आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिकता वाढली तरच वर्तन बदलेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यात्म परमेश्वरवादी असावे असे आहे काय? अध्यात्माची ऐतिहासिक भूमिका कोणती? आणि सध्या सामाजिक भूमिका कोणती असू शकते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आपण अध्यात्माच्या सद्य:स्थितीबद्दल चर्चा करू शकत नाही.

मुख्यत्वे आपल्यासमोर अध्यात्माची दोन रूपे आहेत. पहिले - धर्मसंस्थाकेंद्रित अध्यात्म, ज्यात अध्यात्म म्हणजे धर्माचे सार अशा दृष्टीने पाहिले जाते. धार्मिक अचेतनेपासून स्वतंत्र सत्तेच्या स्वरूपात त्याला मान्यता मिळू शकत नाही. म्हणजे ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन, वैष्णव आध्यात्मिकता. यातही दोन भेद सुचवता येतात.
एक जे कोणत्याही परम तत्त्वाची सत्ता मान्य केल्याशिवाय आध्यात्मिकतेची कल्पनाच करू शकत नाहीत आणि दुसरे ते असतात जे आध्यात्मिकतेसाठी सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पनाच मानत नाहीत. अद्वैत वेदांतवादी आपल्यापेक्षा वेगळ्या परमेश्वरास मानत नाहीत. त्यांना आत्मसाक्षात्कार होतो तो कोणा सत्तेचा नव्हे.

पारंपरिक धर्म बदनाम होत गेल्याने एक नवे रूप उदयास आलेले आहे. जे धर्मसंस्थेच्या पासून वेगळ्या आध्यात्मिकतेची भूमिका मांडतात. कारण त्यांच्या दृष्टीने धर्मसंस्थांनी हिंसेला आश्रय दिल्याने अप्रासंगिक झाले आहेत. उदा. गेल्या शतकातील महान तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे नाव घेता येईल. शेवटी प्रचलित रूढी-परंपरेच्या विरोधात जाऊन अध्यात्मासाठी परमेश्वरवादी होणे किंवा धर्मसंस्थेचा सदस्य असणेही आवश्यक नाही.

ही आग्रही भूमिका सोडून, परंपरागत धर्म आणि परमेश्वरावर आस्था/अनास्थेपासून वेगळे अध्यात्माचे रूप कोणते किंवा कसे असू शकते? त्याच्या तात्त्विक घटकाची माहिती कशी मिळवता येईल? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. याची एक पद्धत असू शकते. आम्ही विविध संस्कृतींद्वारे निर्धारित विश्वास आणि भावनांना महत्त्व न देता त्या संस्कृतीत वाढलेल्या आध्यात्मिक संतांमध्ये समानता कशी दिसून येते, हे पाहण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यात आढळून येणार्‍या सारख्या धार्मिक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण अध्यात्माचे नवे प्रारूप तयार करू शकतो. संतांची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

पहिले- जी तत्त्वे माणसामाणसांना एकमेकांचे प्रतिद्वंद्वी बनवून एकमेकांच्या विरोधात उभी करतात, अशा तत्त्वांपासून संत अलिप्त असतात. दुसरे, सर्व जीवांच्या बाबतीत प्रेम, करुणा, औदार्य, परहित साधन आणि त्याग करण्याची वृत्ती ही संतांची मुख्य लक्षणे आहेत. संत समस्त प्राणिवर्गाचा नि:स्वार्थी मित्र असतो.
महाकवी तुलसीदासांनी म्हटले आहे, "ओंजळीत ठेवलेल्या फुलांचा सुगंध जसा दोन्ही हातांना सारखा येतो, तशाच प्रकारे संत मित्र आणि शत्रू दोघांचेही भले करत असतात.'

हा सद््गुण "योगसूत्र'आणि बौद्ध ग्रंथात दिलेला आहे. अर्थात मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा असा उल्लेख आढळतो. या सद््गुणांनाच आम्ही आधारभूत आध्यात्मिकता म्हणू शकतो. ती संतांना निर्भयता आणि आंतरिक शक्ती प्रदान करत असते. आणि जी दृष्टी, अनुभूती, साधना आणि मार्ग संत निर्माण करतात तोच अध्यात्म धर्म आहे. आध्यात्मिक साधनेचा उद्देश मनुष्याचे आंतरिक रूपांतरण असते. ते चेतनेचे ऊर्ध्वीकरण आहे. आत्म अनुभूतीद्वारे आत्मसाक्षात्कार आहे.

ज्या आधारभूत आध्यात्मिकतेची चर्चा आम्ही वर केलेली आहे, त्या धर्मसंस्थांपेक्षा वेगळ्या आहेत, असे नाही; परंतु त्या आपल्या मार्गात अडथळे आहेत, असे आम्ही मानतो. कारण आध्यात्मिकता आंतरिक शोध /स्वत:च्या अनुभूतीचा विषय आहे; परमेश्वर किंवा स्वर्गप्राप्तीचा नव्हे.

यासाठी धर्मसंस्था आणि मध्यस्थांच्या रूपात धार्मिक नेत्यांना काही स्थान नाही. विश्वास नव्हे शोध, पूजा नव्हे ध्यान, परमेश्वर नव्हे तर सत्य, स्वर्ग नव्हे मुक्ती आदी भेदांच्या आधारेच आपण धर्मसंस्था आणि आध्यात्मिकतेदरम्यान असलेला फरक आणखी स्पष्ट रूपाने समजू शकतो.

ऐतिहासिकदृष्ट्या धर्मसंस्थाकेंद्रित अध्यात्माची सामाजिक भूमिका ढोंग आणि भ्रष्टाचारास आश्रय देण्याबरोबरच दलित अणि स्त्रियांवर अन्याय करणारी आहे. राजकीय पारतंत्र्यातही आध्यात्मिक स्वातंत्र्य अबाधित राहिले हा विरोधाभास म्हणावा लागेल. पुराणमतवादी व्यक्तिकेंद्रित अध्यात्म आपल्या व्यक्तिकेंद्रित्वास प्रोत्साहन देऊन सामाजिक पलायनवादास आश्रय देेते, याला पुष्टीच मिळते. शेवटी सामाजिक जीवनात त्याची प्रासंगिकता संदिग्ध असते.

धर्मसंस्थेपासून स्वतंत्र अध्यात्माच्या प्रारूपाची चर्चा आपण गतकाळापासून करत आलेलो आहोत, त्यांची सामाजिक भूमिका काेणती असू शकते. ते सद््गुण जे संतांमध्ये आढळून येतात, जगाच्या कल्याणासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. संतांच्या चरित्रात आध्यात्मिकता आणि नैतिकतेचा अभूतपूर्व संगम पाहण्यास मिळतो. या दोहोंच्या मागे नि:स्वार्थीपणाची भूमिका दिसून येते.

यामुळेच मीपणा गळून पडतो. प्रेम, स्वातंत्र्य, आणि ज्ञानाच्या रूपात आध्यात्मिकतेस उपलब्ध करण्यासाठी मीपणा दूर करावा लागतो. आणि नैतिकतेसाठीसुद्धा हाच सिद्धांत कार्य करतो. नैतिक रूपात शुभकार्य नेहमी स्वकेंद्रित कार्यापासून वेगळे करता येेते. यासाठी आध्यात्मिकता आणि नैतिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आध्यात्मिकता आतील बाजू आहे, तर नैतिकता सामाजिक बाजू आहे. जसजसा आध्यात्मिकतेचा विकास होत जातो तसतसा स्वकेंद्रित व्यवहार कमी होऊ लागतो आणि व्यक्तीचे वागणे नैतिक होऊ लागते. तसे पाहता खासगी जीवनात आध्यात्मिकता आणि सार्वजनिक जीवनात अध्यात्म यामधला विरोध कसा मिटवावा, हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.

वरील आव्हानाचा यशस्वीरित्या सामना करण्याची क्षमता धर्मसंस्थाकेंद्रित अध्यात्मात तर अजिबात नाही. स्वार्थाच्या हातातील बाहुले बनल्याने धर्मसंस्था या समस्यांचा भाग बनत चालल्या आहेत. मग धर्मसंस्थांच्या स्वतंत्र अध्यात्मापासून एखाद्याचे समाधान होण्याची शक्यता दिसते का? अध्यात्मप्रेरित नैतिकता आधुनिक जीवनातील समस्या दूर करण्यात सहायक होतील तिथपर्यंत त्यांची मर्यादा आहे.

ज्या समस्याची चर्चा आम्ही वर केलेली आहे, त्या दूर करण्यासाठी अहंकाराचा त्याग आणि सर्वांप्रति प्रेमभावना असणे पुरेसे नाही. सामाजिक अन्यायाने पीडित मनुष्यासोबत त्याच्या अधिकारासाठी आपल्याला प्रेरणा प्राप्त व्हावी, याची खरी गरज आहे.

डॉ. आलोक टंडन
रिसर्च फेलो, इंडियन कौन्सिल आॅफ फिलॉसॉफिकल रिसर्च प्रोजेक्ट
बातम्या आणखी आहेत...