आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी नागरिकांचा दहनविधीकडे कल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत मृत्यूदेखील मोठी उलाढाल आहे. हा 794 अब्ज रुपयांचा व्यवसाय झाला आहे. 1998 मध्ये इटर्नल रीफ्स कंपनीने मृतांच्या अस्थी समुद्रात ठेवायला सुरुवात केली होती. केवळ 24 टक्के अमेरिकन लोक दहनविधी करीत होते. उत्तर अमेरिका दहनविधी असोसिएशन (सीएएनए) नुसार 2011 मध्ये दहनविधीचे प्रमाण 42 टक्के झाले होते. या वाढीचे एक कारण आर्थिक मंदी आणि अमेरिकेत सुरू झालेली काटकसर हे आहे. कित्येक राज्यांत दहनविधीचे प्रमाण 70 टक्के झाले आहे.


हा दर असाच राहिल्यास 2017 पर्यंत दर दोनपैकी एक अमेरिकी नागरिक पारंपरिक दफनविधीऐवजी दहनविधी पसंत करील, असा अंदाज सीएएनएने व्यक्त केला आहे. दफनविधीच्या तुलनेत दहनविधीचा खर्च एकतृतीयांश आहे. फ्युनरल इंडस्ट्री अस्थिविसर्जन, संरक्षणाच्या पद्धतींसाठी नव्या ऑफर देत आहे. समुद्रात कोरल रीफमध्ये अस्थी ठेवण्यासह काही इतर उपाय सादर केले आहेत. त्यात अस्थींची आतषबाजी, शॉटगनच्या गोळ्यांनी विखुरणे, आर्टवर्कमध्ये रंगाच्या रूपातील वापर, दागिन्यांमध्ये किंवा कलशात ठेवणे यांसारखे प्रयोग होत आहेत.
अमेरिकेत पहिली आधुनिक शवदाहिनी डॉ. फ्रान्सिस लेमोयने यांनी 1876 मध्ये तयार केली. 1901 मध्ये ती बंद होईपर्यंत 42 दहनविधी झाले. 19 व्या शतकाच्या अखेरीस शवदाहिनी बनण्याचे प्रमाण दरवर्षी एक असे होते. त्यानंतर रंगीत काचेच्या खिडक्या, संगमरवरी लादी व चित्रांनी सजलेल्या भिंतींचे शवदाहगृह बनू लागले. तरी 1960 पर्यंत तीन टक्के प्रेतेच जाळली गेली.


सीएएनएनुसार 2008 मध्ये मंदीपूर्वी प्रेत जाळण्याचे प्रमाण 36.2 होते. हे प्रमाण वर्षाकाठी 1 टक्क्याने वाढत होते. नंतर हे प्रमाण वर्षभरात दुप्पट झाले. काही राज्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. 2011 मध्ये प्रत्येक राज्यात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत जास्त दहनविधी झाले. अमेरिका आणि कॅनडात सर्वाधिक दहनविधी करणा-या सीएएनएनुसार दहनविधीचा सरासरी खर्च 1,52,335 रुपये आहे. एनएफडीए (नॅशनल फ्युनरल डायरेक्टर्स असोसिएशन) दफनविधीचा खर्च 4,59,675 रुपये आहे. त्यात व्हॉल्ट्सचा दर अंतर्भूत आहे. सीएएनएचे माजी प्रमुख निकोडेमस सांगतात, दहनविधीशी संबंधित व्यवसाय वाढू लागला आहे. या वर्षाखेर 60 टक्के दहनविधी होऊ लागतील, असा दावा त्यांनी केला आहे. ख्रिस्ती धर्मीय असल्यामुळे अमेरिकेत दहनविधीला अडचण येते. रोमन कॅथॉलिक चर्च याच्या विरोधात होते. 1960 मध्ये चर्चने दहनविधी मान्य केला. 1997 मध्ये पाद्री अस्थिविसर्जन प्रार्थनेत सामील झाले. यहुदी व इस्लाममध्ये दहनविधीवर बंदी आहे. अमेरिकेत मात्र यहुदींमध्ये दहनविधी वाढू लागले आहेत.