आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळांत दिले जाते योगासह एकाग्रतेचे प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुइसविले, अमेरिकेत चालू असणाऱ्या केन रन एलिमेंटरी शाळेमध्ये क्रिस्टिना जॉन्सनचा वर्ग सर्वात शांत जागा असायला पाहिजे हाेती. तेथे डेस्कऐवजी फरशीवर सहा रांगांमध्ये योग करण्यासाठी मॅट अंथरण्यात आलेली आहे. केवळ एक सोडून सर्व लाइट बंद आहे. दोन स्पीकर्समधून जमिनीतून पाणी वाहिल्यासारखा आवाज येतो. पाचव्या वर्गात अंदाजे दोन डझन मुले आपल्या चपला काढून डोळे बंद करून बसले आहेत. रिलॅक्स होण्यासाठी सर्व जण जॉन्सन यांच्या आदेशाचे पालन करत आहेत. ते म्हणतात की, दीर्घ श्वास घ्या. मुले एक हात छाती तर दुसरा हात पोटावर ठेवतात. पुन्हा श्वास घेतात आणि सोडतात.

पुढची ४५ मिनिटे जॉन्सन मुलांना मानसिक एकाग्रतेचा (माइंडफुलनेस) व्यायाम करवून घेतात. हा व्यायाम सध्याच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. मुले योगाचे अनेक प्रकार करतात. केन रन स्कूलमध्ये किंडरगार्टनच्या वरच्या वर्गातील मुलांना आठवडयात दोन वेळा व्यायाम करावा लागतो. अमेरिकेत आता मानसिक एकाग्रतेचे आंदोलन शाळांपर्यंत पोहोचले आहे. पण यामुळे शिक्षणाचा स्तर,विद्याथ्र्यांचे लक्ष तसेच व्यवहार आणि संवेदनशीलता यांच्या स्थितीत सुधारणा होईल का? लुइसविलेच्या २६ शाळांमध्ये यासाठी सात वर्षांचा एक प्रकल्प (कंपेशनेट स्कूल्स प्रोजेक्ट) चालू आहे.

शिक्षणतज्ञांचे असे म्हणणे आहे की, मानसिक एकाग्रता शिकणाऱ्या मुलांसाठी चिंता,लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, आणि दादागिरी यावर मात करणे हे खरे आव्हान आहे. ज्येष्ठ लोकांना योग, ध्यान आणि दीघर् श्वास घेण्याचा व्यायाम यापासून फायदा होतो. संशोधनात असे दिसून आले की, यामुळे ताण,चिंता कमी होते आणि गाढ झोप लागते तसेच आजारपण दूर पळते.
अशा प्रशिक्षणाचा चार वषर्ाच्या मुलांना फार फायदा होतो. व्हिस्काॅन्सिन विद्यापीठात शास्त्रज्ञ लिजा फलूक यांच्या पाहणीनुसार १२ आठवड्याच्या प्रशिक्षणामुळे मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळतात. ते अनेक शाळांमध्ये याचे प्रशिक्षण देतात. यामुळे मुलांमध्ये दयेची भावना निर्माण केली जाऊ शकते असेही त्या म्हणतात.

नार्थ कॅरोलिना विलमिंगटन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीत केजी स्तरावरील मुलांना योग आणि तणावमुक्तीसाठी प्रशिक्षण दिले गेले. दोन आठवडयानंतर अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत लक्ष देणे,सजगता आणि प्रसन्नता याबाबतीत प्रगती झालेली आढळून आली. शिक्षकांनाही मानसिक एकाग्रतेचे प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. या उपक्रमाचे संचालक क्रिस मेकेना म्हणतात की, जर तुमही आधिक सजग, उदार आणि मुलांना समजून घेणारे शिक्षक तयार करताल तर त्याचा मुलांवर आधिक सकारात्मक प्रभाव पडेल.
दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील मेडिसिन स्कूल येथे सहायक प्राध्यापक रांडये सेंपल सांगतात की, मानसिक एकाग्रतेचा अभ्यास याचा तातडीने परिणाम होतो. हळूहळू श्वास घेण्या आणि सोडण्याने हृदयाची गती मंद होते,आणि रक्तदाब कमी होतो. त्यावेळी होणाऱ्या हालचालींवरही मुले लक्ष केंद्रित करू लागतात. दुसऱ्या एका संशोधनात असे दिसले की, शिक्षक इकडे तिकडे विखुरल्याने तणाव वाढविणाऱ्या कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण मुलांमध्ये वाढते. न्यूयॉर्क शहरातील ३६ सरकारी एलिमंटरी शाळांमध्ये शेकडो शिक्षकांना माईंडफुलनेस आणि तणाव कमी करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. हे प्रशिक्षण घेणारे शिक्षक आपल्या तणावाला चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील असे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याचा फायदा मुलांनाही मिळाला. यामुळे प्रोत्साहित होऊन संशोधक आणि पालकांनीही सर्व सरकारी शाळांमध्ये मानसिक एकाग्रतेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्याची मागणी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र प्रत्येक जण असाच विचार करत नाही असेही दिसून आले. मेकेना म्हणतात की, जर अभ्यासक्रमात कला आणि संगीत नसेल तर तुम्ही याचा समावेश करू शकणार नाही. सर्वच् पालकांना हे स्वीकारार्ह नाही. ओहियोच्या एका शाळेत २०११ साली माईडफुलनेसचा कार्यक्रम चालविला गेला. त्याचे परिणाम चांगले दिसल्यानंतर अन्य शाळांमध्येही ही प्रणाली लागू करण्यात आली. पण पालकांनी ही तर बुद्ध धर्माची शिकवण असल्याची तक्रार केली आणि हे वर्गात शिकविले जाऊ नये असे सुचविले. शेवटी २०१३ साली हा कार्यक्रम बंद करावा लागला. अशी टीका यापूर्वीही ऐकू आली होती. जेनिंग्ज म्हणतात की, याचा सिद्धांत बाैद्ध धर्मापासून आला आहे पण आम्ही बौद्ध र्ध्म शिकवत नाही. आम्ही मुलांना लक्ष केंद्रित करण्यास शिकविताे. जो योग अध्यात्माचा पाया आहे,तो प्रकार आम्ही शिकवत नाही. यामुळेच माईडफुलनेसचे आधिक सखोलपणे संशोधन चालू असावे,असे दिसते.

शारीरिक, मानसिक अवस्थेत सुधारणा
मुलांमध्ये मानसिक एकाग्रतेवरील संशोधन प्राथमिक स्तरावर आहे. पण यामुळे चिंता, लक्ष देण्यात अडचणी, व्यवहार आणि तणाव नियंत्रण यावर उपाय कळतो. पहिली ते तिसरीच्या ज्या मुलांना याचे प्रशिक्षण दिले गेले त्यांच्यामध्ये चिंता आणि एडीएचडी याचे प्रमाण आढळून आले नाही. त्यांचे झोपेचे प्रमाण चांगले राहिले, त्यांच्यात करुणा, उदारता वाढली तसेच गणितासारख्या विषयात चांगले गुण मिळवलेले दिसून आले. यासाठी काही पाहण्या झाल्या.

४ वर्षे संशोधकांच्या शाेधानुसार मुले वयाच्या चौथ्या वर्षापासून योग आणि माइंडफुलनेस अवस्थेचा नियमित अभ्यास करू शकतात.

२० % मुले अमेरिकेत चिंता आणि व्यग्रता यामुळे पीडित आहेत. लक्ष देण्यात अडचणी,अतिसक्रिय राहण्याने होणाऱ्या एडीएचडी विकारामुळे २०११ मध्ये ११ टक्के मुले आजारी होती.

१५ % माइंडफुलनेस कार्यक्रमात भाग घेणाऱ्या चाैथी,पाचवीतील मुलांना गणितात इतर मुलांपेक्षा १५ टक्के गुण जास्त मिळाले.
बातम्या आणखी आहेत...