आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असह्य नव्हे,सर्वच दु:खे सुसह्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा खूप दु:ख होते, तेव्हा असह्य दु:ख झाले, असे लोक म्हणतात. शरीरात जर एखादा आजार झाल्यानंतर असह्य वेदना होत आहेत, असे लोक डॉक्टरांना सांगतात, परंतु कोणतेच दु:ख असह्य नसते. प्रत्येकच दु:ख सुसह्य असते, ही वस्तुस्थिती आहे. दु:ख सहन करण्याची मन आणि शरीराची क्षमता अद्भुत आहे. दु:खांचे पहाड कोसळत राहतात आणि लोक जिवंत राहतात, जगत राहतात. मुलाचा मृत्यू होतो, आईचा मृत्यू होतो, पत्नीचाही मृत्यू होतो, तेव्हा आम्ही असह्य दु:ख झाले असेच म्हणतो. मात्र, ते दु:खही पचवतो. दोन-चार महिन्यांत जखमा भरून जातात. आपण पुन्हा पहिल्यासारखेच होऊन जातो, पुन्हा जीवन पूर्ववत सुरू होते. आम्ही असह्य होते, असे सांगितले होते खरे, पण ते सुसह्यच होते.

जीवनात दु:ख हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे असते. ते मनाला जागवण्याचे कार्य करते, अन्यथा मन झोपलेले असते. झोपलेले मन कधीच काही शिकू शकत नाही. शिकण्यासाठी खूप तीव्रता हवी असते. संपूर्ण ऊर्जा एकत्रित होऊन चाकूसारखी धारदार झाली तरच दु:ख काही शिकवू शकते. बहुतांश लोक कन्हत जगत असतात. ते वेदनेला आपल्या प्राणात शिरू देत नाहीत, हृदयास भेदू देत नाहीत. मागील जन्माचे फळ असेल किंवा पुढील जन्मात सुखाचा उपभोग घेऊ याप्रकारे सांत्वनाचा मलम लावून टाकतात. सर्व तत्त्वज्ञान केवळ सांत्वन करते, सत्य सांगत नाही. यामुळे दु:ख येतात आणि जातात. तुम्ही जसे होते तसेच तुम्हाला ठेवून. त्यात तसूभरही फरक पडत नाही. तुम्ही आधी जे करत होता, तेच करत राहता. तेच जीवन, तोच दिनक्रम आणि तेच व्यवहार. थोडासा धक्का बसतो आणि तुम्ही पुन्हा सावरले जाता. जर कोणी पूर्णपणे अस्वस्थ झाला तरच शांती प्राप्त केल्या जाऊ शकते, परंतु पूर्णत: अस्वस्थ व्हायला हवे, ही अट लक्षात ठेवा. अर्धवट अस्वस्थतेने काहीच साध्य होत नाही. मात्र, आपल्यापैकी कोणीच पूर्णत: अस्वस्थ होत नाही, आम्ही थोडेसेच अस्वस्थ होतो. पूर्णत: अस्वस्थ झालो तर आपण वाचूच शकत नाही आणि वाचलोच तर नखशिखांत बदलूनच आपण वाचलेले असतो. शांतता प्राप्त करायची असेल तर पूर्णत: अस्वस्थ होण्याचे धारिष्ट्य दाखवा, तत्काळ परिवर्तन घडेल.

अमृत साधना
ओशो ध्यानधारणा केंद्रात व्यवस्थापन सदस्य, पुणे