- चंद्रशेखर दौड्डावीरा, आई- प्रतिभा. दोघेही अभियंते आहेत.
शिक्षण: थॉमस जॅफरसन हायस्कूल, व्हर्जिनिया
आठही आयव्ही लीग स्कूल हिला प्रवेश देण्यास तयार.
दोन वर्षांपूर्वी पूजा शाळेत होती त्या वेळची गोष्ट आहे. त्या वेळी उन्हाळ्यामध्ये तिला इंटर्नशिप करावयाचे होते. मीटर कॉर्पोरेशनमध्ये जागा मिळाली. पूजा यासंदर्भात म्हणाली, मम्मी आणि पप्पा दोघेही अभियंते असल्यामुळे मला कायम चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि सुरुवातीपासूनच माझा कल कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्सकडे होता. यामुळे १५ वर्षांच्या वयात पार्किन्सन्सवर एक अॅप तयार केेले होते. शाळेत विज्ञानावर दाखवलेल्या डॉक्युमेंट्रीमुळे हा विषय आवडू लागला.

शाळेत वेब डिझायनिंग रोबोटिक्स, गेम प्रोग्रामिंगसारखे विषयही चांगले वाटू लागल्याने हायस्कूलमध्ये एपी कॉम्प्युटर सायन्स क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी वर्गात तीनच मुली होत्या. वरच्या स्तरावरील मॅथ्स व कॉम्प्युटिंग क्लासेस शिकताना मुलांच्या तुलनेत मुली कमी दिसू लागल्या. त्यामुळे तंत्रज्ञानामध्येही मुलींनी पुढे गेले पाहिजे, असे पूजाला वाटू लागले. यातूनच तिने प्रोजेक्ट गर्ल्स कंपनी स्थापन केली. सध्या त्या याच्या सीईओ आहेत. कुठलीही पार्श्वभूमी नसताना ही कंपनी उभी राहिली. यामध्ये मिडल स्कूलच्या मुलीही नवे सोल्युशन्स आणू शकतात. यात सहभागी आपल्या प्रोजेक्टचा कोड आणि प्रोटो बनवू शकतात.

यात त्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून संशोधन समजावण्यास सांगितले जाते. गेल्यावर्षी ६ एप्रिल रोजी पूजाची स्टेनफोर्ड शी इन्क्लूड फेलोशिपसाठी संपूर्ण अमेरिकेतील ३० विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली. त्यांना आपली कंपनी प्रोजेक्ट गर्ल्सचे काम सिलिकॉन व्हॅलीच्या परिषदेत दाखवण्यास सांगितले होते. यादरम्यान त्यांना गुगल आणि फेसबुकच्या मुख्यालयातही नेण्यात आले. पूजाच्या कंपनीच्या बोर्डात जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. कमलजित संघेरा आहेत. आठही आयव्ही लीगचे यश प्राप्त केल्याचे वृत्त सर्वात पहिल्यांदा वॉशिंग्टन पोस्टने ब्रेक केले होते.
बातम्या आणखी आहेत...