आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर टक्के जीवन जगण्याचे कौशल्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच व्हॉट्सअ‍ॅपवरचा एक मेसेज वाचून मी विचारात पडले. त्या संदेशात लिहिले होते, आपण वापरत असलेल्या उपकरणांची संपूर्ण क्षमता वापरली जाते का? त्यांची किती क्षमता वाया जाते?
कंपन्या नवनवी उत्पादने लाँच करतात. नव्याच्या वेडापायी लोकही त्या उत्पादनांवर तुटून पडतात. नुकताच आयफोन ६ बाजारात आला आहे. तीनच दिवसांत ५५ हजार हँडसेट विकले गेले. मात्र, त्यात उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्सपैकी केवळ ३० टक्के अ‍ॅप्सच लोक प्रत्यक्षात वापरतात.

महागड्या गाड्यांच्या एकूण क्षमतेपैकी केवळ ७० टक्के वेगाचा उपयोगच होत नाही. कारच्या स्पीडोमीटरवर २०० पर्यंत सर्वोच्च वेग दिलेला असतो. मात्र, कधी कोणी इतका वेग वापरला नाही.

तुमच्या कपाटात कपड्यांची काहीच कमतरता नसते. मात्र, त्यातील ७० टक्के कपडेही वापरले जात नाहीत. जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा निवडकच कपडे हातात येतात. तेच वारंवार वापरले जातात. व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांपैकी ७० टक्के गुणांचा उपयोगच होत नाही. निष्कर्ष असा की, एकूण आयुष्यातील ७० टक्के जीवन जगणेच राहून जाते. आपण केवळ ३० टक्के जीवनच जगतो.

असे म्हणतात, अल्बर्ट आइन्स्टाइनसारख्या प्रखर बुद्धिमत्तेच्या व्यक्तीनेही त्याच्या मेंदूची केवळ १५ टक्के क्षमताच वापरली होती. बाकी ८५ टक्के मेंदू तसाच पडून होता. जर सर्वात जास्त प्रतिभेच्या व्यक्तीची ही स्थिती असेल, तर आपल्यासारख्या सामान्यांची काय गत? आपण ज्यांना बुद्धिमान म्हणतो तेदेखील ४.५ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्धिक ऊर्जा वापरत नाहीत.

मग आपण १०० टक्के जगायचे कसे? मरण कृतकृत्यतेने यावे, असे सगळ्यांनाच वाटते. सर्वप्रथम दररोज एक तास शांत बसा व स्वत:ची सजगता तपासा. तटस्थ राहून स्वत:चा विचार करा. संवेदनांना जाणून घ्या. स्वत:ची ऊर्जा अनाठायी कुठे व्यर्थ होत आहे, याची जाणीव नक्कीच होईल. तुमच्या ऊर्जेला कसा व कुठे सुरुंग लागत आहे. वे‌ळ, वस्तू व व्यक्तींच्या सदुपयोगाचा ताळमेळ कोठे लागत नाही, हे स्पष्ट होईल. सर्व ऊर्जा एकवटली, तर तुमचे जीवन व्यर्थ होणार नाही, सार्थक होईल.

अमृत साधना
ओशो मेडिटेशन रिसॉर्टमध्ये
व्यवस्थापन सदस्या, पुणे
amrit.sadhana@ dainikbhaskargroup.com