आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीयांची भागीदारी एक टक्का, तरीही अमेरिकेचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या विकासात अमेरिकेचे योगदान तर राहिलेच, पण भारतानेसुद्धा अमेरिकेच्या प्रगतीत कमी योगदान दिलेले नाही. नुकतेच भारत दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो ब्रायडेन यांनीसुद्धा ही बाब मान्य केली आहे.

भारत आणि अमेरिका मिळून एक चांगले, मजबूत भविष्य निर्माण करू शकतात. अर्थव्यवस्था, संरक्षण आणि जलवायू परिवर्तन यासारख्या प्रमुख मुद्दय़ांवर मात करण्याची क्षमता या दोन्ही देशांमध्ये आहे. भारत व अमेरिकेच्या बाबतीत असेच काहीसे वक्तव्य भारत दौर्‍याच्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन कॅरी यांनी केले होते. अमेरिकेच्या विकासात भारतीयांच्या योगदानावर प्रकाश टाकताना जॉन म्हणाले होते की, अमेरिकेसाठी भारत आधीपासूनच महत्त्वपूर्ण राहिला आहे. आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो ब्रायडेन यांनीसुद्धा हेच म्हटले आहे. तसे पाहिल्यास ही कोणतीच नवीन बाब नाही. भारताचे अमेरिकेच्या बाबतीत सुरुवातीपासूनच झुकते माप राहिले आहे. तत्कालीन सोव्हिएत संघाचा लष्करी सहयोगी असतानाही भारताने तेच केले होते. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर तर जगातील या दोन्ही लोकशाही देशांमधील सहकार्य अनेक पटीने वाढले आहे. भारतीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अमेरिकेच्या विकासात आपले योगदान देत आले आहेत. अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीयांची भागीदारी फक्त एक टक्का जरी असली तरी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भारतीयांचे योगदान आठ टक्के आहे. त्यामुळेच भारतीय प्रोफेशनल्सना अमेरिकेत मागणी आहे. अमेरिकेला भारताचा किती आधार आहे, हे जे. पी. मॉर्गन या गुंतवणूक बँकेच्या एका अहवालातून सिद्ध होते. यात म्हटले आहे की, अमेरिकेत तेथील आयबीएम व अँक्सेंचरसारख्या कंपन्यांपेक्षाही जास्त रोजगार भारतीय कंपन्या देत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, भारतीयांनी निर्माण केल्या एक लाख नोकर्‍या