आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अम्मां’चे आयुष्य : कोमलावल्ली ते ‘अम्मा’ प्रवासाची रंजक कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेदना, संघर्ष आणि यश. तिन्हींची सर्वोच्च सीमा जय ललीतांनी पाहिली. शिक्षण, चित्रपट आणि राजकारण या तिन्हींत अव्वलही राहिल्या. पण मोठ्या संघर्षानंतरही प्रेम आणि कुटुंबीय अपूर्णच राहिले. चेन्नईहून शोभना रूपाकुमार यांचा वृत्तांत...
ही कहाणी फिल्मी आहे, पण त्यात नाट्य आहे अगदी राजकारणासारखे. त्या म्हणायच्या की, मला चित्रपटांत यायचे नव्हते, पण आईच्या आग्रहामुळे यावे लागले. चित्रपटांत आल्या आणि रौप्यमहोत्सवी चित्रपटांची रांगच लागली.
मला राजकारणातही यायचे नव्हते, असे त्या म्हणत. मेंटर एमजीआर यांच्या सांगण्यावरून त्या राजकारणात आल्या. तेथेही साम्राज्य निर्माण केले. ही कहाणी आहे जयललितांची. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे पटकथाच. असे आहे ‘अम्मां’चे आयुष्य.

कर्नाटकच्या मंड्या शहरात परंपरावादी कुटुंबात जन्म झाला होता. आजोबा नरसिंहन रंगाचारी यांनी त्यांचे नाव कोमलावल्ली ठेवले होते. शाळेत मात्र जयललिता असे नाव होते. त्यांच्या कुटुंबात दोन नावे ठेवण्याची परंपराच आहे. जयांचे कुटुंब अत्यंत प्रतिष्ठित. त्यांचे आजोबा म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याचे सर्जन होते.
आई वेदावल्लीचा विवाह वकील जयराम यांच्याशी झाला होता. त्यांचा जयाम्मा नावाच्या महिलेशी पहिला विवाह झाला होता. त्यांचा मुलगा वासुदेवन. पण जयललितांना हे सावत्र नाते कधीच भावले नाही. त्यांनी सावत्र भावाशी संबंध ठेवलेच नाहीत.
एकदा वासुदेवन यांनी स्वत:चा प्रचार जयललितांचा सावत्र भाऊ असा सुरू केला तेव्हा जयललितांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आज वासुदेवन म्हैसूरजवळील एका गावात राहतात.

वेदावल्ली आणि जयराम यांना दोन मुले. जयकुमार आणि जयललिता. जया दोन वर्षांच्या असताना १९५० मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आजोबांची संपत्ती उधळल्यानंतर वडिलांचा रहस्यमय स्थितीत मृत्य झाला, असे स्वत: जयललिता यांनी १९७० च्या दशकात एका नियतकालिकात लिहिले होते, असे म्हणतात.
वडिलांच्या मृत्यूनंतर जयांचे कुटुंब आईच्या माहेरी बंगळुरूला आले. वेदावल्ली स्वावलंबी विचारांच्या होत्या. त्यामुळे मुलांचा बोजा आई-वडिलांवर पडू नये म्हणून त्यांनी एमजीआर यांनी फेटाळला लग्नाचा आग्रह एमजीआरही १९७० मध्ये जयललितांपासून दूर गेले होते.
‘अम्मा’ शीर्षकाने जीवनचरित्र लिहिणाऱ्या वासंती यांचा दावा होता की, जया यांनी अनेकदा एमजीआर यांच्याशी लग्नासाठी आग्रह धरला होता, पण विवाहित आणि वयाने ३१ वर्षे मोठे असलेल्या एमजीआर यांनी ते मान्य केले नाही.
नंतर ८-१० वर्षे दूर राहिल्यानंतर जयांचा तेलुगू चित्रपटांचा हीरो शोभन बाबूंशी संबंध आला. त्यांच्या लग्नाच्या अफवाही उडाल्या. पण त्यात तथ्य नव्हते. म्हणजेच एमजीआर किंवा शोभन बाबूही त्यांचे झाले नाहीत.
जयांचे वडील लहानपणीच गेले, नंतर आई व भाऊही
त्यांचा मुलगा वासुदेवन. पण जयललितांना हे सावत्र नाते कधीच भावले नाही. त्यांनी सावत्र भावाशी संबंध ठेवलेच नाहीत. एकदा वासुदेवन यांनी स्वत:चा प्रचार जयललितांचा सावत्र भाऊ असा सुरू केला तेव्हा जयललितांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आज वासुदेवन म्हैसूरजवळील एका गावात राहतात.

वेदावल्ली आणि जयराम यांना दोन मुले. जयकुमार आणि जयललिता. जया दोन वर्षांच्या असताना १९५० मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आजोबांची संपत्ती उधळल्यानंतर वडिलांचा रहस्यमय स्थितीत मृत्य झाला, असे स्वत: जयललिता यांनी १९७० च्या दशकात एका नियतकालिकात लिहिले होते, असे म्हणतात.
वडिलांच्या मृत्यूनंतर जयांचे कुटुंब आईच्या माहेरी बंगळुरूला आले. वेदावल्ली स्वावलंबी विचारांच्या होत्या. त्यामुळे मुलांचा बोजा आई-वडिलांवर पडू नये म्हणून त्यांनीबंगळुरूच्या सचिवालयात नोकरी सुरू केली. आयुष्याचा गाडा वळणावर येत होता तेवढ्यात वेदावल्लीची बहीण आणि जयांची मावशी अंबुजावल्ली म्हणाली की, आपल्याला मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) राहावे लागेल. अंबुजावल्ली एअर होस्टेस होती आणि चित्रपटांतही काम करत होती. त्यामुळे मद्रासला जावे लागले.
अंबुजावल्लीमुळे घरी चित्रपट निर्माते आणि कलावंत यांचे येणे-जाणे होते. एकदा एका निर्मात्याने वेदावल्लींना पाहिले आणि त्यांना चित्रपटाचा प्रस्ताव दिला. येथूनच जयांच्या आईचा चित्रपट प्रवास सुरू झाला. त्यांनी चित्रपटांत संध्या नावाने काम केले.
चित्रपटातील कामांमुळे संध्या मुलांना वेळ देऊ शकत नव्हत्या. त्यामुळे संध्या यांनी मुलांना बंगळुरूत आई-वडिलांजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी जयांचे वय होते अवघे ४ वर्षे. आईपासून दूर राहावे लागले याची खंत त्यांना आयुष्यभर राहिली. जयांचे आजोबा रंगास्वामी हे हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरीला होते.
जयांनी अभ्यासासोबतच संगीत आणि नृत्य शिकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या सकाळी पाच वाजता झोपेतून उठायच्या. पहाटेच संगीताचा रियाज आणि नंतर ९ ते संध्याकाळी सव्वाचारपर्यंत शाळा. शाळेतून घरी येण्याच्या आधीच दोन नृत्य शिक्षक तयार असत. एक भरतनाट्यम शिकवण्यासाठी, तर दुसरा कुचीपुडी आणि कथकली यांसारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारासाठी. होमवर्क आणि जेवणासाठी मुश्किलीने वेळ मिळत होता. थकल्याने झोप कधी लागायची तेही कळायचे नाही.

१९५८ मध्ये जया आणि त्यांच्या भावाला मद्रासला जावे लागले. चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जयांचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी इयत्ता दहावीत सर्वाधिक गुण मिळवले. पुरस्कार मिळाला आणि सरकारतर्फे शिष्यवृत्तीही सुरू झाली.
मात्र, कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे चित्रपटांत काम करण्याचा आग्रह आईने धरला. एका कडाक्याच्या भांडणानंतर जयांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांनी तेथेही प्रचंड परिश्रम केले. अनेकदा त्यांनी ६-६ शिफ्टमध्येही काम केले. सर्व ठीक होत असतानाच १९७१ मध्ये आईचे निधन झाले. त्या वेळी जया फक्त २३ वर्षांच्या होत्या. त्यांना मानसिक धक्का बसला. पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन यांच्या संपर्कात आल्या.
एमजीआरनी त्यांना राजकारणात येण्याचा प्रस्ताव दिला. जयललितांचे आयुष्य चांगल्या वळणावर होते. पण हा आनंदही टिकला नाही. १९८९ मध्ये एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जया सार्वजनिक आयुष्यात व्यग्र होत्या. त्यामुळे भावाशी जास्त संपर्क राहिला नाही. १९९५ मध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
भावाची पत्नी विजयलक्ष्मी यांचेही २०१३ मध्ये निधन झाले. त्यांना दीपक आणि दीपा अशी दोन मुले आहेत. दीपाचा जन्म पोएस गार्डन हाऊसमध्ये झाला होता. त्या वेळी त्यांचा भाऊ तेथेच राहत होता, कौटुंबिक वादामुळे वेगळा राहू लागला. जयांच्या जीवनात आधी शशिकलांचे आगमन आणि नंतर दत्तक मुलाच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च करणे, या दोन घटनांमुळे जयांचे आप्तस्वकीय त्यांच्यापासून दूर गेले. यशस्वी राहिल्या, पण कुटुंब आणि प्रेम या दृष्टीने त्या अपूर्णच होत्या.

शशिकला आयुष्यात आल्या अन् जणू बहीणच झाल्या
काम करत होते. चंद्रलेखा तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांच्या जवळच्या होत्या. एमजीआर जयांचे मेंटॉर होते. त्यामुळेच चंद्रलेखाने शशिकलांची भेट जयललितांशी घालून दिली. १९८३ मध्ये शशिकलांनी जयांच्या महिला आघाडीच्या एका मोठ्या सभेचे चित्रीकरण केले आणि त्या जयांच्या जवळ आल्या. जया म्हणत असत, ‘आम्ही बहिणी आहोत, फक्त रक्ताचे नाते नाही.’शशिकलांचे कुटुंब गरीब होते, पण त्या प्रभावशाली कल्लार कुटुंबाशी संबंधित होत्या. जेव्हापासून त्या जयांच्या जवळ आल्या तेव्हापासून कल्लार समुदायाचा प्रभाव आणि उपस्थिती सरकारमध्ये प्रत्येक स्तरावर वाढली आहे.

१९८० च्या दशकात शशिकला आणि जयललिता यांची मैत्री सुरू झाली तेव्हा शशिकलांचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत होते. मन्नारगुडीचे लोक सांगतात की, तेव्हा शशिकलांचा भाऊ धीवाहरन बेरोजगार होता. एकदा तर तो एका नोकरीसाठी सिंगापूरलाही गेला होता, पण लवकरच परतला. आज त्याच धीवाहरनला मन्नारगुडीत डॉ. व्ही. धीवाहरन नावाने ओळखले जाते. लोक त्यांना ‘बॉस’ म्हणतात. कावेरी खोरे क्षेत्र म्हणजे तंजावर आणि जवळपासच्या शहरांतील ते प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. धीवाहरन मन्नारगुडी गावाजवळच ऑल गर्ल्स सेंगमला थयार एज्युकेशनल ट्रस्ट चालवतात.
धीवाहरन ते ‘बॉस’ धीवाहरन बनण्याची सुरुवात जवळपास तेव्हाचीच आहे, जेव्हा ‘मन्नारगुडी माफिया’ची सुरुवात झाली. शशिकलांचा मोठा परिवारच तामिळनाडूचे प्रशासन चालवतो, असे म्हटले जाते. धीवाहरन तर या मन्नारगुडी कुटुंबाचा एक लहान भाग आहेत. काळासोबत या कुटुंबाने तामिळनाडूबाहेरही आपली मुळे पसरली.
सरकारच्या प्रत्येक स्तरावर या कुटुंबाचे लोक बसलेले आहेत, असे मानले जाते. या लोकांनी संपूर्ण राज्यावर आपली पोलादी पकड बसवली आहे. अधिकारीही म्हणतात की, हे लोक खूप हुशार आहेत. प्रत्येक गोष्ट मॅनेज करणे त्यांना जमते. सगळीकडे त्यांचे लोक आहेत.
जया टीव्हीपासून ते मंत्रालयापर्यंत. पोलिस आणि नोकरशाहीत वरपासून खालपर्यंत त्यांच्या ‘कठपुतळ्या’ आहेत. २०१२ मध्ये शशिकला कमकुवत झाल्यानंतर मन्नारगुडीची ही यंत्रणा कमजोर झाली होती, पण ते पुन्हा परतले.
लोक म्हणतात की, ते काहीच सोडत नाहीत. बस स्थानकांतील सायकल स्टँडचे कंत्राटही त्यांच्याकडे आहे. अंतस्थ लोक सांगतात की, शशिकलांच्या कुटुंबातील लोक प्रत्येक महत्त्वाच्या जागी आहेत. त्यांचे डोळे आणि कान नेहमी नोकरशाही आणि मंत्रालयाकडे लागलेले असतात.
पोलिस अधिकारी सांगतात की, थेवर समुदायाशी संबंधित एक ज्येष्ठ आयपीएसही दीर्घ काळापासून या लोकांसोबत काम करत आहे. चेन्नईपासून दिल्लीपर्यंत डेप्युटेशनवर बसलेले ‘त्यांचे लोक’ त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचवतात.
असे म्हणतात की, शशिकला ९० च्या दशकात मद्रासहून महाबलिपुरमला रस्ता मार्गे जात असत. इतरांप्रमाणे नैसर्गिक आनंद लुटण्यासाठी नाही तर आता कोणत्या जमिनीचे अधिग्रहण करता येऊ शकते हे पाहण्यासाठी. लोक म्हणत असत की एखादे मोठे बांधकाम करायचे असेल तर असे करा की ते खूप लहान वाटावे; अन्यथा ते हातातून जाऊ शकते. शशिकलांनी जयांच्या जवळ राहण्यासाठी बराच त्यागही केला आहे.
१९९६ मध्ये ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात शशिकलांना अटक केली होती. त्या वेळी राज्यात द्रमुकचे सरकार होते आणि शशिकला यांच्यावर जयांना अडकवण्यासाठी मोठा दबाव होता, असे म्हटले जात होते. पण शशिकलांनी जयांना धोका दिला नाही. त्यानंतर जया आणि शशिकला यांची मैत्री आणखी दृढ झाली.
बातम्या आणखी आहेत...