आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत सुट्या संपत आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ मे रोजी अमेरिकेच्या ह्युस्टन आणि फिलाडेल्फिया शहरांत लागलेल्या एच अँड एम कंपनीच्या होर्डिंगने लोकांचे लक्ष वेधले आहे.स्टायलिश आणि स्वस्त कपड्यांसाठी प्रसिद्ध स्वीडिश रिटेलरची जाहिरात नोकर्‍यांसंबंधी होती. होर्डिंगवर इतर फायद्यांसह पाच हप्त्यांच्या सुटीचा उल्लेख होता. कंपनीचे उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष डेनियल कुले म्हणतात, एचएम आपल्या स्कँडिनेवियाई डीएनएवर निर्धारित आहेत. अमेरिकी कायम युरोपीय लोकांवर जास्त सुट्या घेण्याचा आरोप करत असतात.

एच अँड एमच्या भरती अभियानाच्या जाहिरातीने अमेरिकन कामगारांच्या चिंतेबाबत बरेच काही म्हटले आहे. कंपनी कामगारांना जास्त सुट्या घेण्यासाठी प्रेरित करत आहे. अमेरिकन ट्रॅव्हल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार ९६ टक्के अमेरिकन कर्मचारी सुटीचे महत्त्व ओळखतात. अभ्यास सांगतो, सुटी घेतल्याने शरीर रिचार्ज होते. हे हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. मात्र, गेल्या ३० वर्षांमध्ये अमेरिका सुटीविरहित देश बनला आहे.

या परिस्थितीची अनेक कारणे आहेत. सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेच्या उदयाने अकुशल कामगारांची संख्या वाढली आहे.संगठित क्षेत्रांच्या कामगारांची संख्या घटली आहे. कामगारांना नोकरीत असुरक्षित असल्याचे वाटते.जीएफके आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या सर्व्हेत सांगितले आहे, अमेरिकन कामगारांनी २०१३ मध्ये फक्त १६ सुट्या घेतल्या होत्या.
१९६८ मध्ये एका कायद्यानुसार केंद्र सरकारच्या अनेक सुट्या सोमवारी करण्यात आल्या. त्यामुळे सलग तीन दिवस सुट्या मिळत होत्या. १९७० नंतर आर्थिक वृद्धिदर कमी होण्याबरोबरच लोक जीवनमानाचा स्तर कायम ठेवण्यासाठी जास्त काम करू लागले. एका अभ्यासानुसार २००१ पर्यंत एक तृतीयांश अमेरिकनांनी म्हटले, कामाचा बोजा आहे.
सुट्यांची सोय असूनही अमेरिकन कामगारांनी २०१३ मध्ये ४२ कोटी ९० लाख सुट्यांचे दिवस सोडले. एका अभ्यासात १७ टक्के मॅनेजर्सनी सांगितले, सुट्या घेणारे कर्मचारी कमी समर्पित होते, १३ टक्के मॅनेजर्सनी सांगितले, अशा कर्मचार्‍यांना बढती मिळण्याची शक्यता कमी आहे.

सुट्यांचे गणित
- २०१३ मध्ये 3327 अब्ज रुपये मूल्याच्या सुट्यांचा कर्मचार्‍यांनी उपभोग घेतला नाही.
- ७४ टक्के अमेरिकन कर्मचार्‍यांना पगारी रजा मिळतात.

सुट्या न घेण्याची कारणे
- ४० टक्के म्हणतात, परतल्यावर जास्त काम करावे लागते.
- ३५ टक्के म्हणतात, त्यांचे काम कोणी करू शकत नाही.
- ३३ टक्के म्हणतात, सुट्या घेणे शक्य नाही.
- २८ टक्के म्हणतात, कामाप्रति समर्पण दाखवण्यासाठी सुट्या घेत नाहीत.
- २२ टक्के म्हणतात, सुटीमुळे त्यांचे काम दुसर्‍याला देणे त्यांना पसंत नाही
बातम्या आणखी आहेत...