आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE : देशविदेशात पर्यटन करण्याची आवड असणार्‍यांसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.touristlink.com : देशविदेशात पर्यटन करण्याची आवड असणार्‍यांसाठी ही वेबसाइट एक चांगला पर्याय आहे. ही वेबसाइट सोशल प्लॅटफॉर्मवर काम करत असल्याने याच्या मदतीने सहकारी पर्यटकासोबत माहिती शेअर करता येते.तसेच याच्या मदतीने एक ग्रुप तयार करून पर्यटनाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही एखाद्या नव्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणार असाल तर ही वेबसाइट तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरते.

या संकेतस्थळावर जगातील वेगवेगळ्या भागात फिरलेल्या लोकांसोबत ओळख होऊ शकते.त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी,खाद्यसंस्कृती ,प्रेक्षणीय स्थळे,नाइट लाइफ,विविध कार्यक्रम यांची माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे इच्छित ठिकाणची हॉटेल बुकिंग सुद्धा करू शकता. ही वेबसाइट वापरणार्‍यामध्ये भारतीयांची संख्या सर्वात जास्त आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने भारतीय व्यक्तींकडून सर्वात जास्त पाहिले जाणार्‍या पर्यटन स्थळांची माहिती सुद्धा मिळते.