आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amleksa Altman, JK Miller Article About Political Election And Political Party, Divy Marathi

पक्षांच्या ऐवजी निवडणुका लढवतात अब्जाधीश व हेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीच्या एका गारठलेल्या रात्री एक हेर डेस मोइस, एओव्हामध्ये चाललेल्या एका मद्य कारखान्यातील हिलरी सर्मथकांच्या बैठकीत सहभागी होतो. त्याच्याकडे एक कॅमेरा आहे. काही वेळाने तो सर्व हालचाली कॅमेर्‍यात टिपतो. क्लिंटन सर्मथक आपल्या नेत्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक अभियानातील संभाव्य धोरणांवर चर्चा करत होते. काही तासांतच रेकॉर्डिंगची क्लिप व्हजिर्निया येथील रिसर्च फर्मच्या हाती येते. तेथून इंटरनेट आणि मासिकाकडे पोहोचते.

अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी अधिकृत अभियान वर्षभरानंतर सुरू होईल. मात्र, या प्रकारच्या खुलाशाला अर्थ आहे. मद्य कारखान्यात जमलेले क्लिंटन सर्मथक एक सुपर राजकीय कृती समिती (पीएसी) रेडी फॉर हिलरीचे सदस्य आहेत. ही समिती माजी परराष्ट्रमंत्र्याचे निवडणूक अभियान चालवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी कोट्यवधी रुपये ओतत आहे. तर वरील हेर डेमॉक्रेटिक पक्षाला हानी पोहोचवणार्‍या एका संस्थेचे काम करतो. कंपनीने 19 राज्यांमध्ये असे एक डझनपेक्षा जास्त हेर पेरून ठेवलेले आहेत.

खरे म्हणजे, ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चालवल्या जाणार्‍या निवडणूक अभियानाच्या पर्वाची सकाळ आहे. दीर्घ काळ उमेदवार, राजकीय पक्ष व त्यांच्याद्वारे नियुक्त व्यावसायिक लोक निवडणूक अभियान चालवत आहेत.
मात्र, निवडणूक खर्चाच्या नव्या नियमांनी पक्षनेत्यांचे हात बांधले आहेत. आवश्यक माहिती एकत्र करण्यापासून ते डिजिटल रणनीती बनवण्याचे काम बाहेरच्या संस्था करू लागल्या आहेत. रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठे नेते एड रॉलीन्स सांगतात, आता निवडणूक लढवण्यासाठी पक्षांची गरज राहिलेली नाही.

आर्लिंग्टनच्या एका इमारतीत हिलरी क्लिंटनचे अनधिकृत अभियान उधळून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दारावर अमेरिका रायझिंगचा फलक लावलेला आहे. हा विरोधी पक्षाच्या रिसर्च ग्रुप डेमॉक्रेटिक उमेदवारांच्या चुकांवर नजर ठेवतो. त्यासंबंधी रिपब्लिकन सर्मथकांना कळवतो. अमेरिका रायझिंगला तीन रिपब्लिकन-टीम मिलर, जो पाउंडर, मॅट रोड्स चालवतात. यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पक्ष डोळ्यांसमोर ठेवून एक फर्म उघडली आहे. या फर्मवर फेडरल निवडणूक आयोगाचे नियंत्रण नाही. ते कोणाकडूनही निधी घेऊ शकतात. फर्मला दात्यांचा किंवा धोरणांचा तपशील देण्याचीही गरज नाही. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने अशा कित्येक संस्था काम करत आहेत.

डेमॉक्रेटिक पार्टीमध्येही असा बदल दिसत आहे. पाच सुपर पीएसी डेमॉक्रेट्सच्या सर्मथनार्थ अर्मयाद पैसा खर्च करायला तयार आहेत. स्वतंत्र गट रेडी फॉर हिलरीचे 3300 पेक्षा जास्त सर्मथक आहेत. अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची कंपनी कॅटालिस्ट या गटाची मदत करते. 2011 मध्ये ओबामासाठी काम केलेली प्रायॉरिटीज यूएसए हिलरीसाठी सक्रिय झाली आहे. अमेरिकन ब्रिज 21वे शतक नावाची सुपर पीएसी क्लिंटनवर होणार्‍या हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल.

उमेदवार पक्षांऐवजी बाहेरील संस्थांना अधिक महत्त्व देऊ लागले आहेत.
अब्जाधीश चाल्र्स आणि डेव्हिड कोचने 2012 मध्ये 40 कोटी डॉलर जमवले. ही मंडळी डेमॉक्रेट्सविरोधात सक्रिय आहेत.क्लब फॉर ग्रोथ, फ्रीडम वर्क, मेडिसिन प्रोजेक्ट, सिनेट कॉन्झव्र्हेटिव्ह फंड आदी संस्था काम करत आहेत.