आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी लवकर उठल्यास सर्व कामे सोपी होतात: संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेक्झांड्रा सिफेरलिन
नव्या संशोधनामुळे हे सिद्ध झाले आहे की, सकाळी लवकर उठणारी माणसे उशिरा उठणाऱ्यांपेक्षा अधिक निरोगी राहतात. त्या व्यक्ती अधिक कर्तव्यनिष्ठ आणि कठोर परिश्रम करणाऱ्या असतात. अशा व्यक्ती जास्त काम करतात. वेळेच्या नियोजनावर अनेक पुस्तके लिहिणाऱ्या प्रॉडक्टिव्हिटी एक्सपर्ट लॉरा वेंडरकॅम यांचा दावा आहे की, लोकांनी आपली दिनचर्या बदलावी कारण तेच व्यावहारिक आहे.

वेंडरकॅम म्हणतात, लोकांची सकाळची वेळ उपयोगी असते, कारण ते स्वत:पर्यंतच मर्यादित राहतात. दुसरी व्यक्ती त्यांच्या वेळेत वाटा मागायला येत नाही. व्यायामासाठी अंथरुण सोडणे, एखाद्या क्रियाशील कामाची सुरुवात करणे वा तणावमुक्त होऊन चहा, कॉफीचा आनंद घेतल्यास जास्त वेळ न देताही तुम्ही खूप काही मिळवू शकता.  सूर्योदयाबरोबर दिवसाची सुरुवात करणाऱ्या व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक कणखर असतात. त्यांच्या महत्त्वाच्या कामात अडथळा येत नाही. आपल्या आवडीचे काम ते सर्वप्रथम करू शकतात. एकूणच सकाळी लवकर उठणे आवश्यक असते. त्यासाठी काय करता येईल, यासाठी खालील गोष्टी अजमावता येतील...
 
- झोपेचा मोह कसा टाळायचा?
तुम्हाला रात्री जाग येते तेव्हा झोपेचा मोह पुन्हा झोपायला भाग पाडतो. मात्र नेमकी हीच परिस्थिती सकाळी आळस येण्यासाठी जबाबदार असते. एरिझोना विद्यापीठाच्या मेडिसिन कॉलेजचे विशेषतज्ज्ञ मायकल ग्रेंडनेर यांचे म्हणणे आहे की, हात-पाय हलवल्यास, पाणी पिल्यास वा पुन्हा आंघोळ केल्यास झोपेचा मोह दूर सारता येतो.
 
- सक्रियता गरजेची
अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे की, एखादा व्यायाम तुम्ही ठरलेल्या वेळी करत असाल तर सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तो व्यायाम करा.  त्यामुळे अचानक एखादे काम उद््भवल्यास व्यायामात खंड पडणार नाही. वेंडरकॅम यांचे म्हणणे आहे की,  आपली दिवसभरातील अनेक कामे आधीपासूनच निश्चित असतात. लवकर उठल्यास ही सहजपणे पूर्ण करता येतात.
 
- शरीराचे घड्याळ
सकाळचा सूर्यप्रकाश शरीरातील अंतर्गत घड्याळ व्यवस्थित करतो. झोपेचे हार्मोन्स मेलाटोनिनचा स्तर व्यवस्थित ठेवायला मदत करतात. त्यामुळे सकाळी लवकर उठायला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. ग्रेंडनेर म्हणतात, सकाळचा सूर्यप्रकाश खूपच महत्त्वपूर्ण आहे. तो शरीराला लवकर उठण्याचे संकेत पाठवतो. याचे विरुद्ध सत्य हे की, रात्रीचा प्रकाश (स्मार्टफोनचाही) तुम्हाला सक्रिय करतो. त्यामुळे मेंदू सचेतन राहू शकतो.
 
स्वत:लाच बक्षीस द्या
मानवी स्वभाव असुविधाजनक कामापासून वाचू पाहतो. त्यामुळे सकाळी लवकर उठणे तुम्हाला ओझे वाटत असेल तर काही बदल करण्याची गरज आहे. झोपेशी झगडण्यापेक्षा प्रोत्साहन मिळवण्यासाठी स्वत:लाच तयार करा. स्वत:लाच बक्षिसी द्या. आवडत्या नाश्त्याने ही सुरुवात करता येईल.

- काही वेगळे करा
वेंडरकॅम सांगतात, सकाळी लवकर उठणाऱ्या यशस्वी व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात स्वत:ला आनंदीत करणाऱ्या कामांनी करतात. त्यामुळे टॅब, मोबाइलवर बातम्या वाचण्याऐवजी एखाद्या मित्रासोबत व्यायामासाठी बाहेर पडा. चांगले पुस्तक वाचा वा लिहा. वेंडरकॅम सांगतात, सकाळी उठल्यानंतर आवडते काम करणे अधिक सोपे आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, सीआयए हॅकर्ससमोर व्हॉट्सअॅपही सुरक्षित नाही...
बातम्या आणखी आहेत...